शहरं
Join us  
Trending Stories
1
"चीनने भारताची जमीन बळकावली हे तुम्हाला कसं कळलं? तुम्ही खरे भारतीय असता तर…’’, सुप्रीम कोर्टाने राहुल गांधींना सुनावले खडेबोल  
2
'तो' खेळणार नाही असं इंग्लंडनेच सांगितलं होतं, पण आता बॅटिंग करणार; असं कसं? ICC नियमांत बसतं?
3
"२० वर्षांनी आम्ही भाऊ एकत्र येऊ शकतो, मग..."; मनसे मेळाव्यात राज ठाकरेंचा कार्यकर्त्यांना कानमंत्र
4
"माझ्या नादी लागू नका, पुराव्यासह फाईल्स उघडू..."; भाजपात प्रवेश करताच शिंदेसेनेच्या नेत्याला इशारा
5
"मुंबईत जो येईल त्याचं स्वागत करू..."; निशिकांत दुबेंबाबत देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
6
रॉयल एनफिल्डने चीनचे रेअर अर्थ मटेरिअल टाळले! नवीन धातू वापरला, ऑटो कंपन्या चकीत झाल्या...
7
काहीही करा, ‘हम नही सुधरेंगे’; CM देवेंद्र फडणवीसांचा क्लास वाया, वादग्रस्त विधाने सुरूच!
8
AI घेणार तुमच्या नोकरीची जागा? गुंतवणूकदार विनोद खोसला यांचा इशारा, म्हणाले यातून वाचायचं असेल तर..
9
‘झुकेगा नही’! ट्रम्प यांची धमकी, पण सरकार ठाम; अमेरिकेला भारताचं स्वतंत्र धोरण का खुपतंय?
10
मराठी अभिनेत्याचं साउथ इंडस्ट्रीत काम करण्याचं होतं स्वप्न, लॉकडाऊननंतर हैदराबाद गाठलं अन्...
11
चहा करताना 'ही' छोटीशी चूक कराल तर आयुष्याला मुकाल, योग्य पद्धत कोणती एकदा बघाच
12
ऑपरेशन महादेवमध्ये मारले गेलेले सगळे दहशतवादी पाकिस्तानीच! 'त्या' एका पुराव्याने समोर आली कुंडली
13
IND vs ENG: ३५ धावा की ४ गडी... पाचवी कसोटी निर्णायक वळणावर, 'हा' घटक भारतासाठी ठरेल 'गेमचेंजर'
14
ट्रम्प यांच्यासोबतची मैत्री तुटल्यानंतर मस्क मोठ्या अडचणीत; टेस्लाला द्यावे लागणार तब्बल २ हजार कोटी
15
ट्रम्पच्या जिगरी दोस्तावर पाकिस्तान का चिडला? पोस्ट लिहीत व्यक्त केला राग! शाहबाज शरीफ म्हणाले... 
16
"सचिन माझ्या मुलाचा बाप...", महिलेने दाखवला DNA रिपोर्ट; राजा रघुवंशीच्या घरात भलताच वाद
17
हृदयस्पर्शी! बाळासाठी वडील झाले वासुदेव, पुराच्या पाण्यातून काढली वाट, भावुक करणारा Video
18
Shravan 2025: शास्त्रानुसार, संसारी व्यक्तीने रुद्राक्षाची जपमाळ ओढावी, पण गळ्यात घालू नये!
19
रक्षाबंधन नेमके कधी आहे? शुभ मुहूर्त कोणता? पाहा, महत्त्व, महात्म्य अन् काही मान्यता
20
नोकरीसाठी विदेशात जायचंय तर पत्नीला भारतात ठेवा, अटीविरुद्ध ‘तो’ सुप्रीम कोर्टात

शेतक-यांच्या ‘समृद्धी’साठी नियमांत झाला बदल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 30, 2017 06:41 IST

