सुडापोटी स्फोटके लपवलेल्यांना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2017 05:55 IST2017-08-18T05:55:03+5:302017-08-18T05:55:05+5:30
सुडापोटी घराजवळ स्फोटके लपव-या दोघांना शीळ-डायघर पोलिसांनी बुधवारी अटक केली. अवघ्या आठ दिवसांपूर्वी अशीच घटना मुंब्रा येथे घडली होती.

सुडापोटी स्फोटके लपवलेल्यांना अटक
मुंब्रा : सुडापोटी घराजवळ स्फोटके लपव-या दोघांना शीळ-डायघर पोलिसांनी बुधवारी अटक केली. अवघ्या आठ दिवसांपूर्वी अशीच घटना मुंब्रा येथे घडली होती.
शीळफाटा भागातील मुनिसा चाळीत राहणाºया अन्वर अली मन्सुरी ऊर्फ गुड्डू याचे इंदू सिंगबरोबर काही दिवसांपूर्वी भांडण झाले होते. इंदू सिंगने याप्रकरणी पोलिसात तक्रारही दिली होती. त्यामुळे संतापलेल्या गुड्डूने इंदू सिंगच्या कुटुंबाला त्रास व्हावा, या हेतूने ठाण्यात राहणाºया राजू दिवे ऊर्फपप्पू याच्याकडून त्याने स्फोटके विकत घेतली. लकी कम्पाउंडजवळ राहणाºया इंदू सिंगच्या घराजवळ लपवली. याप्रकरणी गुड्डू आणि राजू दिवे यांना अटक झाली.