दुचाकीच्या धडकेत रिक्षातील प्रवासी गंभीर जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2021 04:27 IST2021-07-16T04:27:42+5:302021-07-16T04:27:42+5:30
ठाणे : कळवा शिवाजी चौक शिवसेना शाखेसमोर एका दुचाकीच्या धडकेत रिक्षातील राजा लंबियार (४८) हे प्रवासी गंभीर जखमी झाल्याची ...

दुचाकीच्या धडकेत रिक्षातील प्रवासी गंभीर जखमी
ठाणे : कळवा शिवाजी चौक शिवसेना शाखेसमोर एका दुचाकीच्या धडकेत रिक्षातील राजा लंबियार (४८) हे प्रवासी गंभीर जखमी झाल्याची घटना बुधवारी पहाटे ५ वाजण्याच्या सुमारास घडली. याप्रकरणी अनोळखी दुचाकीस्वाराविरुद्ध कळवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
लंबियार हे १४ जुलै रोजी पहाटेच्या सुमारास मनिषा नगर गेट क्रमांक एक येथून रिक्षाने ठाणे रेल्वेस्थानकाकडे जात होते. ते शिवाजी चौकातील शिवसेना शाखेच्या समोरील सार्वजनिक रस्त्याने जात असताना भन्नाट वेगाने आलेल्या एका अनोळखी दुचाकीस्वाराने त्यांच्या रिक्षाला समोरुन जोरदार धडक दिली. या अपघातामध्ये लंबियार यांच्या डाव्या पायाचे हाड घोट्यामध्ये मोडून फ्रॅक्चर झाले. जखमीला रुग्णालयात दाखल करता अपघाताची कोणतीही माहिती पोलिसांना न देता पसार झालेल्या या दुचाकीस्वाराचा शोध घेण्यात येत असल्याचे पोलिसांनी सांगितले.