शहरं
Join us  
Trending Stories
1
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
2
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
3
BMC निवडणुकीपूर्वी महायुतीत ट्विस्ट! भाजपा-राष्ट्रवादी नेत्यांची बैठक, शिंदेसेनेला डच्चू?
4
इम्रान खान आणि बुशरा बीबीला १७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा; 'तोशाखाना-२' प्रकरणात पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना मोठा धक्का!
5
Infosys ADR News: इन्फोसिसच्या एडीआरमध्ये ४० टक्क्यांची तेजी; ट्रेडिंगही थांबवलं, पाहा नक्की काय आहे प्रकरण
6
२००० किमी दूर रशियाच्या जहाजावर युक्रेनचा सर्वात मोठा हल्ला; याचा बदला घेणारच, पुतिन संतापले
7
ठाकरेंना जय महाराष्ट्र, भाजपचा आणखी एक धक्का! लोकसभा लढवणारे संजोग वाघेरेंचा मोठा निर्णय
8
“सावकारांचे रॅकेट विदर्भ-मराठवाड्यात सक्रिय, महायुती सरकार शेतकरी विरोधी”: विजय वडेट्टीवार
9
“काँग्रेसमध्ये पाठिंबा नाही, काम करणे कठीण; शिंदेसेनेत येताच महिला नेत्यांनी सगळे सांगितले
10
मल्लिका शेरावतने डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत व्हाईट हाऊसमध्ये केलं ख्रिसमस डिनर; फोटो केले शेअर
11
"आता टॅरिफ माझा 5वा आवडता शब्द...!"; असं का म्हणाले डोनाल्ड ट्रम्प? अमेरिकेसाठी केली मोठी घोषणा
12
जागांवर तडजोड नाही, शिंदेसेना ठाम, भाजपाही मागे हटेना; अहिल्यानगरमध्ये महायुतीत फूट पडणार?
13
"मी शाहरुख खान, कृपया मला कॉल कर...", राधिकाला आलेला किंग खानचा मेसेज; म्हणाली...
14
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
15
Google नं पहिल्यांदाच आणलं क्रेडिट कार्ड, लगेच मिळणार कॅशबॅक आणि रिवॉर्ड; काय आहे खास?
16
अयोध्या राम मंदिरात ७० नवे पुजारी घेतले जाणार, ट्रस्टचा निर्णय; परिसरातील मंदिरात सेवा करणार
17
२१ डिसेंबर रोजी सुरु होणार पौष मास 'भाकड मास' का म्हटला जातो? शुभ कार्यालाही लागतो विराम!
18
पतीनं पत्नीकडून घरखर्चाचा हिशोब मागणं क्रूरता?; सुप्रीम कोर्टाने सुनावला महत्त्वाचा निकाल
19
Mumbai Crime: शीतपेयातून गुंगीचा पदार्थ, मुंबईत अल्पवयीन मुलींवर ४५ वर्षाच्या व्यक्तीने...; व्हिडीओही बनवला
20
Post Office ची धमाल स्कीम, व्हाल मालामाल; मॅच्युरिटीवर मिळतील ४० लाख रुपये, किती गुंतवणूक करावी लागणार?
Daily Top 2Weekly Top 5

रेस्टॉरंट बार, ढाबे बंद असल्याने मद्यपींची धरणक्षेत्र, नदीकिनारी धाव; उपद्रवामुळे स्थानिक त्रस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2021 12:55 IST

ठाणे-पालघर जिल्ह्यातील ग्रामीण भागात अनेक धरणे, नद्या आहेत.

वासिंद : सध्या कडक लॉकडाऊन असल्यामुळे रेस्टॉरंट बार, ढाबे बंद आहेत. त्यामुळे मद्यपींची काेंडी हाेत असून पार्ट्यांसाठी ते धरण क्षेत्र, नदी-ओहळांच्या काठांचा आसरा घेत आहेत. मात्र, या मद्यपींच्या उपद्रवामुळे निसर्गरम्य भागात दारूच्या बाटल्या, कचऱ्याचा ढीग जमा हाेत आहे. काही जण तेथेच बाटल्या फाेडून टाकत असल्यामुळे त्याचा त्रास या परिसरात फरफटका मारण्यासाठी येणाऱ्या इतर नागरिकांना हाेत आहे. अनेकदा कायदा-सुव्यवस्थेचाही प्रश्न निर्माण हाेत आहे.

