कल्याणमधील रस्त्याची चाळण

By Admin | Updated: November 18, 2016 02:38 IST2016-11-18T02:38:28+5:302016-11-18T02:38:28+5:30

कल्याण पूर्वेतील केडीएमसीच्या ‘ड’ प्रभाग क्षेत्र कार्यालयासमोरीस रहदारीच्या रस्त्याची चाळण झाली आहे.

Road chalk in Kalyan | कल्याणमधील रस्त्याची चाळण

कल्याणमधील रस्त्याची चाळण

कोळसेवाडी : कल्याण पूर्वेतील केडीएमसीच्या ‘ड’ प्रभाग क्षेत्र कार्यालयासमोरीस रहदारीच्या रस्त्याची चाळण झाली आहे. काँक्रिटच्या रस्त्यात काही ठिकाणी केलेल्या डांबरीकरणाला खड्डे पडले आहेत. त्यामुळे वाहतूककोंडीचे प्रमाण वाढले आहे.
पुणे लिंक रोडवरील श्रीराम टॉकीज ते सूचकनाका या ३,७०० मीटर रस्त्याच्या काँक्रिटीकरणाचे काम नोव्हेंबर २०११ पासून सुरू आहे. या प्रकल्पासाठी २९ कोटी रुपये मंजूर झाले आहेत. त्यापैकी आतापर्यंत २४ कोटी ७६ लाख खर्च झाले आहेत. रस्त्याच्या रुंदीकरणात बाधित होणारी बेकायदा बांधकामे व प्रशासकीय दिरंगाई, यामुळे अजूनही रस्त्याचे काम अपूर्ण आहे. तीसगावाला, चक्कीनाका सर्कल, मालवण हॉटेल, नितीन राज हॉटेल व विठ्ठलवाडी स्मशानभूमीसमोरील रस्ता, श्रीराम टॉकीजचा रस्ता आदी भागांतील रस्त्यांवर प्रचंड प्रमाणात खड्डे पडले आहेत. मात्र, ते बुजवण्यात कंत्राटदार टाळाटाळ करत आहे.
रस्त्याच्या काँक्रिटीकरणाच्या कामात विद्युत जनित्रे, बाधित इमारतींचा अडथळा आहे. ते वगळता काँक्रिटच्या रस्त्याचे काम ८० टक्के पूर्ण झाले आहे, अशी माहिती कनिष्ठ अभियंता एस.डी. केदार यांनी दिली आहे. पुणे लिंक मार्गावरील १९ पैकी १३ जनित्रे हटवली आहेत, तर २२ बाधित इमारतींपैकी ३ पाडल्या आहेत, अशी माहिती प्रभागक्षेत्र अधिकारी शांतिलाल राठोड यांनी दिली.
‘ड’ प्रभागक्षेत्र कार्यालय ते उड्डाणपुलापर्यंतचा भाग खडकाळ आहे. जलकुंभ, भूमिगत जलवाहिन्या, रहदारी व इमारती असल्यामुळे स्फोटतंत्राचा वापर करणे शक्य नाही. त्याऐवजी डांबरीकरण किंवा पेव्हरब्लॉक टाकून रस्त्याची दुरुस्तीचे नियोजन आहे. अन्य भागात काँक्रिटीकरण, जलवाहिन्या व मलवाहिन्यांमुळे रखडले आहे. (वार्ताहर)

Web Title: Road chalk in Kalyan