शहरं
Join us  
Trending Stories
1
“भाजपाला पराभव दिसू लागलाय, प्रचंड मताधिक्यांनी १०० टक्के विजयी होणार”: विशाल पाटील
2
‘मुलीला वडिलांच्या संपत्तीत ५० टक्के अधिकार, हा सरकारचा कायदा’, सुप्रिया सुळेंचा जानकरांना टोला 
3
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
4
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण
5
चोरीच्या आरोपाखाली महिलेला दिली थर्ड डिग्री, पोलिसांवर गुन्हा दाखल 
6
'राणेंचा प्रचार करायला लागतोय यातच राज ठाकरेंचा विजय'; काँग्रेस नेत्याची बोचरी टीका
7
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
8
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
9
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
10
धक्कादायक! कोविड सारख्या 'या' गंभीर आजारामुळे हजारो 'श्वान' मरणाच्या दारात!
11
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
12
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
13
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
14
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
15
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
16
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
17
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
18
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या
19
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
20
राहुल आणि सिद्धरामय्या यांचा कार्टून व्हिडिओ; काँग्रेसची जेपी नड्डांसह तीन BJP नेत्यांविरुद्ध तक्रार

अग्निशमन जवानांचेही जीव टांगणीला! डोंबिवली केंद्रातील छताचे प्लास्टर कोसळले

By ऑनलाइन लोकमत | Published: August 14, 2019 12:58 AM

कल्याण-डोंबिवली शहरात धोकादायक इमारतींचे सज्जे आणि घरातील छताचे प्लास्टर कोसळून जीवितहानी होत आहे.

डोंबिवली : कल्याण-डोंबिवली शहरात धोकादायक इमारतींचे सज्जे आणि घरातील छताचे प्लास्टर कोसळून जीवितहानी होत आहे. या दुर्घटनांवेळी मदतीसाठी धावून जाणारे अग्निशमन जवानांचे जीवही धोक्यात असल्याचे दिसत आहे. डोंबिवली अग्निशमन केंद्रामधील अधिकाऱ्याच्या खोलीमधील छताला असलेले प्लास्टर कोसळल्याची घटना रविवारी मध्यरात्री घडली. केंद्रामधील छतामधून आणि भिंतींमध्ये पावसाचे पाणी झिरपत असल्याने येथील अधिकाऱ्यांसह जवानांचा जीव टांगणीला लागला आहे.कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रात अतिधोकादायक बांधकामांचा प्रश्न गंभीर बनला असताना महापालिकेच्या स्वत:च्या वास्तूही सुस्थितीत नसल्याचेच या घटनेनंतर उघड झाले आहे. शहरातील बांधकाम धोकादायक आणि अतिधोकादायक म्हणून जाहीर करताना आपल्या सफाई कामगारांच्या जीर्ण झालेल्या वसाहती तसेच गळक्या प्रभाग कार्यालयांची दुरुस्ती करायला प्रशासनाला मुहूर्त मिळालेला नाही. शहरातील अन्य धोकादायक बांधकामांना पाडण्यासंदर्भात नोटिसा बजावून स्वत:च्या वास्तूंकडे दुर्लक्ष करणे म्हणजे ‘दुस-या सांगे ब्रह्मज्ञान स्वत: कोरडे पाषाण’ याची प्रचीती याठिकाणी आल्यावाचून राहत नाही. डोंबिवलीतील अग्निशमन केंद्र महापालिकेच्या स्थापनेपासूनच १९८३ ला सुरू करण्यात आले. प्रारंभी एमआयडीसीची गरज म्हणून उभारलेल्या या केंद्रातून कालांतराने संपूर्ण शहरात सेवा दिली जात आहे. या केंद्राचे बांधकाम साधारण १९७९-८० मधील असून येथे एकूण सात खोल्या आहेत. २००८-०९ मध्ये केंद्राची डागडुजी करण्यात आली होती. पण त्यानंतर देखभाल-दुरुस्तीकडे दुर्लक्ष झाल्याने सध्या या केंद्रात बहुतांश ठिकाणी भिंतींमधून पावसाचे पाणी झिरपत असल्याने प्लास्टर कोसळण्याच्या स्थितीत आहे. त्यात येथील अग्निशमन केंद्र प्रमुख सुरेश शिंदे यांच्या कार्यालयातील छताला असलेले प्लास्टर कोसळल्याची घटना सोमवारी सकाळी उघडकीस आली.तीन शिफ्टमधील नऊ अधिकारी आणि जवान असतात. या घटनेत कोणालाही इजा झालेली नसली तरी सध्याची केंद्राची अवस्था पाहता जीव मुठीत धरूनच वावरावे लागत आहे. याबाबत ९ जून २०१९ ला मुख्य अग्निशमन अधिकारी, संबंधित खात्याचे उपायुक्त आणि बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता यांना पत्रव्यवहार केला आहे; पण त्याकडे दुर्लक्ष झाले आहे. दरम्यान, छताचे प्लास्टर कोसळल्याची घटना घडताच अभियंत्यांनी केंद्राला भेट देऊन पाहणी केल्याचे सांगण्यात आले.आपल्याच कर्मचाºयांकडे दुर्लक्ष : महापालिकेचे अनेक भूखंड महसूल विभागासाठी देण्यात आले आहेत. सुसज्ज अशा या जागा आहेत. आपल्या कर्मचाºयांची सुरक्षा दुरवस्थेमुळे धोक्यात आली असताना महापालिकेचे त्याकडे मात्र दुर्लक्ष झाले आहे. ज्या जागा इतर प्राधिकरणांसाठी देण्यात आल्या आहेत. त्यांच्याकडून भाडेही वसूल केले जात नसल्याचा मुद्दा वर्षभरापूर्वी पार पडलेल्या महापालिकेच्या महासभेत सदस्यांनी उपस्थित केला होता. तसेच या जागा तत्काळ ताब्यात घ्या, असे आदेशही जारी केले होते. पण आजतागायत ठोस कृती झालेली नाही.‘ती’ कार्यवाही केवळ कागदावरच : आधारवाडीतील मुख्य केंद्राची धोकादायक अवस्थेत असलेली इमारत दुरुस्त करावी. यासंदर्भात तीन वर्षांपासून नगरसेवक मोहन उगले यांचा पाठपुरावा सुरू आहे. याबाबत कामाची फाइलही बनविण्यात आली. पण निधीअभावी त्याची अंमलबजावणी झालेली नसल्याची चर्चा आहे. या धोकादायक अवस्थेतील केंद्रातील मुख्यालय चिकणघर परिसरात हलविण्यात आले आहे. आधारवाडीतील केंद्र ‘जैसे थे’ ठेवण्यात आले आहे. अधिकारी मुख्यालयात गेले असताना येथील कर्मचाºयांचा जीव टांगणीला लागला आहे. दरम्यान, निविदा प्रक्रिया सुरू असल्याची माहिती शहर अभियंता सपना कोळी-देवनपल्ली यांनी दिली.

टॅग्स :dombivaliडोंबिवली