विसरलेले २ लॅपटॉप रिक्षाचालकाने केले परत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2021 04:37 IST2021-08-01T04:37:05+5:302021-08-01T04:37:05+5:30

मीरा रोड - रिक्षातून उतरताना विसरलेले २ लॅपटॉप प्रवासी तरुणीला रिक्षा चालकाने परत करत आपल्या प्रामाणिकपणा दाखवल्याची घटना भाईंदरमध्ये ...

The rickshaw driver returned 2 forgotten laptops | विसरलेले २ लॅपटॉप रिक्षाचालकाने केले परत

विसरलेले २ लॅपटॉप रिक्षाचालकाने केले परत

मीरा रोड - रिक्षातून उतरताना विसरलेले २ लॅपटॉप प्रवासी तरुणीला रिक्षा चालकाने परत करत आपल्या प्रामाणिकपणा दाखवल्याची घटना भाईंदरमध्ये घडली.

भाईंदर पश्चिमेच्या भोलानगरमध्ये राहणारे रिक्षाचालक छोटेलाल चौहान यांच्या रिक्षातून शुक्रवारी सायंकाळी दीपाली शाह ही तरुणी प्रवास करत होती. डॉ.बाबासाहेब आंबेडकर ६० फुटी मार्गावरील मंगलमूर्ती इमारतीत राहणाऱ्या दीपालीचे २ लॅपटॉप ती रिक्षात विसरली.

लॅपटॉप विसरल्याने चिंतीत असलेल्या दीपालीने घडला प्रकार अमित लालवानीला सांगितले. अमितने नगरसेवक पंकज पांडेयना याची माहिती दिली. पांडेय यांनी ही माहिती त्यांच्या परिचयाचे रिक्षाचालकांना देऊन रिक्षा क्रमांक व माहिती शेअर केली.

शनिवारी सकाळी पप्पू नावाच्या रिक्षाचालकाने पांडेय यांना फोन करून, छोटेलाल ह्या रिक्षाचालकाच्या रिक्षात ते दोन लॅपटॉप सापडले असून छोटेलाल हा रात्रीपासून प्रवाशाचा शोध घेत असल्याचे सांगितले. त्यानंतर दीपाली हिला भेटून रिक्षाचालकाने दोन्ही लॅपटॉप तिला परत केले. तिने रिक्षाचालकाच्या प्रामाणिकपणा बद्दल कौतुक करत त्याचे आभार मानले.

Web Title: The rickshaw driver returned 2 forgotten laptops