शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
2
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
4
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
5
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
6
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
7
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
8
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
9
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
10
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
11
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
12
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
13
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
14
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
15
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
16
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
17
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
18
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
19
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
20
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
Daily Top 2Weekly Top 5

बापरे! गर्भवती महिले धडक देणाऱ्या रिक्षा चालकास अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 6, 2020 21:30 IST

Accident : गर्भवती महिलेस उपचारासाठी तीन रुग्णालयांनी नकार दिल्यावर चौथ्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करून घेतले .

ठळक मुद्देभाईंदर पश्चिमेस देवचंद नगरमधील मूळ इमारतीत राहणाऱ्या कांचन ( २९) ह्या गर्भवती असून त्यांना ९ वा महिना सुरु आहे. 

मीरारोड - भाईंदर पश्चिमेला जेवण करून फेरफटका मारणाऱ्या गर्भवती महिलेचा ९ वा महिना सुरु होता आणि एका भरधाव रिक्षा चालकाने धडक देऊन महिलेस जखमी केल्याची घटना सोमवारी रात्री ११. ३० वाजताच्या सुमारास घडली आहे. पोलिसांनी रिक्षा चालकास अटक केली आहे. तर गर्भवती महिलेस उपचारासाठी तीन रुग्णालयांनी नकार दिल्यावर चौथ्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करून घेतले .भाईंदर पश्चिमेस देवचंद नगरमधील मूळ इमारतीत राहणाऱ्या कांचन ( २९) ह्या गर्भवती असून त्यांना ९ वा महिना सुरु आहे. सोमवारी रात्री साडे अकराच्या सुमारास जेवण झाल्यावर त्या पती सागर व त्यांच्या मित्र अमितसह डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्गावरील ( ६० फूट ) कोठार भागात फेरफटका मारत होत्या. त्यावेळी समोरून रिक्षा अतिशय वेगाने आली आणि थेट कांचन व अमित यांच्यावर धडकली. ह्या अपघातात कांचन ह्यांच्या पाठीला मार बसला तर अमितच्या हाता - पायास मुका मार लागला. जखमी कांचन ह्यांना नजीकच्या दोन - तीन खाजगी रुग्णालयात नेण्यात आले असता कुठे डॉक्टर नव्हते तर कुठे कोरोना रुग्णालय असल्याने उपचारास नकार देण्यात आला. अखेर एक रुग्णालयात त्यांना दाखल करून घेतले. तर अमित वर भाईंदर पूर्वेच्या रुग्णालयात उपचार केले गेले. या अपघाताप्रकरणी रिक्षाचालक केतन बाबुलाल जैन रा. सेक्टर १ , शांती नगर , मीरारोड याला भाईंदर पोलिसांनीअटक केली आहे. अपघातात रिक्षाचे देखील नुकसान झाले आहे.

टॅग्स :Accidentअपघातpregnant womanगर्भवती महिलाbhayandarभाइंदरPoliceपोलिसArrestअटक