शहरं
Join us  
Trending Stories
1
"मुंबईत येणारच, न्यायदेवता नक्कीच न्याय देईल", हायकोर्टाच्या निर्णयानंतरही मनोज जरांगे ठाम
2
'कशाला रोडमॅप? आजच अंमलबजावणी करा!'; जरांगे-मुख्यमंत्र्यांचे OSD यांच्यात काय चर्चा झाली?
3
कुठल्याही प्रोजेक्टमध्ये त्रुटी आढळल्यास संबंधितांवर कारवाई होणार, अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित केली जाणार - मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ
4
दिवाळीपूर्वी मोठी भेट! कपडे, खाद्यपदार्थांवरील GST ५% होणार? 'या' वस्तू आणि सेवांवरील टॅक्सही घटणार
5
जम्मूच्या दोडा येथे ढगफुटी; डोंगरावरून आलेल्या पुरात चार जणांचा मृत्यू, १० हून अधिक घरे वाहून गेली
6
Pune: लक्ष्मी रोडवरील थरार... गर्दीत बस येताच चालकाला ह्रदयविकाराचा झटका; पोलीस धावले अन्...
7
Atharva Sudame: पुण्याचा रीलस्टार ते थेट राज ठाकरेंशी मैत्री; कोण आहे अथर्व सुदामे?
8
बुधवारी गणपती २०२५: १ गोष्ट अर्पण करा, पूर्ण पूजा सफल होईल; वर्षभर पुण्य, बाप्पा शुभच करेल!
9
वाह! आयुष्य असावं तर 'या' क्रिकेटरसारखं...; ६ महिने आराम अन् पगार मिळतो २७ कोटी
10
तंत्रज्ञानाची किमया! इंटरनेटशिवाय WhatsApp कॉल; गुगलचा आश्चर्याचा धक्का, काय आहे प्लॅन?
11
Ganpati Puja 2025: घरी स्थापन केलेल्या बाप्पाची दररोज पूजा कशी करावी? ‘या’ गोष्टींचे पालन आवश्यकच
12
अर्जुन-सानिया यांच्या साखरपुड्यासंदर्भातील फिरकी घेणारा प्रश्न अन् सचिन तेंडुलकरचा 'स्ट्रेट ड्राइव्ह'
13
उकडीचे की तळणीचे मोदक? वाद मोठा जहाल, पण दोन्ही मोदक आरोग्याच्या हिताचे; वाचा फायदे
14
मेड इन इंडिया! मारुतीची पहिली इलेक्ट्रिक कार अखेर लॉन्च, परदेशातही निर्यात होणार
15
डोनाल्ड ट्रम्प यांचा हट्टीपणा, अतिरिक्त २५ टक्के टॅरिफ लागू; भारत 'चौफेर' पलटवार करणार?
16
गणेश चतुर्थी २०२५: गुरुजींना उशीर झाला? रेकॉर्डेट कंटेट नको? स्वतःच करा गणपती प्राणप्रतिष्ठा पूजाविधी
17
चीनमध्ये शक्तीप्रदर्शन; मोदी, पुतिन आणि जिनपिंग एकाच व्यासपीठावर, अमेरिकेला लागणार मिरची
18
गणपती २०२५: ६ मूलांकांना ८ राजयोग शुभ, दुपटीने चौफेर लाभ; धनलक्ष्मी-गणेश कृपेचा वरदहस्त!
19
पैसै घेऊन मूर्तीकार पळाला, कारखाना जैसे थे ठेवला; ऐनवेळी मूर्ती कुठून आणायची, गणेशभक्तांना चिंता
20
Nikki Murder Case : निक्कीला जाळणाऱ्या विपिनच्या कुटुंबाचं सर्वात मोठं खोटं पकडलं; तपासात 'अशी' झाली पोलखोल

पोलिसांची बारबालांसह रोड परेड; काशिमीरा पोलिसांवर टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2019 01:28 IST

ऑर्केस्ट्रा बारच्या आड खास पोशाखात अश्लील हावभाव करत नाचणाऱ्या बारबालांचे व्हिडीओ अनेकवेळा पाहायला मिळतात

मीरा रोड : ऑर्केस्ट्रा बारच्या आड खास पोशाखात अश्लील हावभाव करत नाचणाऱ्या बारबालांचे व्हिडीओ अनेकवेळा पाहायला मिळतात. पण, नऊ ऑर्केस्ट्रा बारमध्ये काम करणाºया ५५ ते ६० बारबालांची भररस्त्यावरची परेड पाहून सर्वसामान्य नागरिकांच्या भुवया उंचावल्या. काशिमीरा पोलिसांनी बांगलादेशी असल्याच्या संशयावरून बारबालांची पडताळणी करण्यासाठी नजीकच्या पोलीस चौकीवर वाहतूककोंडीमुळे चालतच न्यावे लागले. या परेडवर टीका होत असून, याप्रकरणी ठाणे ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉ. शिवाजी राठोड यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत.

काशिमीरा पोलीस ठाणे हद्दीत सर्वात जास्त ऑर्केस्ट्रा बार आणि लॉज आहेत. ऑर्केस्ट्रा बारच्या आड सर्रास बेकायदा प्रकार चालत असल्याचे तसेच वेश्या व्यवसायही चालत असल्याचे आतापर्यंत दाखल विविध झालेल्या गुन्ह्यांवरून स्पष्टच आहे. पण, याच बार व लॉजमुळे काशिमीरा पोलीस ठाणे क्रीम पोस्टिंग म्हणून पोलीस यंत्रणेत ओळखले जाते. बहुतांश बार व लॉजमधून चालणाºया गैरप्रकारांना खालपासून वरपर्यंत पोलीस यंत्रणेचा वरदहस्त असल्याचा आरोप नेहमीच होतो. तसेच या बेकायदा बांधकामांना महापालिका आणि लोकप्रतिनिधींचे अभयसुद्धा टीकेचा विषय ठरलेला आहे.

काशिमीरा पोलीस निरीक्षक राम भालसिंग आणि त्यांच्या पोलीस पथकाने शनिवारी रात्री ८ च्या सुमारास बम्पर, मानसी, मिली, मिलेनियम २०००, नाइट लव्हर, के नाइट, जे नाइट, मेला, ब्ल्यू नाइट या आॅर्केस्ट्रा बारवर धाडी टाकल्या. बारमध्ये काम करणाºया बारबालांमध्ये काही बांगलादेशी तरुणी असल्याचा पोलिसांना संशय होता. बारबालांचा नोकरनामा, नोंदणी आदींचीदेखील पडताळणी यानिमित्ताने केली गेली. या बारमधून ताब्यात घेतलेल्या ५५ ते ५० बारबालांना पडताळणीसाठी दहिसर चेकनाका येथील पोलीस चौकीत न्यायचे होते. परंतु, या भागात मेट्रोचे सुरू असलेले काम आणि आधीपासूनच असलेली वाहतूककोंडी पाहता त्यांना चालतच पोलीस चौकीत नेण्यात आले. याशिवाय, इतक्या मोठ्या संख्येने असलेल्या बारबालांना नेण्यासाठी पोलिसांकडे पुरेशी वाहनेसुद्धा नव्हती.

बारबालांच्या सुरक्षिततेसाठी सुमारे २५ पोलीस अधिकारी-कर्मचाऱ्यांनी कडे केले आणि त्यांना पोलीस चौकीपर्यंत पायीच नेले. बारबालांसोबत पोलिसांचीदेखील पायपीट झाली. चौकीत गेल्यावर पोलिसांनी बारबालांचे आधारकार्ड, नोकरनामा आदींची पडताळणी करून खात्री केली. पडताळणी केल्यावर बारबालांना सोडून देण्यात आले. विशेष म्हणजे, या नऊ बारवर पोलिसांच्या धाडी पडल्याचे कळताच अन्य ऑर्केस्ट्रा बारचालक सावध होऊन त्यांनी बारबालांना रवाना केल्याचे सूत्रांनी सांगितले.

ऑर्केस्ट्रा बारमध्ये गायिका वा ऑर्केस्ट्रा कलाकार म्हणून चार जणींना रात्री दीडपर्यंत बारमध्ये ठेवण्याची परवानगी आहे. महिला वेटर म्हणून रात्री साडेनऊ वाजेपर्यंत परवानगी आहे. मात्र, बारबाला आकर्षक आणि कमी कपड्यांमध्ये उशिरापर्यंत नाच करताना आढळून आल्याचे प्रकार सातत्याने घडत आहेत. अशातच बारबाला आणि पोलिसांची ही परेड लोकांमध्ये चांगलाच चर्चेचा विषय ठरली आहे. काहींनी बारबालांना असे चालत न्यायला नको होते, असे म्हणत पोलिसांवर टीका चालवली आहे.

काही बारबाला बांगलादेशी असल्याची माहिती मिळाल्यावरून तातडीने तपासणी करण्यात आली होती. महिला कर्मचाºयांची पडताळणी केल्यावर त्यांना सोडून देण्यात आले. वाहतूककोंडी विचारात घेऊन त्या महिलांना उशीर होऊ नये म्हणून पोलीस बंदोबस्तात जवळच असलेल्या चौकीवर नेण्यात आले. महिलांच्या कामाची वेळ संपल्यावर खाजगी वाहनाने सुरक्षितरीत्या त्यांना घरी सोडण्याचे बारचालकांना बजावले आहे. बारमध्येदेखील त्यांच्या सुरक्षेची काळजी घेण्यास सांगितले आहे.- राम भालसिंग, पोलीस निरीक्षक, काशिमीरा

मीरा-भाईंदरमधील ऑर्केस्ट्रा बारच्या आड बारबालांना गैरप्रकारांसाठी प्रवृत्त करण्याच्या तक्रारी नेहमीच होतात. शहराची बार व लॉज विकृतीची ओळख सामान्य महिला आणि नागरिकांना सहन होणार नाही. रस्त्यावरून जाणाºया या बारबालांना पाहून बारमध्ये काय होत असेल, याची कल्पना कोणालाही सहज येईल. पोलिसांनी बार-लॉजमधून चालणारे गैरप्रकार सातत्याने कठोर कारवाई करून मोडले पाहिजेत. पालिकेनेदेखील बेकायदा बांधकामांवर कारवाई केली पाहिजे.- भावना भोईर, नगरसेविका, शिवसेना

टॅग्स :Mira Bhayanderमीरा-भाईंदरPoliceपोलिस