कचरा संकलन शुल्कास रिपाइंचाही विरोध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2021 04:29 IST2021-05-29T04:29:33+5:302021-05-29T04:29:33+5:30
कल्याण : केडीएमसी परिक्षेत्रात घरे व आस्थापनांकडून कचरा संकलन करण्यासाठी आकारण्यात येणारे उपयोगकर्ता शुल्क तत्काळ रद्द करा, अशी मागणी ...

कचरा संकलन शुल्कास रिपाइंचाही विरोध
कल्याण : केडीएमसी परिक्षेत्रात घरे व आस्थापनांकडून कचरा संकलन करण्यासाठी आकारण्यात येणारे उपयोगकर्ता शुल्क तत्काळ रद्द करा, अशी मागणी भाजपने केल्यानंतर आता रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (ए) नेही त्याला विरोध केला आहे. महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्याकडे निवेदन देऊन तत्काळ संबंधित शुल्क रद्द करावे, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल. असा इशारा पक्षाचे जिल्हाध्यक्ष धर्मा वक्ते दिला आहे.
आधीच सामान्य नागरिकांवर सर्वाधिक कराचा बोजा टाकणारी केडीएमसी ही राज्यातील पहिली महापालिका असताना त्यात आता या शुल्काची भर पडल्याचे त्यांनी म्हटले आहे. लॉकडाऊनमुळे आर्थिक परिस्थिती कमकुवत झाल्याने सामान्य नागरिक हतबल झाला असताना संबंधित शुल्क अन्यायकारक आहे. तत्काळ ते रद्द करावे, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
-----------------------------------------------------------------------------