बदलापूरच्या ‘त्या’ रस्त्याचे डांबरीकरण
By Admin | Updated: April 19, 2017 00:24 IST2017-04-19T00:24:53+5:302017-04-19T00:24:53+5:30
बदलापूर बस डेपो ते गांधीनगर झोपडपट्टीतून जाणाऱ्या रस्त्याचे डांबरीकरण अनेक वर्षापासून रखडले होते. जागेच्या वादामुळे हा रस्ता

बदलापूरच्या ‘त्या’ रस्त्याचे डांबरीकरण
बदलापूर : बदलापूर बस डेपो ते गांधीनगर झोपडपट्टीतून जाणाऱ्या रस्त्याचे डांबरीकरण अनेक वर्षापासून रखडले होते. जागेच्या वादामुळे हा रस्ता तयार होण्यास विलंब होत होता. मात्र स्थानिक नगरसेवकाच्या उपोषणाच्या इशाऱ्यानंतर या रस्त्याचे काम पालिकेने तत्काळ पूर्ण केले. हा रस्ता जागेच्या वादातून रखडल्याने तयार करण्यासाठी पालिकेने चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता.
बदलापूर पश्चिम भागात हेंद्रेपाडा मांजर्ली आणि रमेशवाडी या भागात जाणाऱ्या नागरिकांना दिलासा मिळाला आहे. दोन ते अडीच वर्षापासून हे काम रखडल्याने नगरसेवक किरण भोईर सातत्याने पाठपुरावा करत होते. हा रस्ता १७ एप्रिलपर्यंत पूर्ण न केल्यास प्रशसानाच्या विरोधात बेमुदत उपोषणाचा इशारा जिल्हाधिकाऱ्यांना दिला होता. त्यानंतर नगरपालिका प्रशसानाने तातडीने पावले उचलत रस्त्याचे काम पूर्ण केले. स्थानिकांचा विरोध असल्याने रस्त्याचे काम रखडल्याचे पालिका प्रशासनाकडून सांगण्यात येते होते. मात्र या प्रकरणाची जिल्हाधिकाऱ्यांनी दखल घेत हा रस्ता तातडीने करण्याचे आदेश पालिकेला दिल्यावर पोलीस बंदोबस्तात करण्यात आला. हा रस्ता तयार झाल्याने स्टेशनमार्गे जाणारी वाहतूक या रस्त्यावरुन फिरण्यास मदत होणार आहे. दीड वर्षापासून हा रस्ता तयार व्हावा यासाठी भोईर हे सतत पाठपुरावा करत होते. मात्र विकास आराखड्यातील रस्ता आणि वापरातील रस्ता हा वेगळा असल्याने त्या रस्त्याचे काम करण्यात अडचणी येत होत्या. (प्रतिनिधी)