ठाणे-पालघर जिल्ह्यातील ग्रामीण भागात अनेक धरणे, नद्या आहेत. मासेमारी आणि शेती हे पारंपरिक व्यवसाय येथे केले जातात. सध्या कोरोना साथरोगमुळे रेस्टॉरंट बार, धाबे बंद आहेत. त्यामुळे मद्यपींनी आपला माेर्चा धरण क्षेत्र, नदी-ओहळाकडे वळवला आहे. तेथे हाेणाऱ्या पार्ट्यांनंतर दारूच्या बाटल्या, चाखणा व जेवणाचे साहित्य तेथेच पडून असतात. यामुळे निसर्गस्थळाचे नुकसान हाेत आहे. मत्स्य व्यावसायिक, शेतकरी, फेरफटका मारण्यासाठी येणाऱ्या नागरिकांना याचा त्रास सहन करावा लागत आहे. अनेक जण नशेतच पाण्यात उतरतात. त्यामुळे पाण्यात बुडण्याच्या घटनाही घडत आहेत. सध्या कोरोनामुळे सर्व शासकीय यंत्रणा व्यग्र आहेत. त्यामुळे मद्यपींना धरणक्षेत्र, नदी-ओहळ परिसरात पार्ट्या झोडण्यास माेकळे रान मिळत आहे.

पार्ट्या करण्यासाठी येणाऱ्यांना पाेलिसांचा चाेप

 शहापूर तालुक्यातील भातसा धरणाच्या नदीपात्रामध्ये पार्ट्या करून धिंगाणा घालणाऱ्यांना रविवारी पोलिसांनी चांगलाच चोप दिला. दोन वर्षांपासून कोरोनाची महामारी असतानाही या धरणाच्या खाली नदीपात्रात ठाणे जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणावर लोक पार्ट्या करण्यासाठी येत होते. सजिवली, सावरशेत येथील ग्रामस्थ, खासकरून महिलांना त्रास सहन करावा लागत हाेता. अखेर या कारवाईमुळे या प्रकारांना आळा बसेल, असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. 

दारू पिऊन काचेच्या बाटल्या तेथेच फाेडणे, त्याच्या काचा पाण्यात टाकणे असे प्रकार घडत हाेते. यासंदर्भात ग्रामपंचायतीतर्फेही तक्रार करण्यात आली होती. मात्र त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. ‘लाेकमत’मधून अनेकदा बातम्या प्रसिद्ध करून या गैरप्रकारांकडे लक्ष वेधण्यात आले हाेते. साजिवली गावातील ग्रामपंचायत सदस्या नीता शिरोसे व त्यांचे पती तुकाराम शिरोसे यांनी भातसानगरमधील अधिकाऱ्यांशी संपर्क साधून या बेशिस्त नागरिकांना अद्दल घडवावी, अशी मागणी केली. अधिकाऱ्यांनी त्वरित शहापूर पाेलिसांशी संपर्क साधून या प्रकाराबाबत तक्रार केली. पाेलिसांनी रविवारी सायंकाळी या पार्ट्या करणाऱ्या व्यक्तींना चांगलाच चाेप देऊन पिटाळून लावले. या कारवाईनंतर ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे.

सध्या शासनाने जमावबंदी लागू केली आहे. शिवाय, निसर्गरम्य परिसरात कचरा करणे, बाटल्या फाेडणे यासारखी कृत्ये ही दंडनीय गुन्हाच ठरवायला हवा.अशा लोकांवर पोलीस प्रशासनाने कडक कारवाई करायला हवी. अन्यथा कायदा-सुव्यवस्थाही बिघडू शकते.    सुजाण सुरेश वडके, जागृत नागरिक,     वासिंद-शहापूर

धरणक्षेत्र, नदीकाठी अशा प्रकारे पार्ट्या करणाऱ्यांवर नजर ठेवण्यासाठी विशेष पथक तयार करून त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येणार आहे. त्यामुळे अशाप्रकारांना भविष्यात निश्चितच आळा बसेल.    - नवनाथ ढवळे, उपविभागीय पोलीस     अधिकारी, शहापूर

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसhotelहॉटेलthaneठाणे