शहरं
Join us  
Trending Stories
1
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
2
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
3
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
4
इस्रायलचा येमेनच्या बंदरावर मोठा हवाई हल्ला, हुथी बंडखोरांचा दावा!
5
IND vs PAK मॅचनंतर वातावरण तापलंय! बॉयकॉटची धमकी देणाऱ्या पाक संघानं घेतला हा निर्णय
6
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
7
जीएसटीत कपात अन् बँकांत गर्दी...! लोक कार लोन रद्द करू लागले, काय आहे कारण...
8
'या' मुस्लीम देशावर मोठा हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल, दिला बंदरं रिकामी करण्याचा अल्टीमेटम!
9
कोराडी परिसरात पर्यावरण पर्यटन प्रकल्पाला प्रतिवर्ष १ रूपये भाडे तत्वावर जमीन मंजूर
10
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
11
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
12
केवळ ₹11,000 मध्ये आपली बनवा 'ही' नवी ढासू SUV, 52 भाषांसह AI असिस्टंन्ट अन् बरंच काही;  कंपनीनं सुरू केली बुकिंग
13
Nagpur Rains : अंदाज खरा ठरला ! मुसळधार पावसाने नागपूरकरांना झाेडपले; अजून किती दिवस असाच बरसणार?
14
Shalarth ID Scam : 'ते' ६३२ शिक्षक, मुख्याध्यापक तुरुंगात जाणार? शिक्षण क्षेत्रातील सर्वात माेठा घोटाळ्याची झाडाझडती सुरु
15
Video - "तीळ कुठे आहे हे Gemini ला कसं कळलं?"; तरुणीने सांगितला धक्कादायक अनुभव
16
Video: मोहम्मद युसूफने खालची पातळी गाठली! लाईव्ह टीव्हीवर सूर्यकुमारच्या नावाचा अभद्र उच्चार...
17
“चुकीच्या गोष्टी सुरू, खाडाखोड करून कुणबी नोंदी; रिपोर्ट मुख्यमंत्र्यांना देणार”: छगन भुजबळ
18
पडळकरांवर गुन्हा दाखल करा, अन्यथा जीवाचे बरे-वाईट करू; कुणी दिला इशारा, नेमके प्रकरण काय?
19
IND vs PAK हस्तांदोलन वादावर ऑस्ट्रेलियाचा रिकी पॉन्टींग स्पष्ट बोलला, पाकिस्तानला झापलं...
20
मेघालयमध्ये मोठी राजकीय उलथापालथ, ८ मंत्र्यांनी दिला राजीनामा, नेमकं कारण काय?

सत्ताधारी-विरोधकांचे मनोमीलन? युतीच्या घोषणेमुळे काँग्रेस एकाकी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2019 04:13 IST

मीरा-भार्इंदर महापालिका : भाजपा-सेना युतीमुळे सत्तेचा समतोल बिघडला, काँग्रेस एकाकी

राजू काळे।

भार्इंदर : येत्या लोकसभा व विधानसभा निवडणुका भाजपा व शिवसेना या मित्रपक्षांनी एकत्रित लढवण्याची घोषणा केल्याने मीरा-भार्इंदर महापालिकेत जेथे भाजपा हा सत्ताधारी तर शिवसेना प्रमुख विरोधी पक्ष आहे तेथील स्थानिक राजकारणात या दिलजमाईचे परिणाम लवकरच दिसून येण्याची चिन्हे आहेत. अनेक छोट्या-मोठ्या कारणांवरुन एकमेकांना पाण्यात पाहणाऱ्या या दोन्ही पक्षाच्या नेत्यांना आता हातात हात गुंफून प्रचार करायला लागणार असल्याने या दोन शहरांत काँग्रेसला एकाकी झुंज द्यावी लागणार असल्याचे राजकीय विश्लेषकांकडून बोलले जात आहे.

केंद्रासह राज्य सरकारात भाजपासोबत असलेल्या शिवसेनेने गेल्या काही दिवसांत अत्यंत आक्रमक भूमिका घेऊन परस्परांवर हल्ले सुरु केल्यानंतर मीरा-भाईंदर या महापालिकेत जेथे हे दोन्ही पक्ष सत्ताधारी व विरोधक आहेत तेथे उभयतांमधील संघर्ष अधिकच प्रखर झाला होता. अचानक परस्परविरोध व आक्रमक भाषा गुंडाळून भाजपा व शिवसेना या दोन्ही पक्षांनी युती जाहीर केल्याने मीरा-भाईंदरमधील राजकारणाचा समतोलच बिघडला आहे. २०१७ मधील मीरा-भार्इंदर महापालिका निवडणुकीत व तद्नंतर सतत एकमेकांच्या विरोधात उभ्या ठाकलेल्या भाजपा व शिवसेनेत समझोता होणार असल्याचे सूतोवाच शिवसेनेचे आ. प्रताप सरनाईक यांनी अलीकडेच एका कार्यक्रमात केले होते. दोन्ही पक्षांची युती झाल्याने यापुढे भाजपाचे आ. नरेंद्र मेहता व शिवसेना आ. प्रताप सरनाईक यांनी आपापसातील वादविवाद विसरुन काम करावे लागणार आहे.पालिका निवडणुकीत भाजपा प्रथम क्रमांकाचा पक्ष ठरल्याने पालिकेची सत्ता भाजपाच्या हाती आली तर शिवसेना विरोधी पक्ष झाली. भाजपाने हक्काच्या पदांसाठी तसेच आवश्यक दालनासाठी शिवसेनेला झुलत ठेवले. शिवसेनेची गळचेपी केल्याने स्थानिक स्तरावर दोन्ही पक्षांच्या नगरसेवक, पदाधिकारी व कार्यकत्यांमध्ये खुन्नस निर्माण झाली आहे. भाजपाने काही विकासकामे जाणीवपूर्वक शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात करण्याचा प्रयत्न केला.अर्थातच त्याला शिवसेनेने जोरदार विरोध करुन ती कामे रखडवली. जलकुंभ लोकार्पणावरुन उभय पक्षांमध्ये झालेला राडा असो की शिक्षणासाठी राखीव असलेल्या भूखंडावर बाजार थाटण्याचा प्रकार. शिवसेनेनी भाजपाला रोकठोक उत्तर दिले. आता युतीनंतर भाजपाच्या त्याच विकास कामांवर मते मागण्याची वेळ शिवसेनेवर आली आहे.काँग्रेस मात्र एकाकी पडली आहे. सत्ताधारी भाजपा व शिवसेनेच्या एकत्रित ताकदीशी काँग्रेसला दोन हात करावे लागणार आहेत.भाजपाने शहराच्या हितासाठी आणलेल्या विषयांना शिवसेना नक्कीच पाठिंबा देईल. शहराच्या हितासाठी नसलेल्या पण स्वार्थासाठी आणलेल्या विषयांना शिवसेना सभागृहात तसेच सभागृहाबाहेर कायम विरोधच करील.- प्रताप सरनाईक,आमदार, शिवसेनायुतीमुळे भाजपाच्या सबका साथ, सबका विकास धोरणाला शिवसेना सहकार्य करुन स्थानिक पातळीवर युती धर्म पाळेल, अशी अपेक्षा आहे. शिवसेनेने भाजपाला सहकार्य केल्यास शहराचा विकास सहज होईल.- चंद्रकांत वैती, उपमहापौर,मीरा-भाईंदरयुती धर्म पाळण्यासाठी विरोधी पक्षातील शिवसेनेने भाजपाला सहकार्य करण्याचा निर्णय घेतल्यास काँग्रेस विरोधकांची भूमिका वठवेल. शहराच्या हितासाठी आम्ही कटीबद्ध असल्याने काँग्रेस कधीच एकाकी पडली नाही व पडणारही नाही. यंदाची युती ही केवळ आगामी निवडणुकांतील अ‍ॅडजस्टमेंट आहे. त्यानंतर पुन्हा दोघांत धुसफूस सुरूच राहणार आहे.- जुबेर इनामदार, काँग्रेस गटनेता

टॅग्स :Mira Bhayanderमीरा-भाईंदरthaneठाणे