दरोडेखोराला केले पोलिसांच्या स्वाधीन
By Admin | Updated: January 25, 2017 04:47 IST2017-01-25T04:47:22+5:302017-01-25T04:47:22+5:30
येथील रहिवाशांनी दरोडा टाकण्यासाठी आलेल्या दरोडेखोराला पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले. त्यांनी या दरोडेखोराला

दरोडेखोराला केले पोलिसांच्या स्वाधीन
अंबरनाथ : येथील रहिवाशांनी दरोडा टाकण्यासाठी आलेल्या दरोडेखोराला पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले. त्यांनी या दरोडेखोराला चांगलाच चोप दिला. मात्र यावेळी त्याचे अन्य दोन साथीदार पळून जाण्यात यशस्वी झाले. यातील शिविसंग चिखलकर(२६)या दरोडेखोराला शिवाजीनगर पोलिसांनी अटक केली आहे.
अंबरनाथ पूर्व पाठारे पार्कपरिसरात प्रेरणा इमारतीत राहणाऱ्या द्रौपदी राणे यांच्या घरात रविवारी पहाटे तीन वाजता तीन दरोडेखोर शिरले. मात्र घरात अवघे ६३० रु पये आणि किरकोळ वस्तू त्यांना मिळाल्या.त्यांनी आपला मोर्चा दुसऱ्या घराकडे वळवला. याच वेळी एका तरु णाने काळे मास्क आणि पाठीवर बॅग असलेल्या या दरोडेखोरांना पाहिले.त्याला दरोडेखोर असल्याचा संशय आल्याने त्याने आपले मित्र आणि काही रहिवाशांना जागे केले.याच वेळी समोरून येणाऱ्या दरोडेखोरांना पकडण्यासाठी रहिवाशी धावले. मोठा जमाव धावत आपल्याकडे येत असल्याचे पाहून दरोडेखोर पाळण्याचा प्रयत्न करू लागले.
मात्र यातील शिविसंग या दरोडेखोराला रहिवाशांनी चांगला चोप दिला. या प्रकारची माहिती रहिवाशांनी शिवाजीनगर पोलिसांना दिल्यानंतर त्याला अटक केली.दरम्यान दोन दरोडेखोर पळून गेले.या दरोडेखोरांकडून पोलिसांनी चोरीची दुचाकी,दरोडा टाकण्यासाठी लागणारे साहित्य जप्त केले. (प्रतिनिधी)