जव्हार मध्ये उबदार कपड्यांची विक्री जोरात, गुलाबी थंडीचा मौसम सुरू

By Admin | Updated: November 16, 2016 16:59 IST2016-11-16T16:59:56+5:302016-11-16T16:59:56+5:30

सध्या 500 व 1000 च्या चलनी नोटा बंद झालेल्या असुन खेडोपाड्यातील बांधव आप आपल्यानोटांचे बदल व भरणा करण्यासाठी लांब लांब रांगेत ताटकळत उभे राहून पैसे बदलून घेत आहेत

The sale of warm clothes in Jawar, the pink cold weather started | जव्हार मध्ये उबदार कपड्यांची विक्री जोरात, गुलाबी थंडीचा मौसम सुरू

जव्हार मध्ये उबदार कपड्यांची विक्री जोरात, गुलाबी थंडीचा मौसम सुरू


चलनी नोटांवर मात करीत उबदार कपड्यांची खरेदी सुरू


जव्हार - सध्या 500 व 1000 च्या चलनी नोटा बंद झालेल्या असुन खेडोपाड्यातील बांधव आप आपल्यानोटांचे बदल व भरणा करण्यासाठी लांब लांब रांगेत ताटकळत उभे राहून पैसे बदलून घेत आहेत. यामुळे बाजारात मात्र ईतर विक्री व्यावहार पुर्णपणे ठप्प असुन खाय-प्यायाच्या वस्तू ऐवजी कुठलीही वस्तू विक्री जात नाही, परंतू थंडीचा जोर वाढल्याने खेडोपाड्यातील गरीब आदिवासी बांधव मात्र उबदार कपडे व स्वेटर खरेदी करतांना दिसत आहेत.
पालघर जिह्यातील थंड हवेचे ठिकाण म्हणून आणि पर्यटन स्थळ व एैतिहासीक वारसा लाभलेल्या जव्हार शहरात गुलाबी थंडीची लहर सुरू झाल्याने गेल्या काही दिवसांपासुन जव्हार शहरात सायंकाळच्या वेळेस थंडी जोर पकडत आहे. जव्हार तालूका हा घनदाट जंगल-दर्‍याखोर्‍यातील, अतिदुर्ग भाग असल्यामुळे येथे थंडी चांगलीच जाणवते. त्यामुळे येथील व्यापारी बंधुंनी तसेच फेरीवाल्यांनी थेट लुधियाना शहरातून लोकरीचे, रेग्जीनचे स्वेटर, शाल, कंबल, मफलर, कानटोपी, माकडटोपी इत्यादी व्हराईटीचे उबदार कपडे बाजारात विक्रीसाठी आनले आहेत. तसेच काही फेरीवाल्यांनी आपले दुकान चक्क रस्त्यांवर मांडून व्यवसाय करीत आहेत. ग्रामीण आदिवासी भाग असल्यामुळे या फुटपाथवरील दुकानांवर खरेदीकरीता खेडोपाड्यातील बांधवांची गर्दी दिसुन येते.
खेडोपाड्यात लुधियानी व इतर प्रांतातील हलके भारी स्वेटर, उबदार कपडे, लहान मुलांचे-मुलींचे मोठ्यांचे स्वेटर, मफलर, कानटोपी वस्तू नाशीक येथून किरकोळ विक्रेते जव्हार तालुक्यातील खेडोपाड्यात फिरून विक्री करतांना दिसत आहेत.
जव्हार शहरातील भाग शाळेसमोर, मेमन मार्केट, व एस. टी. स्टॅन्ड रोडवरील व्यापार्‍यांकडे आप आपल्या सोयीनुसार लहान मोठे स्वेटर, कोट, शाल, मफलर खरेदीची लगबग सुरू झालेली आहे. यावर्षी व्यापारी वर्गाने वेगवेगळे लोकरीने विणलेले चमकदार, दर्जेदार लेडीज-जेन्टस् स्वेटरचे प्रकार बाजारात विक्रीसाठी आणलेले आहेत. यात लहान मुलांचे-मुलींचे स्वेटर रू. 60/- ते 550/- पर्यत तर मोठे मुला-मुलींचे स्वेटर रू. 160/- ते 850/- रूपयांपर्यत तसेच लेदर मधील कोट हे लहान व मोठे रू. 190/- ते 950/- पर्यत बाजारात उपलब्ध आहेत. रात्रीच्या वेळेस शहरातील लोक घराबाहेर छोटी मोठी शेकोटी करताना दिसत आहेत. आजू बाजूला पडलेल्या सुक्या फाट्या, गवत, गोणपाट इत्यादी वस्तूचे वापर करून शेकोटी करतांना लोक दिसत आहेत.

- आम्ही खेडोपाड्यात कुडामातीच्या कच्च्या घरात राहतो, त्यामुळे आमच्या पोरा बाळांना थंडीचा खुपच सामना करावा लागतो, त्यामुळे आम्ही स्वेटर खरेदी करण्याकरीता जव्हाच्या बाजारपेठेत येतो.

सुरेखा खुरकुटे - ग्राहक, हिरडपाडा

Web Title: The sale of warm clothes in Jawar, the pink cold weather started

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.