रिक्षा संघटनेमुळे दरूस्त होणार रस्ते
By Admin | Updated: February 10, 2017 04:01 IST2017-02-10T04:01:00+5:302017-02-10T04:01:00+5:30
शहरातील रिक्षा संघटना व वाहतूक पोलिसांनी महापालिकेस दिलेल्या निवेदनामुळे पालिकेल्या मिळालेल्या १४ व्या वित्त आयोगाच्या निधीतून शहरांतर्गत रहदारी

रिक्षा संघटनेमुळे दरूस्त होणार रस्ते
भिवंडी : शहरातील रिक्षा संघटना व वाहतूक पोलिसांनी महापालिकेस दिलेल्या निवेदनामुळे पालिकेल्या मिळालेल्या १४ व्या वित्त आयोगाच्या निधीतून शहरांतर्गत रहदारीचे नादुरूस्त रस्ते दुरूस्त केले जाणार आहेत.
चार वर्षापासून पालिका कार्यालय ते मंडई, मंडई ते नझराना, मंडई ते धामणकरनाका या मार्गावरील बाजारपेठ, तीनबत्ती तसेच हनुमानबावडी ते निजामपूर पोलीस ठाणे, अशोकनगर, भंडारी कंपाऊंड, बाबला कंपाऊंड, पद्मानगर येथील रस्ते बनविताना पालिकेच्या बांधकाम विभागाने दुर्लक्ष केल्याने ठेकेदारांनी योग्यरित्या रस्ते बनविलेले नाहीत. त्यामुळे ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. त्याचा परिणाम या मार्गावरून जाणाऱ्या वाहन व रिक्षाचालकांना सहन करावा लागतो. तसेच वाहतूक कोंडी व अपघाताचे प्रमाणही वाढले आहेत. या बाबत नगरसेवक महासभेत प्रशासनास जाब विचारत नसल्याने रिक्षा संघटना व शहर वाहतूक पोलीस शाखा यांनी पालिका आयुक्त डॉ. योगेश म्हसे यांना लेखी पत्र देऊन शहरातील अंतर्गत रस्त्यांच्या दुरूस्तीची मागणी केली.
पालिकेच्या तिजोरीत खडखडाट असल्याने आयुक्त म्हसे यांनी प्रशासनाच्या वतीने शहरासाठी विकासनिधी द्यावा अशी मागणी केंद्र व राज्य सरकारकडे केली. त्यानुसार सरकारने १४ व्या वित्त आयोगातून १३ कोटीचा निधी पालिकेला दिला आहे. त्यामधून शहरातील रस्त्याचे पॅचवर्क,डांबरीकरणाचे काम आचारसंहिता संपल्यानंतर हाती घेणार असल्याची माहिती म्हसे यांनी यावेळी दिली. (प्रतिनिधी)