साकेत पुलाच्या कामामुळे पुन्हा वाहतूककोंडी

By Admin | Updated: June 1, 2016 02:29 IST2016-06-01T02:29:14+5:302016-06-01T02:29:14+5:30

साकेत पुलावरील नाशिक -मुंबई लेनच्या दुरूस्तीचे काम मंगळवारपासून हाती घेतल्याने त्याच्या दोन्ही बाजूकडील वाहतूक धीम्या गतीने सुरू होती.

Saket bridge works again due to traffic congestion | साकेत पुलाच्या कामामुळे पुन्हा वाहतूककोंडी

साकेत पुलाच्या कामामुळे पुन्हा वाहतूककोंडी

ठाणे : साकेत पुलावरील नाशिक -मुंबई लेनच्या दुरूस्तीचे काम मंगळवारपासून हाती घेतल्याने त्याच्या दोन्ही बाजूकडील वाहतूक धीम्या गतीने सुरू होती. वाहनचालकांना येथून जाताना साधारणत: १० ते १५ मिनटे तात्कळत राहावे लागत होते. त्यातच ब्रीजवरील दुरूस्ती केलेल्या नाशिक-मुंबई या लेनवरू न वाहतूक सोडल्याने एका बाजूची वाहतूक थांबवून दुसरी बाजूची वाहतूक सुरळीत करण्यात येत होती. त्यामुळे पहिल्या दिवशी वाहतूककोंडीचे चित्र पाहण्यास मिळाले.
मुंबई-नाशिक महामार्गावरील साकेत खाडीपुलाच्या नाशिक मुंबई लेनच्या दुरूस्तीचे काम पूर्ण झाल्यानंतर मंगळवारपासून मुंबई-नाशिक लेनच्या दुरूस्तीचे काम हाती घेण्यात आले. त्यानुसार, पहिल्या दिवशी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (सा.बा )विभागामार्फत पुलावरील अतिरिक्त डांबरीकरणाचा थर काढण्यास प्रारंभ झाला. त्यानंतर जॉर्इंट तोडण्यात येणार आहे. साधारणत: दिलेल्या कालावधी अधीच हे काम पूर्ण करणार असल्याचे प्राधीकरण अधिकाऱ्यांनी सांगितले.
याचदरम्यान,एक बाजू थांबवून दुसऱ्या बाजूची वाहतूक काढताना, शहरात साधारणत: २०० मीटरपर्यंत वाहनांच्या रांग लागल्याचे दिसत होते. तसेच सकाळी काही प्रमाणात वाहतूककोंडी झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. मात्र, ती होऊ नये यासाठी वाहतूक शाखेमार्फत काटेकोर नियोजन केले आहे. ती सुरळीत राखण्यासाठी २०० कर्मचारी आणि २३ अधिकारी असा चोख बंदोबस्त लावला आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Saket bridge works again due to traffic congestion