मुंबई-नागपूर समृद्धी मार्गाचा फटका बसणा-या आणि एमएमआरडीए क्षेत्रात असल्याने कमी मोबदला मिळणा-या कल्याण आणि भिवंडी ग्रामीणमधील गावांना पाचपट मोबदला मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

कल्याण : मुंबई-नागपूर समृद्धी मार्गाचा फटका बसणा-या आणि एमएमआरडीए क्षेत्रात असल्याने कमी मोबदला मिळणा-या कल्याण आणि भिवंडी ग्रामीणमधील गावांना पाचपट मोबदला मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. राज्य सरकारच्या अलीकडच्याच निर्णयाने प्रकल्पातील अडथळे दूर होतील आणि विरोध कमी होईल, असा विश्वास लोकप्रतिनिधींना वाटतो. तसेच जिल्हा परिषद - पंचायत समितीच्या निवडणुकीतही शेतकºयांचा रोष कमी होईल, असे मानले जाते.समृद्धी मार्गात कल्याण तालुक्यातील फळेगाव, उशीद, दानबाव, नडगाव, पितांबरे पाडा, निंबवली, गुरवली, चिंचवली, राया, वासुंद्री या दहा गावातील ७०० शेतकºयांची जमीन जाणार आहे. या शेतकºयांचे सामायिक क्षेत्र खातेदार पकडल्यास हा आकडा तीन हजारांच्या घरात जातो. प्रकल्पासाठी ११९४.४ हेक्टर जमीन संपादीत करावी लागणार आहे. ही गावे मुरबाड मतदारसंघात येत असल्याने भाजपाचे आ. किसन कथोरे यांनी सरकार दरबारी पाठपुरावा केला. बाधित गावे ही एमएमआरडीए कार्यक्षेत्रात येत असल्याने त्यांना मिळणारा जमिनीचा मोबदला अत्यल्प होता. अन्य ठिकाणी जमीन संपादनासाठी जो नियम लागू केला जातो, त्याचा विचार करून या शेतकºयांनाही भरीव मोबदला द्यावा, अशी मागणी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली होती. ती विचारात घेऊन सरकारने वन, अर्थ आणि नगररचना विभागाच्या सचिवांची समिती स्थापन केली. तिच्या सूचनेनुसार मंत्रीमंडळाच्या बैठकीत एमएमआरडीए क्षेत्रातील गावांनाही अन्य क्षेत्राचाच दर लागू करण्याचा निर्णय घेतला आणि सरकारने २७ नोव्हेंबरला त्याची अधिसूचना काढली. त्यामुळे आता या गावातील शेतकºयांना, जागा मालकांना पाचपट अधिक दर मिळणार आहे.या निर्णयाबाबत आ. किसन कथोरे यांनी सांगितले, या निर्णयाचा उपयोग समृद्धी मार्गासाठी होणार आहे. कल्याण तालुक्यातील दहा गावातील प्रकल्पबाधित शेतकºयांना त्याचा फायदा होईलच; तर भिवंडी तालुक्यातील बाधित गावांनाही हा निर्णय फायदेशीर ठरणार आहे. त्याचबरोबर बडोदा एक्सप्रेस वे सुद्धा एमएमआरडीएच्या कार्यक्षेत्रातून जातो. हे तिन्ही प्रकल्प मुरबाड मतदारसंघाशी निगडीत असल्याने त्यासाठी सरकारकडे पाठपुरावा केला.अन्य प्राधिकरणांना लाभहा निर्णय एमएमआरडीएप्रमाणेच पुणे प्रदेश विकास प्राधिकरण, पिंपरी- चिंचवड, नवनगर विकास प्राधिकरण, सिडको, नागपूर सुधार न्यास यांनाही लागू होईल. त्यामुळे विशेष व क्षेत्र प्राधिकरणामधील प्रकल्पासाठी लागणाºया जागेसाठी भूसंपादनातील अडथळा दूर होतील. प्राधिकरणांच्या हद्दीतील विविध प्रकल्पांचे भूसंपादन जलद गतीने होईल.

टॅग्स :FarmerशेतकरीMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकार