आरटीओतर्फे१० पासून रस्ता सुरक्षा अभियान
By Admin | Updated: January 7, 2016 00:41 IST2016-01-07T00:41:59+5:302016-01-07T00:41:59+5:30
ठाणे प्रादेशिक परिवहन कार्यालयामार्फत रविवारी १० ते शनिवारी १६ जानेवारीदरम्यान रस्ता सुरक्षा अभियान राबविण्यात येणार आहे

आरटीओतर्फे१० पासून रस्ता सुरक्षा अभियान
ठाणे : ठाणे प्रादेशिक परिवहन कार्यालयामार्फत रविवारी १० ते शनिवारी १६ जानेवारीदरम्यान रस्ता सुरक्षा अभियान राबविण्यात येणार आहे. या अभियानाचे उद्घाटन ठाणे जिल्हा पालकमंत्री तथा सार्वजनिक बांधकाममंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणार आहे. या कार्यक्रमास अभिनेत्री कंगना राणावत यांची विशेष उपस्थिती असून शहर पोलीस सहआयुक्त व्ही.व्ही. लक्ष्मीनारायण हे अध्यक्षस्थानी असणार आहेत.
या वेळी प्रादेशिक परिवहन अधिकारी विकास पांडकर, उपअधिकारी हेमांगिनी पाटील, संजय डोळे व इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित राहणार आहेत. हा कार्यक्र म प्रादेशिक परिवहन कार्यालय, ठाणे (मफर् ी) येथे सकाळी ११ वाजता होणार आहे. या अभियानांतर्गत रॅली, चित्रकला स्पर्धा, नियमांची माहिती देणारी फिल्मही दाखविण्यात येणार आहे. त्याचबरोबर शासकीय बसचालक आणि स्कूल बसचालकांसाठी मार्गदर्शन शिबिरही आयोजिल्याचे आरटीओने सांगितले.