ठाणे: एकाच वेळी घरातून तिघा मित्रांचे मोबाईल चोरीला गेल्याची घटना वागळे इस्टेट येथील हनुमान नगर परिसरात शनिवारी घडली. तिघांपैकी एक जणच बाथरुमला बाहेर जातो सांगून दरवाजा उघडा ठेवून गेला होता. तीच संधी साधून चोरट्यांनी मोबाईल लांबवले. याप्रकरणी श्रीनगर पोलीस ठाण्यात मोबाईल चोरीचा गुन्हा दाखल झाला.तक्रारदार प्रमोद वर्मा यांनी दिलेल्या तक्रारीत, त्यांच्यासह मनिराम वर्मा आणि संजय वर्मा असे तिघे जण वागळे इस्टेट परिसरातील हनुमान नगरमध्ये राहतात. मूळ उत्तरप्रदेशचे तिघेही प्लंबर, कडियाकाम तसेच बांधकामाचे काम करतात. ते शुक्रवारी रात्री ९.३० वाजता मुलुंड येथे दिवसभर काम करून घरी परतले होते. रात्री ११.३० वाजताच्या सुमारास तक्रारदार आणि मनीराम हे दोघे झोपी गेले. संजय हा मोबाईल बघत बसला होता. मध्यरात्री दोन वाजताचा सुमारास त्याने तक्रारदाराला उठवले आणि बाथरूमला जाऊन येतो, जरा लक्ष ठेव, असे सांगून घराचा दरवाजा उघडा ठेवून तो बाहेर पडला. त्यानंतर तो अर्धा तासाने पुन्हा घरी परतला तेव्हा घरातील त्याच्यासह इतर दोघांचे असे तीन मोबाईल चोरीला गेल्याचे निदर्शनास आले............................
ठाण्यात एकाचवेळी तिघा मित्रांचे मोबाईल लांबवले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 9, 2018 21:41 IST
ठाणे : एकाच वेळी घरातून तिघा मित्रांचे मोबाईल चोरी ला गेल्याची घटना वागळे इस्टेट येथील हनुमान नगर परिसरात शनिवारी ...
ठाण्यात एकाचवेळी तिघा मित्रांचे मोबाईल लांबवले
ठळक मुद्दे घराचा दरवाजा उघडा ठेवून तो बाहेर पडलाअर्धा तासाने पुन्हा घरी परतला