शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाच्या डोक्यावर १.३२ लाखांचे कर्ज; ...तर कराचा बोजा अधिक वाढेल
2
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
3
त्यानं लग्नात दिलेलं वचन पाळलं, पत्नीला मृत्यूच्या दारातून खेचून आणलं! पण...; ऐकून डोळ्यांत येईल पाणी
4
महिलेचा दोन महिन्यांपूर्वी मृत्यू, मुलगा वापरत होता आईचं युपीआय अन् अचानक खात्यात आले अरबो रुपये!
5
ऐश्वर्यासोबत घटस्फोट घेतल्यानंतर धनुष या मराठमोळ्या अभिनेत्रीला करतोय डेट?, अशी मिळाली हिंट
6
PPF नाही, पैसे छापण्याची मशीन! दरवर्षी मिळेल ₹२,८८,८४२ चं जबरदस्त व्याज, पाहा सिक्रेट ट्रिक
7
मीरारोडच्या 'केम छो' बारवर धाड; १८ बारबालांसह एकूण ३६ जणांवर गुन्हा दाखल
8
आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ
9
गजलक्ष्मी समसप्तक योगात रक्षाबंधन: १० राशींना लॉटरी, सुख-सुबत्ता; भरभराट-भाग्योदय, वरदान काळ!
10
नोकरीत बिहारींचा पहिला हक्क; नवे ‘डोमिसाइल’ धोरण जाहीर
11
आरोप करणाऱ्या देशांनी आधी स्वतःकडे बघावे! ट्रम्पच्या टॅरिफ धमकीला सरकारचे थेट उत्तर
12
टॉयलेटमध्येही फोन वापरता? मग त्याला किती वेळा स्वच्छ ठेवता? धोका आधीच जाणून घ्या!
13
गरिबांसाठी भिडणाऱ्या, लढणाऱ्या नेत्याची एक्झिट, आदिवासींच्या हक्कांसाठी शिबू सोरेन यांनी दिला लढा
14
भारत अमेरिकेला फसवतोय, युक्रेन युद्धाला मदत करतोय
15
आम्ही दोघे भाऊ २० वर्षांनी एकत्र आलो, तुम्ही का भांडता? राज ठाकरेंनी पहिल्यांदा केले एकत्र येण्यावर भाष्य
16
‘चीन’वरून जुंपली : ‘गलवान’नंतर चीनबाबत सरकारने दिशाभूल केली, काँग्रेसचा हल्लाबोल
17
सच्चे भारतीय असाल, तर असे बोलणार नाहीत; राहुल गांधींना सुप्रीम कोर्टाने सुनावले; दिलासाही दिला
18
टीम इंडियाने दिला नवा मंत्र : BELIEVE...; भारताने ६ धावांनी मिळवलेल्या थरारक विजयाची कारणे, ६ प्रश्नांच्या उत्तरांमध्ये
19
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले

‘आरपीएफ’मुळे पुन्हा घडली मुले-पालकांची भेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2021 04:47 IST

लोकमत न्यूज नेटवर्क डोंबिवली : रेल्वे सुरक्षा दलाने (आरपीएफ) मागील सात महिन्यांत मध्य रेल्वेच्या विविध स्थानकांतून ३१० मुले आणि ...

लोकमत न्यूज नेटवर्क

डोंबिवली : रेल्वे सुरक्षा दलाने (आरपीएफ) मागील सात महिन्यांत मध्य रेल्वेच्या विविध स्थानकांतून ३१० मुले आणि १६७ मुली, अशा एकूण ४७७ मुलांचा शोध घेत, तर काहींची विविध ठिकाणांहून सुटका करत त्यांच्या पालकांशी पुन्हा भेट घडवून आणली. त्यासाठी चाईल्डलाईनसारख्या स्वयंसेवी संस्थांचे सहकार्य मिळाल्याचे सूत्रांनी सांगितले.

