सासूनं जावयाची गळा दाबून केली हत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2017 16:07 IST2017-07-28T16:07:54+5:302017-07-28T16:07:58+5:30

मुलीला झालेली जुळी मुले सासुरवाडीहून जबरदस्तीने आणल्याचा रागातून सासूने आपल्या जावयाचा गळा घोटून खून केल्याची घटना डोंबिवलीच्या ठाकूरवाडी येथे गुरुवारी रात्री घडली.

saasauunan-jaavayaacai-galaa-daabauuna-kaelai-hatayaa | सासूनं जावयाची गळा दाबून केली हत्या

सासूनं जावयाची गळा दाबून केली हत्या


डोंबिवली, दि. 28 - मुलीला झालेली जुळी मुले सासुरवाडीहून जबरदस्तीने आणल्याचा रागातून सासूने आपल्या जावयाचा गळा घोटून खून केल्याची घटना डोंबिवलीच्या ठाकूरवाडी येथे गुरुवारी रात्री घडली. पोलिसांनी अनिता चांदू वळंदे (52) हिला तात्काळ मुंब्र्यातून आणून गजाआड केले. कल्याण कोर्टात शुक्रवारी हजर केले असता कोर्टाने अधिक तपासासाठी तिला पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.
रवी रमेश सोलंकी (25) असे मृत जावयाचे नाव असून तो ठाकूरवाडीतील फुलेनगर झोपडपट्टीत राहतो. गोपी टॉकीज जवळ फुटपाथवर फूल विक्री करणाऱ्या रवीचे लग्न मुंब्र्यातील रेतीबंदरला असलेल्या पंजाबी कॉलनीत राहणाऱ्या सोनाबाई (23) हिच्याशी 2 वर्षांपूर्वी झाले. गर्भवती राहिलेली सोनाबाई ही माहेरी 10 महिन्यापासून राहत होती. 4 महिन्यांपूर्वी ती प्रसूत झाली. प्रसूतीनंतर तिला जुळी मुले झाली. 4 महिने झाले तरी ती सासरी यायचे नाव घेत नव्हती. रवी सासुरवाडीला पत्नीला आणण्यासाठी गेला असता त्याला सासू अनिता हिने वाद घातला. त्यामुळे रवी हा काल (गुरूवारी) सकाळी सासुरवाडीत गेला व आपली जुळी मुले घेऊन डोंबिवलीत दुपारी एकच्या सुमारास आला. त्याच दिवशी रात्री 11 वाजता घरातील सर्वजण जेवण करण्याच्या तयारीत असतानाच सासू अनिता आणि पत्नी सोनाबाई या घरी आल्या. सोनाबाई जुळ्या मुलांना घेऊन घराबाहेर पळाली, तर सासू अनिता हिने गळा घोटून रविचा खून केला. या प्रकरणी मृत रवीची आई मनुबाई सोलंकी (58) हिच्या तक्रारीनंतर विष्णूनगर पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला. त्यानंतर पोलिसांनी अनिता वळंदे हिला अटक केली.

Web Title: saasauunan-jaavayaacai-galaa-daabauuna-kaelai-hatayaa

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.