शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
2
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
3
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
4
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
5
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
6
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
7
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
8
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
9
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
10
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
11
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
12
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
13
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
14
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
15
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
16
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
17
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
18
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
19
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
20
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
Daily Top 2Weekly Top 5

रेल्वेच्या रांगेत हुज्जत घालून ५८ हजारांच्या ऐवजाची लूट: महिलेसह तिघांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 6, 2017 21:23 IST

फोटो काढल्याचे निमित्त करुन ठाणे रेल्वे स्थानक परिसरात तिघा जणांनी नवी मुंबईच्या एका प्रवाशाकडील ५० हजारांची रोकड लुबाडली. त्यानंतर त्याला चॉपरच्या धाकावर कापून टाकण्याचीही धमकी या त्रिकुटाने दिली.

ठळक मुद्देठाणे रेल्वे स्थानकातील घटना चॉपरच्या धाकावर लुबाडले नौपाडा पोलिसांची कारवाई

ठाणे : रेल्वे प्रवासाचे तिकीट काढण्यासाठी रांगेत उभे असलेल्या बाबासाहेब साटे (३४) या प्रवाशाबरोबर हुज्जत घालून त्यांच्याकडील रोकड आणि मोबाइल असा ५८ हजारांचा ऐवज लुटणा-या जुगल विश्वकर्मा (२८), बबलू विश्वकर्मा (३२) आणि पूजा आशेरी या तिघांना नौपाडा पोलिसांनी अटक केली आहे. तिघांनाही न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने बुधवारी दिले आहेत.नवी मुंबईतील तळवलीनाका येथील रहिवासी साटे हे ट्रान्सपोर्ट व्यावसायिक ४ डिसेंबर रोजी रात्री ११.३० वाजण्याच्या सुमारास ठाणे रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांक-२ च्या बाहेर असलेल्या तिकीट काउंटरवर तिकिटासाठी उभे होते. त्याच वेळी जुगल आणि बबलू यांनी आमचे फोटो का काढतोस, असे कारण पुढे करून त्यांच्याशी हुज्जत घातली. त्यानंतर, त्यांना जबरदस्तीने पकडून त्यांच्या पॅण्टच्या खिशातील ५० हजारांची रोकड आणि आठ हजारांचा मोबाइल असा ऐवज त्यांनी जबरीने हिसकावून घेतला. त्यांच्यापैकीच एकाने चाकू दाखवून इथे थांबलास तर कापून टाकीन, अशी धमकीही त्यांना दिली. याप्रकरणी त्यांनी ५ डिसेंबर रोजी नौपाडा पोलीस ठाण्यात जबरी चोरीची तक्रार दाखल केल्यानंतर पोलीस निरीक्षक संजय धुमाळ, अजय गंगावणे यांच्या पथकाने या तिघांनाही मंगळवारी अटक केली.गस्त वाढविण्याची मागणीमध्यरात्रीनंतर बाहेरगावी जाणाºया मेल एक्सप्रेस गाडयांची तिकीटे काढण्यासाठी ठाणे रेल्वे स्थानक परिसरात मोठया प्रमाणात गर्दी होत असते. त्यावेळी रांगेत उभे राहण्याच्या कारणावरुनही अनेकदा प्रवाशांमध्ये हाणामारीचे प्रकार घडतात. अलिकडेच केवळ झोपण्यासाठी जागा मिळण्याच्या कारणावरुनही रेल्वे स्थानक परिसरात एकावर खूनी हल्ला झाल्याचा प्रकार घडला होता. चॉपरच्या धाकावर लुबाडण्याचे प्रकारही घडत असल्यामुळे ठाणे नगर, नौपाडा आणि ठाणे रेल्वे पोलीस यांनी संयुक्तपणे या परिसरात रात्री आणि दिवसाची पेट्रोलिंग मोठया प्रमाणात वाढवावी, अशी मागणी प्रवाशांनी केली आहे.

टॅग्स :thaneठाणेPoliceपोलिसCrimeगुन्हा