खड्ड्यात पडलेल्या दोन गाईंची सुखरूप सुटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2021 04:40 IST2021-03-21T04:40:14+5:302021-03-21T04:40:14+5:30
मुंब्रा : दोन जलवाहिन्यांमध्ये असलेल्या मोकळ्या खड्ड्यामध्ये पडलेल्या दोन गाईंची अग्निशमन दलाच्या जवानांनी सुखरूप सुटका करून त्यांची रवानगी नवी ...

खड्ड्यात पडलेल्या दोन गाईंची सुखरूप सुटका
मुंब्रा : दोन जलवाहिन्यांमध्ये असलेल्या मोकळ्या खड्ड्यामध्ये पडलेल्या दोन गाईंची अग्निशमन दलाच्या जवानांनी सुखरूप सुटका करून त्यांची रवानगी नवी मुंबईतील गुरांच्या कोंडवाड्यात केली. शनिवारी दुपारी तीन वाजता कल्याणफाटा परिसरातून गेलेल्या दोन जलवाहिन्यांच्या खड्ड्यांमध्ये या गाई पडल्याची माहिती अग्निशमन दलाच्या जवानांना मिळाली. घटनास्थळी पोहोचलेल्या शीळ, नवी मुंबई, एमआयडीसीच्या अग्निशमन दलाच्या जवानांनी साधारण एक तासाच्या प्रयत्नांनंतर दोघींना बाहेर काढले. या घटनेत त्यांच्या पायांना किरकोळ जखमा झाल्या होत्या, अशी माहिती ठामपाच्या आपत्कालीन विभागाचे प्रमुख अधिकारी संतोष कदम आणि शीळ अग्निशमन दलाचे केंद्र अधिकारी पी.डी. पाटील यांनी दिली.