बलात्कार करणाऱ्या सावत्र बापाला सक्तमजुरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2018 03:19 IST2018-06-22T03:19:18+5:302018-06-22T03:19:18+5:30
अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी सावत्र बापाला गुरुवारी कल्याण न्यायालयाचे न्या. डी. एस. हातरोटे यांनी १० वर्षे सक्तमजुरी व २५ हजार दंड तसेच, दंडाची रक्कम न भरल्यास एक वर्षाची साधी कैद अशी शिक्षा सुनावली.

बलात्कार करणाऱ्या सावत्र बापाला सक्तमजुरी
कल्याण : अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी सावत्र बापाला गुरुवारी कल्याण न्यायालयाचे न्या. डी. एस. हातरोटे यांनी १० वर्षे सक्तमजुरी व २५ हजार दंड तसेच, दंडाची रक्कम न भरल्यास एक वर्षाची साधी कैद अशी शिक्षा सुनावली.
खडवली रोड परिसरात राहणाºया ३७ वर्षांच्या बापाने जानेवारी २०१४ मध्ये आपल्या १३ वर्षांच्या सावत्र मुलीवर घरात कोणी नसताना बलात्कार केला. हा प्रकार कोणाला सांगितल्यास माझ्या मुलांना घेऊन घर सोडून जाण्याची धमकी त्याने मुलीला दिली होती. एप्रिलमध्ये मुलीचे पोट दुखू लागल्यावर ही बाब उघड झाली. यानंतर तिच्या आईने कल्याण तालुका पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. तेव्हा पोलिसांनी बापाला अटक केली. सरकारी वकील दिलीप भांगरे व राखी पांडे यांनी काम पाहिले.