शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Hamas War Ceasefire Update: हमासला युद्धविरामाच्या सर्व अटी मान्य, आता इस्रायलच्या भूमिकेकडे लक्ष; गाझावासीयांना दिलासा मिळणार?
2
सूर्यकुमार यादवचे वादळी शतक! तिलकच्या साथीने SRH ला झोडले, MI ला संकटातून बाहेर काढून विजयी केले 
3
"माझा 100 दिवसांचा आराखडा तयार, निकाल लागल्यानंतर..."; पंतप्रधान मोदींचा 'इरादा पक्का'
4
दारूड्या कारचालकाचा कहर! चक्क पोलीस निरीक्षकाच्या कारलाच दिली जोरदार धडक
5
KKR चे चार्टर्ड विमान अचानक कोलकाताऐवजी गुवाहाटीकडे वळवावे लागले; वाचा नेमके काय घडले
6
गाझातील युद्धविरामाची चर्चा अनिर्णित, भडकलेल्या इस्रायलचे राफावर एयर स्ट्राइक
7
भारतीय वंशाच्या सुनीता विल्यम्स इतिहास रचणार, 12 वर्षांनंतर तिसऱ्यांदा अंतराळात जाणार...
8
राहुल गांधींनी काँग्रेस कार्यकर्त्यांकडं काय मागितलं? निवडणुकीच्या धामधुमीत लिहिलं भावनिक पत्र!
9
ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी 24 उमेदवार रिंगणात; चिन्हे झाली जाहीर, पाहा कुणाला काय?
10
सभांमध्ये वेगळेच विषय गाजले, पण 'वहिनीं'च्या कार्यकर्त्यांनी गावचे मुद्दे मांडले; प्रचारतंत्र 'पवारफुल्ल' ठरेल?
11
नवी मुंबईत यापुढे सबकुछ गणेश नाईक! फडणवीसांच्या आश्वासनावरच शांत झाले भाजपा कार्यकर्ते
12
मुंबई विद्यापीठाचा बी. कॉम सत्र ६ चा निकाल जाहीर; परीक्षेत १६,६३६ विद्यार्थी उत्तीर्ण
13
आव्हान संपल्यावर मुंबई इंडियन्सला सूर गवसला; T20 वर्ल्ड कपपूर्वी हार्दिक पांड्याही फॉर्मात आला
14
काँग्रेसच्या विजय वडेट्टीवारांविरोधात भाजपाची मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार; 'त्या' विधानावरून भाजपा आक्रमक
15
नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळावर दिबांच्याच नावाची घोषणा होणार- देवेंद्र फडणवीस
16
CM अरविंद केजरीवालांचा पाय आणखी खोलात; नायब राज्यपालांनी केली NIA चौकशीची मागणी
17
'काँग्रेस तुमचे पैसे वाटेल...' मल्लिकार्जुन खरगेंचे अपूर्ण विधान खोट्या दाव्यासह व्हायरल
18
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
19
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
20
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार

रूफ टॉप हॉटेल, पबवर हातोडा, हुक्का पार्लरही तोडल  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 02, 2018 6:36 AM

मुंबईत रूफ टॉप पब आणि हॉटेलला लागलेल्या आगीच्या पार्श्वभूमीवर आपल्या हद्दीतील हॉटेल्स आणि बारविरोधात ठाणे पालिकेने धडक कारवाईची मोहीम हाती घेतली. दिवसभरात या मोहिमेत हॉटेल लेरिडा, वैशाली, रंगला पंजाब, रूड लाउंज आणि हॉटेल तुलसी येथे नववर्षाच्या स्वागतासाठी उभारलेले अनधिकृत मंडप

