गळक्या व्हॉल्व्हमधून पाण्याची विक्री

By Admin | Updated: March 28, 2016 02:26 IST2016-03-28T02:26:56+5:302016-03-28T02:26:56+5:30

एकीकडे पाणी वाचवा म्हणून उपदेश दिले जात असताना दुसरीकडे मीरा रोड परिसरात जलवाहिन्यांवरील व्हॉल्व्हमधून रोज हजारो लीटर पाणी वाया जात आहे. या व्हॉल्व्हमधून वाहणारे

Sale of water through a faulty valve | गळक्या व्हॉल्व्हमधून पाण्याची विक्री

गळक्या व्हॉल्व्हमधून पाण्याची विक्री

मीरा रोड : एकीकडे पाणी वाचवा म्हणून उपदेश दिले जात असताना दुसरीकडे मीरा रोड परिसरात जलवाहिन्यांवरील व्हॉल्व्हमधून रोज हजारो लीटर पाणी वाया जात आहे. या व्हॉल्व्हमधून वाहणारे पाणी भरून त्याची सर्रास विक्र ी होत आहे. पालिका मात्र याकडे दुर्लक्ष करत आहे.
मीरा रोडच्या हाटकेश परिसरात तब्बल पाच ठिकाणी पाण्याची गळती होत आहे. येथील हाटकेश्वर चौक, बसस्टॉपजवळ तर पालिकेच्या मुख्य जलवाहिनीवरील व्हॉल्व्ह वर्षभरापासून गळत आहे. व्हॉल्व्हवरील बोल्ट काढल्याने पाणीपुरवठा सुरू असेपर्यंत गळती सुरू असते. हजारो लीटर पाणी वाहून जाते. तर, काही जण पाइप लावून पाणी भरतात. फेरीवाले व अन्य काही जण पाणी वापरतात. शिवाय, पाण्याची विक्र ी केली जात असल्याचा आरोप मनसेचे शान पवार यांनी केला आहे. असेच प्रकार एव्हरग्रीन सिटीच्या कोपऱ्यावरील सालासर गार्डनजवळ आहेत. व्हॉल्व्हचे दोन बोल्ट काढून गळणारे पाणी भरले जाते. मंगलनगर, शारदाबेन स्कूलजवळ रश्मी कॉम्प्लेक्स येथेदेखील व्हॉल्व्ह गळत असून त्याचे बोल्ट काढले आहेत. हाटकेशच्या मारु ती शोरूम, बाबा टायरजवळचा व्हॉल्व्हदेखील सहा ते सात महिन्यांपासून गळत आहे. हरिया ड्रीम पार्क, वेदान्त हायस्कूलसमोर जमिनीच्या खालून गेलेली जलवाहिनी फुटली आहे.
या पाच ठिकाणी होणारी गळती व पाणीचोरीमुळे रोज हजारो लीटर पाणी वाया जात असतानाही महापालिकेकडे सातत्याने तक्र ारी करूनही कारवाई होत नसल्याबद्दल मनसेचे दिनेश कनावजे यांनी नाराजी व्यक्त केली. पाण्याचा एक कॅन ४० ते ५० रु पयांना विकला जात असल्याचा आरोप कनावजे यांनी केला आहे. या प्रकरणी पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता सुरेश वाकोडे यांच्याशी संपर्कसाधण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी फोन उचलला नाही. (प्रतिनिधी)

Web Title: Sale of water through a faulty valve

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.