वेद राही यांना साहित्य अकादमीचा सर्वोच्च सन्मान
By प्रज्ञा म्हात्रे | Updated: December 12, 2024 22:53 IST2024-12-12T22:53:34+5:302024-12-12T22:53:43+5:30
प्रशस्तीपत्रासह, ताम्रपट, शाल , पुष्पगुच्छ साहित्य अकादमीचे अध्यक्ष माधव कौशिक यांच्या हस्ते, आणि सचिव के. श्रीनिवासराव, महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष प्रा. डॉ. नरेंद्र पाठक यांच्या उपस्थितीत हा पुरस्कार देण्यात आला.

वेद राही यांना साहित्य अकादमीचा सर्वोच्च सन्मान
ठाणे : गेली सहा दशके वेद राही सातत्याने उर्दू, डोगरी आणि हिंदी भाषेत सृजनशील लेखन करणारे, चित्रपट आणि साहित्यात सहा दशकांहून अधिक काळ गाजवलेल्या गाजविणारे, पाच चित्रपटांच्या दिग्दर्शनासह २५ चित्रपटांचे लेखन केलेले प्रख्यात डोगरी लेखक, विचारवंत, कवी, दिग्दर्शक आणि चित्रपट निर्माते ९१ वर्षीय वेद राही यांना आज साहित्य अकादमीचा सर्वोच्च सन्मान असलेली साहित्य अकादमी फेलोशिपने त्यांच्या निवासस्थानी सन्मानित करण्यात आले.
प्रशस्तीपत्रासह, ताम्रपट, शाल , पुष्पगुच्छ साहित्य अकादमीचे अध्यक्ष माधव कौशिक यांच्या हस्ते, आणि सचिव के. श्रीनिवासराव, महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष प्रा. डॉ. नरेंद्र पाठक यांच्या उपस्थितीत हा पुरस्कार देण्यात आला. श्रीनिवासराव यांनी सुरुवातीला प्रशस्तीपत्राचे वाचन केले. आपल्या भावना व्यक्त करताना राही म्हणाले की, आज मला माझ्या वडिलांची खूप आठवण येत आहे, मला जे आवडत होतं ते त्यांनी मला करून दिलं, त्यांच्यामुळे मी इथे आजवर पोहोचलो. आज मला फेलोशिपने सन्मानित करण्यात आलं याचा अतिशय आनंद होत आहे. आपण प्रामाणिकपणे काम करत राहिलो तर त्याचे फळ आपल्याला मिळतेच.
कौशिक म्हणाले की, राही यांनी सिनेमा आणि साहित्य यांच्या मधला सेतूचे काम केले आहे. आता कोणता मोठा लेखक नाही जो सिनेमांमध्ये साहित्य आणू शकेल. आजचा क्षण महत्वाचा आणि ऐतिहासिक आहे. यावेळी राही यांच्या दोन मुली, जावई, नातू, नातसून आधी उपस्थित होते. १९८३ मध्ये डोगरी लघुकथा संग्रहासाठी त्यांना साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला आहे .