नाल्याच्या पाण्यात अडकलेल्या म्हशीची सुुखरुप सुटका, ठाण्यातील घटना
By जितेंद्र कालेकर | Updated: July 27, 2023 23:59 IST2023-07-27T23:59:04+5:302023-07-27T23:59:19+5:30
आपत्ती व्यवस्थापन विभागासह आपत्ती प्रतिसाद दलाने राबविले मदतकार्य

नाल्याच्या पाण्यात अडकलेल्या म्हशीची सुुखरुप सुटका, ठाण्यातील घटना
जितेंद्र कालेकर, लोकमत न्यूज नेटवर्क, ठाणे: घोडबंदर रोडवरील आनंदनगरमधील मुच्छला कॉलेजजवळील तुडूंब भरलेल्या नाल्यात अडकलेल्या एका म्हशीची ठाणे महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागासह आपत्ती प्रतिसाद दलाने सायंकाळी ७.३० वाजण्याच्या सुमारास सुखरुप सुटका केली. या मदतकार्यामुळे म्हशीच्या मालकाने समाधान व्यक्त केले आहे.
आनंदनगर भागातील मुच्छला कॉलेजजवळील नाल्यामध्ये पाण्याच्या प्रवाहाबरोबर वाहत येऊन ही म्हैस अडकल्याची माहिती ठाणे महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाला स्थानिक रहिवाशी पंकज पाटील यांच्याकडून माहिती मिळाली होती. त्याचआधारे आपत्ती व्यवस्थापन विभागासह आपत्ती प्रतिसाद दलाने राबविलेल्या मदतकार्यात एका खाजगी हायड्राच्या मदतीने म्हशीला बाहेर काढून तिची सुखरूप सुटका केल्याची माहिती सूत्रांनी दिली.