अनेक लहान मुले भांडणे किंवा काही कौटुंबिक समस्यांमुळे किंवा चांगल्या आयुष्याच्या किंवा ग्लॅमरच्या शोधात, त्यांच्या कुटुंबीयांना न कळवता रेल्वे स्थानकांवर आली होती. आरपीएफ जवानांना ते फलाटांवर, रेल्वे स्थानकांजवळ किंवा कधीकधी गाड्यांमध्येही फिरताना आढळले. आरपीएफमुळे ही मुले पुन्हा घरी परतल्याने त्यांच्या पालकांनी रेल्वेचे आणि आरपीएफचे आभार मानले आहेत.

या कामगिरीबाबत महाव्यवस्थापक अनिल कुमार लाहोटी म्हणाले की, पळून गेलेल्या मुलांशी मध्य रेल्वे संपर्क साधून, त्यांच्या समस्या समजून जाणून घेते. तसेच त्यांनी पुन्हा त्यांच्या घरी, कुटुंबासोबत जावे, यासाठी समुपदेशन करून सामाजिक जबाबदारीची भूमिका बजावते. मुले परतल्याने पालकांनी आरपीएफ आणि फ्रंटलाइन स्टाफचे कौतुक केले आहे.

जानेवारी ते जुलै २०२१ पर्यंत मुलांची केलेली सुटका

विभाग - मुले

मुंबई विभाग- १६६ मुले (१०४ मुले आणि ६२ मुली).

भुसावळ विभाग - ७० मुले (३९ मुले आणि ३१ मुली).

नागपूर विभाग - ४० मुले (२२ मुले आणि १८ मुली).

पुणे विभाग - १७१ मुले (१३० मुले आणि ४१ मुली).

सोलापूर विभाग ३० मुले (१५ मुले आणि १५ मुली).

जुलै २०२१ मध्ये ७३ मुलांची (४७ मुले आणि २६ मुली) सुटका करण्यात आली.

मॉडेलिंगसाठी पाटण्याहून गाठली मुंबई

- एका प्रकरणात २४ जुलैला कर्तव्यावरील ट्रेन तिकीट परीक्षक (टीटीई) नरेंद्र मिश्रा यांना एक १७ वर्षांची मुलगी ट्रेन क्र. ०३२१ मध्ये कल्याण आणि लोकमान्य टिळक टर्मिनसदरम्यान एकटी प्रवास करताना आढळली. लोकमान्य टिळक टर्मिनसवर पोहोचल्यावर मिश्रा यांनी तिला ड्युटीवरील महिला आरपीएफ बी. पाटीदार आणि चाईल्ड लाईन संस्थेच्या शारदा कांबळे यांच्याकडे सोपवले.

- आरपीएफ उपनिरीक्षक बबलू कुमार यांनी तिची चौकशी करताच तिने आपले नाव सांगितले. ती बिहारमधील पाटणा येथून मुंबईत मॉडेलिंग, अभिनय क्षेत्रात करिअर करण्यासाठी कोणालाही न सांगता घरातून पळून आली होती. पुढील कार्यवाहीसाठी ‘चाईल्ड लाईन’च्या कांबळे आणि महिला आरपीएफ कॉन्स्टेबल पूनम तिवारी यांनी तिला डोंगरी येथील बालसुधारगृहात पाठवले.

आईने फटकारल्याने सोडले घर

- दुसऱ्या एका घटनेत, मेहबूबनगर जिल्ह्यातील १४ वर्षांची मुलगी आईने तिला फटकारल्याने घरातून पळून विशेष ट्रेन क्र. ०६५२४ निजामुद्दीन-पुणे यशवंतपूर एक्स्प्रेसने आली होती. आरपीएफ कॉन्स्टेबल शशिकांत जाधव आणि महिला कॉन्स्टेबल पी. श्रीवास यांना ती १४ जुलैला हडपसर रेल्वे स्टेशन प्लॅटफॉर्मवर सापडली.

- चौकशी केल्यावर मुलीने तिचे नाव सांगितले. ती फक्त तेलगू बोलू शकत होती. तिने दिलेल्या नंबरवर तिच्या काकांशी संपर्क साधला. त्यानंतर, जाधव व पी. श्रीवास यांनी पुढील कार्यवाहीसाठी तिला ‘साथी’ या सामाजिक संस्थेकडे सोपविल्याचे जनसंपर्क विभागाने दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.

---------------