शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात हल्ल्याची तयारी, पाकिस्तानी कनेक्शन उघड; दहशतवादी बिलालच्या चौकशीतून धक्कादायक खुलासे
2
Operation Pimple : सैन्याला मोठं यश! कुपवाडामध्ये घुसखोरी करणाऱ्या २ दहशतवाद्यांचा खात्मा
3
शेजाऱ्याशी लफडं, गुपित पतीला कळलं; प्रियकरासोबत मिळून पत्नीने केली हत्या, मृतदेह नदीत फेकला
4
उद्धव ठाकरेंसमोर व्यथा मांडताना ९० वर्षीय शेतकऱ्याला रडू कोसळले; म्हणाले, “कर्जमाफी...”
5
IND vs AUS 5th T20I : तिलक वर्माला बसवलं बाकावर! टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये रिंकूची एन्ट्री
6
जरीन खान यांच्यावर हिंदू पद्धतीने झाले अंत्यसंस्कार, मुलगा झायेदने दिला अग्नी; कारण...
7
कतरिना कैफचे सासरे 'आजोबा' बनल्यानंतर झाले भावुक! 'ज्युनिअर कौशल'साठी शेअर केली प्रेमळ पोस्ट
8
"महाराष्ट्र लुटून खा... आम्ही...! मंत्री सरनाईकांनी २०० कोटींची जमीन ३ कोटीत घेतली", वडेट्टीवारांचा गंभीर आरोप
9
राहू-केतू गोचर २०२५: राहू केतू तसे तापदायकच, पण नोव्हेंबरमध्ये 'या' ८ राशींवर होणार मेहेरबान!
10
Railway: धावत्या ट्रेनला गरुडाची समोरून धडक, जखमी होऊनही लोको पायलटनं प्रसंगावधान दाखवलं, नाही तर...
11
अजबच...! नकळत लग्न झालं...! अमेरिकन पॉप स्टारचा मलेशियन सुलतानशी 'निकाह', आता 'तलाक'ची मागणी; नेमकं प्रकरण काय?
12
“प्रत्येक भारतीयाला वंदे भारत ट्रेनचा अभिमान”: PM मोदी, वाराणसीतून ४ नव्या सेवांचे लोकार्पण
13
"ओए होए छोटा छावा...", विकी कौशल-कतरिना कैफच्या पोस्टवर संतोष जुवेकरची कमेंट
14
७ वर्षांनंतर अनुष्का शर्मा करणार कमबॅक! 'चकदा एक्सप्रेस' OTTवर होणार रिलीज?
15
एका चपातीमध्ये किती कॅलरीज असतात, वजन कमी करण्यासाठी रात्री किती खाव्यात?
16
Crime:  "काका वारले, मुलंही सारखी आजारी पडतात", जादूटोण्याचा संशयातून जन्मदात्या आईची हत्या!
17
IND vs AUS:"कभी शेर को घास खाते हुए देखा है क्या?" सूर्या भाऊनं केली अभिषेकची थट्टा; व्हिडिओ व्हायरल
18
कतरिना कैफने ४२ व्या वर्षी दिला मुलाला जन्म, कशी आहे तब्येत? रुग्णालयाने शेअर केलं अपडेट
19
Video: मराठी अभिनेत्रींनी केलं सोहम बांदेकरचं केळवण; आदेश-सुचित्रा बांदेकरांची होणारी सून कोण?
20
Gardening Tips: बटाट्याची सालं फेकू नका, रोपांसाठी ठरते सुपरफूड; वापर कसा करायचा ते पाहा 

सोसायटीच्या आवारात यापुढे मज्जाव पालिकेने तयार केली सोसायंटीसाठी नियमावली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2020 16:04 IST

ठाणे शहरातील सोसायटीधारकांना शिस्त लावण्यासाठी पालिकेने आता सोसायटींसाठी एक नियमावली तयारी केली आहे. या माध्यमातून सोसायटींमधील सदस्यांनी नियमावलींचे उल्लंघन केल्यास सोसायटीच्या अध्यक्ष आणि सचिवांवर गुन्हे दाखल केले जातील असे पालिकेने स्पष्ट केले आहे.

ठाणे : कोरोना बाधीत रुग्णांची संख्या ठाण्यात दिवसेंदिवस वाढत असल्याचे दिसत आहे. त्यामुळे महापालिका प्रशासनाकडून या आजारावर नियंत्रण मिळविण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. याचाच एक भाग म्हणून आता महापालिकेच्या माध्यमातून शहरातील सर्व सोसायटींसाठी नियमावली तयार केली आहे. त्यानुसार यापुढे कोणालाही इमारतीच्या गच्चीवर, कॉमन एरिया, पार्कींगच्या भागात एकत्रित दिसत आहेत. त्यामुळे असे प्रकार आता आढळून आले तर संबधीत सोसायटीच्या अध्यक्ष तसेच सचिव यांच्यावर प्रवेश देऊ नये, एकत्रित गच्चीवर दिसू नये अशा सुचनाही केल्या आहेत. असा प्रकार घडल्यास संबधीत सोसायटीचे अध्यक्ष आणि सचिवांवर गुन्हे दाखल केले जातील असे पालिकेने स्पष्ट केले.                      कोरोनावर आळा बसावा यासाठी पालिकेच्या माध्यमातून विविध उपाय योजना केल्या जात आहेत. आता याचाच एक भाग म्हणून पालिकेने सोसायटीधारकांसाठी एक नियमावली तयार केली आहे. ती नियमावली आता शहरातील प्रत्येक सोसायटींना देण्यात आली आहे. या नियमावलीमध्ये प्रत्येक सोसायटीने काय करावे काय करु नये याची नियम सांगण्यात आले आहेत. त्यानुसार प्रत्येक सोसायटीचा अध्यक्ष आणि सचिव याने कोरोनाच्या दृष्टीने नियमावली तयार करावी ती सोसायटीच्या सुचना फलकावर प्रसिध्द करावी, सोसायटीच्या कॉमन एरीया, पार्कींग व अन्य पेसेजमध्ये मॉर्निंग वॉक, इव्हनींग वॉकसाठी या भागांमध्ये जाऊ नये तसेच अत्यावश्यक कामाव्यतिरीक्त घराबाहेर पडू याची काळजी घ्यावी असेही नमुद करण्यात आले आहे. सोसायटीच्या एखाद्या सदस्याने देखील या निमयावलीकडे दुर्लक्ष केले तर त्याला सुरवातीला दंडात्मक कारवाई करावी, त्यानंतरही सभासद ऐकत नसले तर त्याच्या विरोधात नजीकच्या पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात यावी, सोसायटीमध्ये असलेल्या नर्सींग होम, दवाखाने, औषध दुकाने या ठिकाणी सोशल डिस्टेसींगचे पालन करण्यात यावे, त्यातही सोसायटीमधील एखादा नागरीक कोरोना बाधीत आढळला तर त्याच्या घरच्यांना अपमानास्पद वागणुक देऊ नये असेही या नियमावलीत स्पष्ट करण्यात आले आहे. या नियमावलींचे पालन न झाल्यास संबधींत सोसायटीचे अध्यक्ष व सचिव यांच्याविरोधात फौजदारी गुन्हा दाखल केला जाईल असेही पालिकेने स्पष्ट केले आहे. 

टॅग्स :thaneठाणेtmcठाणे महापालिकाcorona virusकोरोना वायरस बातम्या