शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

भाईंदरमध्ये रिक्षा चालकांची दांडगाई; रस्त्यात रिक्षा उभ्या केल्यास कारवाईचा इशारा दिला म्हणून रिक्षा चालकांचा बंद 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 23, 2023 21:15 IST

भाईंदर पश्चिमेस बालाजी नगर येथे रेल्वे स्थानक जवळ रिक्षा उभ्या केल्या जातात. या ठिकाणी वाहतूक पोलिसांनी रिक्षा संघटना व रिक्षा चालकांची बैठक घेऊन केवळ १० रिक्षा उभ्या करायच्या आणि अरुंद रस्त्यात रिक्षा उभ्या करायच्या नाहीत, असे वेळोवेळी सांगितले आहे.

मीरारोड - अरुंद रस्त्यात मनाई करूनदेखील रिक्षा उभ्या केल्याने कारवाईचा इशारा दिला, म्हणून भाईंदरच्या रिक्षा चालकांनी शुक्रवारी अचानक रिक्षा बंद करून नागरिकांना वेठीस धरले. नंतर रस्त्यात जमून गोंधळ घालणाऱ्या रिक्षा चालकांना अखेर पोलिसांनी हुसकावून लावले. 

भाईंदर पश्चिमेस बालाजी नगर येथे रेल्वे स्थानक जवळ रिक्षा उभ्या केल्या जातात. या ठिकाणी वाहतूक पोलिसांनी रिक्षा संघटना व रिक्षा चालकांची बैठक घेऊन केवळ १० रिक्षा उभ्या करायच्या आणि अरुंद रस्त्यात रिक्षा उभ्या करायच्या नाहीत, असे वेळोवेळी सांगितले आहे. तरी देखील अरुंद रस्त्यात २५ ते ३५ रिक्षा उभ्या करून रिक्षा चालक रस्ता अडवतात. यामुळे बालाजी नगर मधील नागरिकांच्या गाडयांना तसेच लोकांचा चालण्यास त्रास होतो. रिक्षा चालकास सांगितल्यास ते भांडायला येतात. त्यामुळे येथील सर्व इमारतींच्या सोसायटीने व नागरिकांनी वारंवार वाहतूक पोलिसां पासून शासन व पालिकेस लेखी तक्रारी केल्या आहेत. 

गुरुवारी सायंकाळी देखील रिक्षा रस्त्यात उभ्या असल्याने नागरिकांच्या तक्रारी नंतर वाहतूक पोलीस कर्मचारी व सहायक पोलीस निरीक्षक मंगेश कड हे बालाजी नगर येथे आले. त्यांनी रस्त्यात अडथळा करणाऱ्या बेकायदा लावलेल्या रिक्षा काढण्यास सांगितले.  त्यावेळी पुन्हा रिक्षा चालक व संघटनांचे प्रतिनिधी जमावाने जमले आणि कारवाईचा विरोध करू लागले . येथे १० पेक्षा जास्त रिक्षा लावायच्या नाहीत व रस्त्यात रिक्षा उभ्या करू नये असे ठरले असल्याची पोलिसांनी पुन्हा आठवण करू देत रस्त्यात रिक्षा उभ्या केल्यास कारवाई करणार असे सांगितले. त्यावर रिक्षा चालक व संघटनाचे प्रतिनिधींनी पोलिसांशी हुज्जत घालत कारवाईला विरोध केला आणि रिक्षा आम्ही बंद करतो असे सांगत गुरुवारी रात्री बालाजी नगर येथील रिक्षा स्वतःच बंद केल्या. 

शुक्रवारी रिक्षा चालक व संघटना यांनी भाईंदर रेल्वे स्थानक येथील रिक्षा देखील अचानक बंद केल्या. रिक्षा चालक रस्त्यात जमावाने जमले तसेच रिक्षा बंद करण्यास सांगत होते. यामुळे वाहतुकीची कोंडी होऊन तणावाचे वातावरण निर्माण झाले. तर अचानक रिक्षा बंद केल्याने सामान्य नागरिकांचे अतोनात हाल झाले. रिक्षा नसल्याने वृद्ध, महिला व मुलांसह पुरुषांना नायक पायपीट करावी लागली. रिक्षा चालक बालाजी नगर येथे झुंडीने उभे असल्याने व समजावून सांगून देखील ऐकत नसल्याने अखेर पोलिसांनी आक्रमक पवित्र घेत त्यांना पिटाळून लावले. त्या ठिकाणी पोलिसांसह दंगल नियंत्रण पथक तैनात करण्यात आले. सायंकाळी रिक्षा चालकांनी स्वतःहूनच पुन्हा रिक्षा सेवा सुरु केली. 

दरम्यान अचानक रिक्षा बंद करून सामान्य नागरिकांना वेठीस धरणाऱ्या, रस्त्यात जमावाने जमून रहदारीला बाधा आणणाऱ्या रिक्षा चालक व संघटनांवर कारवाई करावी अशी मागणी होत आहे.

टॅग्स :Mira Bhayanderमीरा-भाईंदरPoliceपोलिस