केडीएमसीच्या सभागृहाचे कोसळले छत, जीवितहानी नाही
By Admin | Updated: July 12, 2017 12:20 IST2017-07-12T12:20:48+5:302017-07-12T12:20:48+5:30
कल्याण डोंबिवली महापालिकेच्या विनायक दामोदर सभागृहाचे छत कोसळल्याची घटना मंगळवारी (11 जुलै ) रात्री उशीरा घडली.

केडीएमसीच्या सभागृहाचे कोसळले छत, जीवितहानी नाही
>ऑनलाइन लोकमत
कल्याण, दि. 12 - कल्याण डोंबिवली महापालिकेच्या विनायक दामोदर सभागृहाचे छत कोसळल्याची घटना मंगळवारी (11 जुलै ) रात्री उशीरा घडली. बुधवारी सकाळी हा प्रकार उघडकीस आला. या ठिकाणी मासिक महासभा होते. मागील शुक्रवारी ही महासभा पार पडली.
दरम्यान बुधवारी विधिमंडळाच्या महिला हक्क आणि कल्याण समितीची बैठक या सभागृहात होणार होती. पण तत्पूर्वी ही घटना उघडकीस आल्याने मोठा अनर्थ टळला. या घटनेची माहिती मिळताच महापौर राजेंद्र देवळेकर, उपमहापौर मोरेश्वर भोईर, विरोधीपक्षनेते मंदार हळबे, नगरसेवक विश्वनाथ राणे आदिंनी सभागृहाची पाहणी केली. या
एकंदरीत प्रकरणाची चौकशी करावी अशी मागणी संबंधितांनी केली.