ठाणे : मुंबईत रूफ टॉप पब आणि हॉटेलला लागलेल्या आगीच्या पार्श्वभूमीवर आपल्या हद्दीतील हॉटेल्स आणि बारविरोधात ठाणे पालिकेने धडक कारवाईची मोहीम हाती घेतली. दिवसभरात या मोहिमेत हॉटेल लेरिडा, वैशाली, रंगला पंजाब, रूड लाउंज आणि हॉटेल तुलसी येथे नववर्षाच्या स्वागतासाठी उभारलेले अनधिकृत मंडप, रूफ टॉप पालिकेने जमीनदोस्त केले. दादलानी रोड येथील हवेली हुक्का पार्लर तोडले, तर जयेश बार व माजिवडा ब्रिजजवळील तृप्ती, शॉकसह ३९ हुक्का पार्लर सील केले. हिरानंदानी येथील मेडोज व बार इंडेक्स यांचे फर्निचर महापालिकेने जप्त केले.शहरात थर्टी फर्स्टच्या पूर्वसंध्येला ठिकठिकाणी पार्ट्यांचे आयोजन केले जात असताना टेरेसवर उभारण्यात आलेले बार, हुक्का पार्लरवर महापालिकेच्या वतीने तोड कारवाई करण्यात आली आहे. ठाणे महापालिका अतिक्र मण विभागाचे उपायुक्त अशोक बुरपुल्ले आणि अग्निशमन अधिकारी शशिकांत काळे, सहायक आयुक्त डॉ. अनुराधा बाबर यांच्या नेतृत्वाखालील पथकाने ही धडक कारवाई केली.शहरात अग्निसुरक्षेच्या दृष्टीने कोणत्याही प्रकारची हेळसांड केली जाणार नसून दोषींविरोधात कठोर कारवाई केली जाणार आहे. प्रभाग समितीस्तरावर अधिकाºयांची पथके तयार करून शहरातील अग्निसुरक्षेचा आढावा घेतला जात आहे. यासाठी पालिकेच्या अग्निशमन दलाचे अधिकारी, कर्मचारी तैनात केले आहेत.गेल्या तीन दिवसांमध्ये ठाणे पोलीस आयुक्तालयात तब्बल दोन हजार ९२८ मद्यपी वाहनचालकांवर पोलिसांनी कारवाई केली. एकट्या ३१ डिसेंबरच्या रात्री १३६६ तळीरामांवर पोलिसांनी कारवाई केली असून त्यांच्याकडून २८ लाखांपेक्षा जास्त दंड वसूल केला आहे. नववर्षाचे स्वागत ठाणेकरांनी जल्लोषात केले. आनंदाच्या भरात वाहनधारक मद्यप्राशन करून वाहने चालवतात. त्यामुळे बºयाचदा भीषण अपघात घडतात. यावर उपाय म्हणून वाहतूक पोलिसांनी यंदा मद्यपी वाहनधारकांविरोधात कडक कारवाई केली.वाहनधारकांमध्ये धाक निर्माण व्हावा, यासाठी दोन दिवस आधी म्हणजे २९ डिसेंबरपासून पोलिसांनी वाहनधारकांवर कारवाईचा बडगा उगारला. २९ डिसेंबर रोजी पोलिसांनी २०५ वाहनधारकांवर कारवाई करून तीन लाख ६४ हजार ९०० रुपये दंड वसूल केला. दुसºया दिवशी ३० डिसेंबर रोजी पोलिसांनी जोर वाढवून ३९६ वाहनधारकांवर कारवाई केली. त्यांच्याजवळून १० लाख ६६ हजार ५०० रुपये दंड वसूल करण्यात आला.दोन दिवसांच्या कारवाईचा धाक वाहनधारकांमध्ये निर्माण होईल. परिणामी, ३१ डिसेंबर रोजी परिस्थितीमध्ये सुधारणा होईल, अशी पोलिसांना अपेक्षा होती. प्रत्यक्षात परिस्थिती वेगळी होती. संपूर्ण पोलीस आयुक्तालयात ३१ डिसेंबरच्या रात्री तब्बल १३२७ वाहनधारकांवर कारवाई करण्यात आली. त्यांच्याकडून १४ लाख पाच हजार रुपये दंड वसूल करण्यात आला. तीन दिवसांमध्ये एकूण १९२८ वाहनधारकांवर कारवाई केली असून त्यांच्याजवळून २८ लाख ३६ हजार ४०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.या कारवाईमध्ये वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त अमित काळे यांच्या मार्गदर्शनाखाली ८० अधिकारी, ४५० पोलीस कर्मचारी सहभागी झाले होते. मद्यपी वाहनधारकांची तपासणी करण्यासाठी ४३ ब्रीथ अनालायझर्स (श्वास तपासण्याचे यंत्र) वाहतूक पोलिसांना देण्यात आले होते. शहरासह आयुक्तालयातील सर्व महत्त्वाच्या नाक्यांवर वाहतूक पोलीस आणि मोबाइल व्हॅन्स रात्रभर तैनात होत्या. ३१ डिसेंबर रोजी सर्वात जास्त कारवाया भिवंडीतील नारपोली येथे, तर सर्वात कमी कारवाया ठाणे शहरातील राबोडीच्या हद्दीत करण्यात आल्या.

टॅग्स :thaneठाणे