शहरं
Join us  
Trending Stories
1
Eknath Shinde: काँग्रेसने पाकिस्तानला उत्तर देण्याची कधीच हिंमत दाखवली नाही, शिंदेंची टीका
2
युद्धात पाकिस्तानच्या बाजूनं उभं राहणार, भारताचे तुकडे होतील; कोण आहे हा दिल्लीचा शत्रू? मुनीर सैन्यासोबत लढण्याची केली घोषणा
3
पुण्यात आल्यावर मुंबईच्या तरुणीला पटवलं, शरीरसंबंधही ठेवले; नंतर तिच्याच मैत्रिणीसोबत...
4
Traffic News: पुणे-मुंबई एक्सप्रेसवेवर मोठी वाहतूक कोंडी, ५ किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा
5
अरे व्वा! रुग्णालयात अनोखा विवाहसोहळा, आजारी वधूला उचलून घेऊन नवरदेवाने घेतल्या सप्तपदी
6
'वेव्हज हे फक्त नाव नाही तर...'; PM मोदींनी WAVES परिषदेमध्ये मनोरंजन क्षेत्रासाठी केली मोठी घोषणा
7
“राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येत असतील तर...”; मनसे-ठाकरे गट युतीवर काँग्रेस नेते थेट बोलले
8
"सैनिकांचे मनोबल तोडू नका"; पहलगाम हल्ल्याची चौकशी करण्याची मागणी करणाऱ्यांना कोर्टाने फटकारले
9
एआयमुळे २०००० नोकऱ्या मिळणार, Cognizant २०२५ मध्ये फ्रेशर्सची भरती करणार
10
“उद्धव-राज ठाकरे दोघेही भावासमान, महाराष्ट्र हितासाठी मनाचा मोठेपणा दाखवत...”: सुप्रिया सुळे
11
Video - अरे बापरे! टँकर पलटताच तेल लुटण्यासाठी बादल्या, कॅन घेऊन लोकांची झुंबड
12
ऐकलंत का? अंतराळात तयार करणार वीज अन् तारेशिवाय थेट जमिनीवर आणली जाणार
13
नाशिक: पोलिसांच्या हाताला झटका देऊन पळालेला क्रिश सापडला, कुठे बसला होता लपून?
14
कोण आहे 'तो' चोर? ज्याचं सर्वच करताहेत भरभरून कौतुक; कोट्यवधी रुपये चोरले अन्...
15
३५ वर्ष हेच सुरू, काश्मिरींना खूप त्रास सहन करावा लागतो; पहलगामवरून फारूक अब्दुल्ला थेट बोलले
16
कर्मचाऱ्याचे पीएफ ट्रान्सफर होणार कंपनीच्या मंजुरीविना, नोकरी बदलताना प्रक्रिया होणार सुलभ
17
Matheesha Pathirana: 'त्याला लवकरात लवकर श्रीलंकेला पाठवा' पंजाबविरुद्धच्या पराभवानंतर मथिशा पाथिराना होतोय ट्रोल
18
पहलगाम हल्ल्याच्या लिंक शोधतेय ATS! तपासला सुरुवा होताच रुग्णालयात पोहोचली सीमा हैदर; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
19
UPI युजर्ससाठी दिलासादायक बातमी, आता प्रत्येक ट्रान्झॅक्शन १५ सेकंदात होणार; स्टेटसही लवकर कळणार
20
अमृता खानविलकरची Waves summit मध्ये हजेरी, 'थलायवा'सोबत फोटो शेअर करत म्हणाली...

अंगणवाडीच्या दुरवस्थेमुळे विद्यार्थ्यांच्या जीवास धोका

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2019 03:28 IST

जिल्हा परिषद शाळेची इमारतही जीर्णावस्थेत : भिंतीना तडे गेल्याने कोसळण्याची भीती; नवीन इमारत बांधण्याबाबत प्रस्ताव

संजय गायकवाड

कर्जत : तालुक्यातील शेवटच्या टोकाला असलेल्या गोरेवाडी आदिवासीवाडीतील अंगणवाडीची दुरवस्था झाली. कोसळण्याच्या स्थितीत असल्याने सध्या जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत ती भरवली जात आहे. मात्र, जिल्हा परिषदेची इमारतही जीर्ण झाल्याने मुलांच्या जीवास धोका निर्माण झाला आहे.

गोरेवाडी येथे जिल्हा परिषदेच्या शेष फंडामधून २००८-२००९ या आर्थिक वर्षात महिला बालविकास विभागाच्या वतीने अंगणवाडीचे बांधकाम करण्यात आले आहे. सद्यस्थितीत इमारतीला मोठे तडे गेले आहेत, त्यामुळे ती कधीही कोसळण्याची भीती निर्माण झाली आहे. अंगणवाडी पर्यायी व्यवस्था म्हणून जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत भरवली जात आहे; परंतु शाळेची इमारतही जीर्ण झाली आहे. गोरेवाडीसाठी नवीनच इमारत बांधून द्यावी, अशी मागणी आदिवासी नागरिकांनी केली आहे. अंगणवाडी कोसळल्यास शेजारच्या दोन घरांनाही धोका होऊ शकतो. यापूर्वी ग्रामस्थांनी ग्रामपंचायतीकडे अंगणवाडी बांधकामाबाबत मागणी केली आहे; परंतु त्यांच्या मागणीकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप स्थानिक नागरिक चंद्राकात गोरे यांनी केला. महिला बालविकास प्रकल्पाच्या वतीने इमारत नादुरु स्त असल्याचे कळवल्यानंतर जिल्हा परिषदेने शाळेचा वर्ग वापरावयास दिला. नवीन इमारत बांधकामाचा प्रस्ताव जिल्हा परिषदेकडे पाठवला असल्याची माहिती सुपरवायझर शरयू तांबे यांनी दिली.पोषण सेवावर देखरेख प्रकल्पांतर्गत गोरेवाडीमध्ये घेतलेल्या गाव बैठकीमघ्ये इमारतीच्या दुरवस्थेबाबत माहिती घेतली आहे. नवीन इमारतीच्या बांधकामाची मागणी जिल्हा प्रशासनाकडे करण्यात आली आहे.- रवि भोई, कार्यकर्ते, देखरेख प्रकल्प, कर्जत

टॅग्स :thaneठाणेThane Municipal Corporationठाणे महानगरपालिकाSchoolशाळा