शहरं
Join us  
Trending Stories
1
आमचा पक्ष काँग्रेसच, पण सांगलीत चिन्ह चोरीला गेले; विशाल पाटील यांची ‘लोकमत’ला मुलाखत
2
उपमुख्यमंत्र्यांनी काँग्रेसच्या नगरसेवकाला मारली थप्पड, भाजपाने शेअर केला व्हिडीओ 
3
स्टेशन मास्तरला लागली डुलकी, मिळाला नाही सिग्नल, स्टेशनवर खोळंबली ट्रेन, ड्रायव्हर हॉर्न वाजवून दमला, अखेर...
4
सडलेला तांदूळ, खराब नारळ, लाकडाचा भूसा, केमिकलने बनवायचे मसाले, 'असा' झाला पर्दाफाश
5
मी राजकारणातील सासू, तर अर्जुनराव हे माझी सून; रावसाहेब दानवे यांची टोलेबाजी
6
खुद्द अजित पवार उभे असते, तर... ; सुनेत्रा पवारांवरून सुप्रिया सुळेंचे महत्वाचे वक्तव्य
7
Godrej Family Tree: गोदरेज समूहाची 'अशी' झालेली सुरुवात, पाहा आज कुटुंबात कोण-कोण सांभाळतंय व्यवसाय?
8
स्वामी समर्थ पुण्यतिथी: शेकडो वर्षे लोटली, स्वामी आजही समस्त भक्तांच्या पाठीशी आहेत!
9
अक्षय्य तृतीयेला २ राजयोग: ६ राशींना लाभच लाभ, येणी मिळतील; नोकरीत संधी, लक्ष्मी शुभ करेल!
10
काय सांगता? आमदारांना मिळतो खासदारांपेक्षा अधिक पगार व भत्ते 
11
'त्यात चुकीचं काय?' साडी नेसण्यावरुन ट्रोल झाल्यानंतर ओंकार भोजनेने दिलं उत्तर
12
महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा; काँग्रेसकडून निवडणूक आयोगाकडे आचारसंहिता भंगाची तक्रार
13
लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील २ पक्षांचं अस्तित्व संपेल; पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
14
२६/११ हल्ला: कसाब आणि हेमंत करकरे आमने-सामने आले तेव्हा नेमकं काय घडलं? आरोपपत्रात नोंद आहे सर्व घटनाक्रम  
15
"वडिलांना सोडून जाण्याइतका मी पाषाणहृदयी नाही...", अजितदादांवर रोहित पवारांचा पलटवार
16
राजकारण राजकारणाच्या जागी, नाते नात्याच्या जागी; सुनेत्रा पवारांची बारामतीवर उत्तरे...
17
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजाची तेजीसह सुरुवात; कोटक बँकेत तेजी, टायटन आपटला
18
नोकराच्या घरी सापडलं कोट्यवधीचं घबाड; ऐन निवडणुकीत ED च्या कारवाईनं मोठी खळबळ
19
अमेठीत गोंधळ, काँग्रेस कार्यालयाबाहेर अनेक वाहनांची तोडफोड, भाजपावर आरोप
20
'नम्रतासाठी भूमिका लिहिल्या जातील...' सलील कुलकर्णींनी 'नाच गं घुमा'वर शेअर केली पोस्ट

आरटीआय कार्यकर्तीला न्यायालयीन कोठडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2018 12:20 AM

बांधकाम व्यावसायिक सुरेंद्र पाटील यांच्याकडे ५० लाखांची खंडणी मागितल्याच्या आरोपाखाली अटकेत असलेली माहिती अधिकार कार्यकर्ती चारुशीला पाटील हिला गुरु वारी

कल्याण : बांधकाम व्यावसायिक सुरेंद्र पाटील यांच्याकडे ५० लाखांची खंडणी मागितल्याच्या आरोपाखाली अटकेत असलेली माहिती अधिकार कार्यकर्ती चारुशीला पाटील हिला गुरु वारी कल्याण जिल्हा सत्र न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली. आरोपी पाटीलच्या वकिलांनी जामिनासाठी अर्ज न सादर केल्याने तिची रवानगी येथील आधारवाडी कारागृहात करण्यात आली.पाटील हिला खंडणीविरोधी पथकाने खंडणीतील काही रक्कम स्वीकारताना रविवारी रंगेहाथ अटक केली होती. कल्याण न्यायालयाने तिला १८ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली होती. गुरुवारी कोठडीची मुदत संपल्याने तिला पुन्हा न्यायालयात हजर केले होते. त्या वेळी सरकारी वकिलांनी पोलीस कोठडी वाढवण्याची विनंती केली. मात्र, पोलीस कोठडीची दिलेली मुदत पुरेशी होती, असे मत व्यक्त करत आरोपीच्या वकिलांनी सरकारी वकिलांची मागणी अमान्य करण्याची विनंती केली. दोन्ही बाजूंकडील मते जाणून घेतल्यानंतर न्यायालयाने आरोपी पाटीलला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली.दरम्यान, आरोपी पाटील हिने न्यायालयाच्या आवारात आपल्याला आणि सहकाºयांना शिवीगाळ आणि दमदाटी केल्याचा आरोप तक्रारदार सुरेंद्र पाटील यांनी केला आहे. याची तक्र ार महात्मा फुले चौक पोलीस ठाण्यात केली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.आमची नाहक बदनामीकेडीएमसी मुख्यालयातील राष्ट्रवादीच्या गटनेता कार्यालयातून आरोपी पाटील हिने अनेक तक्र ार अर्ज केल्याचे उघड झाले आहे. तक्रारदार पाटील व चारु शीला पाटील यांच्यातील देण्याघेण्याची बातचीतही तेथेच झाली आहे. गटनेता कार्यालयातील सचिव व शिपायालाही पोलिसांनी चौकशीस बोलावले होते.परंतु, या प्रकरणात पक्षाची बदनामी होत असल्याचे राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष रमेश हनुमंते म्हणाले. गटनेता कार्यालय असल्याने दररोज अनेक नागरिक येतात. त्यामुळे आमच्या पक्षाच्या गटनेत्याचा कार्यालयाचा जो उल्लेख सर्वत्र होत आहे, तो चुकीचा आहे.यासंदर्भात आम्ही केडीएमसी आयुक्त व पोलीस उपायुक्तांंची भेट घेणार आहोत. तसेच गटनेत्यांसमवेत प्रमुख पदाधिकाºयांना गुरुवारी बोलावून त्यांच्याशी चर्चा केल्याचे हनुमंते यांनी सांगितले.