शहरं
Join us  
Trending Stories
1
माझ्याविरुद्ध तिहेरी कट, डोनाल्ड ट्रम्प का संतापले?; ‘सिक्रेट सर्व्हिस’ला चौकशीचे आदेश
2
Tariff on Pharma: डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा तडाखा! औषधांवर १०० टक्के टॅरिफ, भारतीय कंपन्यांची चिंता वाढली
3
‘मला बळीचा बकरा बनवला जातोय’ सोनम वांगचूक यांचा आरोप; केंद्रीय गृहमंत्रालयाकडून कारवाई सुरूच
4
VIRAL : पत्नीच्या चारित्र्यावर संशय आला, पती अचानक बेडरूम शिरला अन् बेड उघडताच समोर आलं भयाण वास्तव!
5
पंजाब राज्य एका हेक्टरला ५० हजार देते मग महाराष्ट्राने ८५०० का? ओमराजे निंबाळकरांचा सरकारला सवाल
6
मदतीच्या आड आता निकषांचा डोंगर! हातातोंडाशी आलेल्या पिकांचा चिखल, शेतीचे वाळवंट अन् हताश शेतकरी
7
आजचे राशीभविष्य- २६ सप्टेंबर २०२५, मान- सन्मान व प्राप्तीत वाढ होईल;वाद होण्याच्या शक्यतेमुळे वाणी संयमित ठेवा
8
मदत करा...मदत करा...! आपत्तीग्रस्तांचा नेत्यांसमोर टाहो, बांधावर फुटले अश्रूंचे बांध
9
का होतेय ढगफुटी..? दिवसा बाष्पीभवन वेगाने होतेय; ढग जमतात अन् रात्रीतून सुरू होतो कहर
10
मुंबई महानगरातील विकास कामांना ९५४ कोटींचा ‘बुस्टर’; MMRDA ला राज्य सरकारची मदत
11
PAK vs BAN: Live मॅचमध्ये कॉमेडी! दोन्हीं बॅटर स्ट्राइक एन्डला; तरी Run Out करायला नाही जमलं (VIDEO)
12
‘शक्ती’रूप! धावत्या रेल्वेतून मिसाइल लॉन्च; अशी कामगिरी करणारा भारत ठरला जगातील चौथा देश
13
पावसाने गावे खरडली, नेत्यांची धुंदी कधी उतरेल?; निदान पंधरा दिवस राजकारणाला फुलस्टॉप द्या
14
केवळ मुंबईच नव्हे, तर राज्यभर सर्वच शहरांमध्ये जाहिरात फलक (पुन्हा) कोसळण्याच्या आत जागे व्हा
15
भैरप्पा गेले, पण हे लेखनपर्व कधीच काळाच्या पडद्याआड जाणार नाही
16
एलएलबी ३ वर्षे अभ्यासक्रमासाठी यंदा विक्रमी प्रवेश; आतापर्यंत २२ हजार जणांनी प्रवेश घेतले
17
पिके पाण्यात, स्वप्न वाहून गेले; कर्जाचा फास कसा सोडवायचा, पुढे शेती करायला पैसा कुठून आणायचा?
18
एससी उपवर्गीकरणाचा निर्णय तीन महिन्यांत घेऊ; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
19
अवैध बांधकामांवर कारवाई न करणाऱ्या अधिकाऱ्यांची चौकशी का नाही केली?; हायकोर्टाचा एसआयटीला सवाल
20
लालबागचा राजा संकटात धावून आला; शेतकरी बांधव, पूरग्रस्तांना मंडळाकडून ५० लाखांची मदत घोषित

रिकामवाडी, फणसवाडीतील विहिरी कोरड्याठाक, अपूर्ण पाणीयोजनेचा करपटवाडीला फटका

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2019 01:10 IST

ठाणे जिल्ह्यातील भक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या श्रीक्षेत्र टाकेश्वर देवस्थानापासून हाकेच्या अंतरावर असणाऱ्या करपटवाडी, फणसवाडी, रिकामवाडी तसेच उंबरवाडी या आदिवासी पाड्यांना तीव्र पाणीटंचाईने घेरले आहे.

