शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

साधू हत्याकांडातील आरोपी कॉन्फरसिंगद्वारे विवाहात, तात्पुरता जामीन मात्र फेटाळला 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2023 14:20 IST

पालघरच्या कासा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील गडचिंचले गावाजवळ १६ एप्रिल २०२० रोजी  चोर-दरोडेखोरांच्या अफवेतून गुजरातमधील सुरत  येथे  अंत्यसंस्कारासाठी जात असलेल्या दोन साधू आणि त्यांच्या वाहनचालकाची निर्घृणपणे दगडाने ठेचून हत्या झाली होती.

ठाणे : पालघर जिल्ह्यातील साधूंच्या सामूहिक हत्याकांड प्रकरणातील एक आरोपी विष्णू भवर (५४) याला मुलीच्या विवाहासाठी व्हिडीओ कॉन्फरसिंगद्वारे उपस्थितीला ठाण्याचे  अतिरिक्त सत्र न्यायाधीश अभय शिर्सेकर यांनी अनुमती दिली. त्याचवेळी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, त्यामुळे त्याने या लग्नासाठी मागितलेला दोन दिवसांचा तात्पुरता जामीन मात्र न्यायालयाने फेटाळला आहे. 

पालघरच्या कासा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील गडचिंचले गावाजवळ १६ एप्रिल २०२० रोजी  चोर-दरोडेखोरांच्या अफवेतून गुजरातमधील सुरत  येथे  अंत्यसंस्कारासाठी जात असलेल्या दोन साधू आणि त्यांच्या वाहनचालकाची निर्घृणपणे दगडाने ठेचून हत्या झाली होती. या हत्याकांडात १००  हून अधिक जण अटकेत आहेत. त्यातील एक आरोपी  भवर  याने डहाणू तालुक्यातील पिंपळशेत पाड्यातील गावठाण येथे मुलीच्या लग्नासाठी ३ ते ६ फेब्रुवारीदरम्यान तात्पुरता जामीन मिळण्याची मागणी न्यायालयाकडे  केली होती. 

या खटल्यात १५१ आरोपी आहेत. त्यातील काही जणांनी यापूर्वी जामिनासाठी मुंबई उच्च न्यायालयाकडे केलेले अर्ज उच्च न्यायालयाने नाकारले आहेत, हे या खटल्यातील सरकारी वकील ॲड. संजय मोरे यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणले.  तसेच लग्न डहाणू तालुक्यात दुर्गम भागात आहे.  या सोहळ्यास पोलिसांच्या निगराणीत आरोपी हजर राहिला तरी गावकऱ्यांचा रोष असल्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता असल्याचा युक्तिवाद सहायक सरकारी अभियोक्ता संजय मोरे यांनी शनिवारी केला होता.  

टॅग्स :marriageलग्नjailतुरुंगCourtन्यायालय