- वसंत पानसरेकिन्हवली - ठाणे जिल्ह्यातील भक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या श्रीक्षेत्र टाकेश्वर देवस्थानापासून हाकेच्या अंतरावर असणाऱ्या करपटवाडी, फणसवाडी, रिकामवाडी तसेच उंबरवाडी या आदिवासी पाड्यांना तीव्र पाणीटंचाईने घेरले आहे. दिवसाआड येणाºया टँकरचे पाणी मिळवण्यासाठी येथील महिला - पुरूषांची झुंबड उडत असल्याचे चित्र आहे. फणसवाडी आणि रिकामवाडीतील आटलेल्या विहिरींमध्ये तळाला साठणारे झºयाचे पाणी भरण्यासाठी महिला रात्रभर जागरण करत असल्याची परिस्थिती आहे.सुमारे अडीचशे - तीनशे लोकवस्ती असलेल्या ढाढरे ग्रामपंचायत क्षेत्रातील रिकामवाडी आणि फणसवाडी या पाड्यांवर जवळपास ४ विहिरी असून त्या सर्वांनीच मार्च अखेरपासून तळ गाठला आहे. फणसवाडीत दोन किमीवर असलेल्या एका विहिरीत जिवंत झºयामुळे थोडेथोडे पाणी पाझरत राहते. मात्र, हे पाणी भरण्यासाठी बायका दिवसभर नंबर लावून बसलेल्या दिसतातच पण रात्रीही त्यांना जागरण करावे लागते. वाडीतील खाजगी बोरवेल बंद पडल्या असून एका सेवाभावी संस्थेने मारलेली एक बोरवेल सुरू असली तरी त्यातूनही जेमतेमच पाणी उपलब्ध होत असल्याची माहिती ग्रामपंचायत सदस्या सुनिता गावंडा यांनी दिली.येथील एका कोरड्या विहिरीत शहापूर पंचायत समितीच्या पाणीपुरवठा विभागामार्फत दिवसाआड अर्धा टँकर टाकला जातो. मात्र, रिकामवाडी, फणसवाडी आणि उंबरवाडी अशा तीन पाड्यांतील जवळपास ५०० लोकसंख्येला हे पाणी एक दिवसही पुरत नाही. दिवसरात्र फक्त पाणी टिपून आणण्याचेच काम करावे लागत असून पाण्याची विवंचना सुखाचे दोन घासही गोड लागू देत नसल्याची खंत स्थानिक महिला जनीबाई हिंदोळा यांनी व्यक्त केली.पाणीपुरवठा विभागाने राबवलेली नळपाणीपुरवठा योजना दोन वर्षांपासून बंद असून ती पूर्ववत सुरू करण्यासाठी कोणतीही पावले प्रशासनाकडून उचलली जात नसल्याने आदिवासी बांधव नाराजी व्यक्त करत आहेत. दरम्यान, काही स्थानिक चोरट्यांनी या पाणीयोजनेचे पाईप चोरून नेले असल्याने योजना बंद असल्याची माहिती मिळाली. करपटवाडीसाठी प्रस्तावित पाणीयोजना अर्धवट असल्याने तेथील आदिवासींनाही पाण्यासाठी वणवण करावी लागते आहे. पाण्याच्या दुर्भिक्षामुळे शौचालये असूनही वापरली जात नाहीत. या भागात मोठ्या प्रमाणात शेळीपालन केले जात असून या शेळ्या - बकºया आणि गुरांना पाणी पाजण्यासाठी सहा - सात किमी. अंतरावर असलेल्या शाई नदीपात्रात घेऊन जावे लागत आहे. त्यामुळे कधी एकदाचा पाऊस येतो आणि फरफट थांबते, अशी आदिवासींची अवस्था झाली आहे.करपटवाडीची अर्धवट पाणीयोजना आणि बंद पडलेली फणसवाडी -रिकामवाडीची योजना सुरू करण्यासाठी प्रयत्न झाल्यास पाणीटंचाईतून दिलासा मिळू शकतो.- सुनिता ल.गावंडा, सदस्या, ढाढरे ग्रामपंचायतया ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक तसेच ग्रामस्थांनी पाण्याच्या टँकरची मागणी केली आहे. तो प्रस्ताव वरिष्ठांना पाठवून तातडीने त्या ठिकाणी टँकरने जास्त फेºया मारून पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली जाईल.- एम. आव्हाड,उपाभियंता पाणीपुरवठा, पं. समिती शहापूर 

टॅग्स :water scarcityपाणी टंचाईthaneठाणे