शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

मीरा-भाईंदरमध्ये अनेक ठिकाणी निर्बंध पायदळी; मास्क, साेशल डिस्टन्सिंगचाही विसर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2021 23:50 IST

Mira Bhayandar : मीरा-भाईंदरमध्ये शासनाने कोरोना रोखण्यासाठी अमलात आणलेल्या निर्बंधांची अंमलबजावणी बुधवार रात्री ८ नंतर सुरू झाली. गुरुवारी सकाळपासून शहरात वर्दळ सुरू होती.

मीरा रोड : कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी शासनाने लागू केलेल्या निर्बंधांचे मीरा-भाईंदरमध्ये काही ठिकाणी पालन केले गेले़ तर अनेक ठिकाणी उघडपणे उल्लंघन सुरू हाेते. मात्र त्याकडे पालिका, पोलीस व नगरसेवक-राजकारणी यांनी कानाडोळा केला. जेणेकरून भाजीपाला व अन्य वस्तू विकणाऱ्या फेरीवाल्यांसह रस्ते-दुकानातून खाद्य - पेयपदार्थ विकणाऱ्यांकडे गर्दी झाली. मास्क घालणे व नियमांचे पालन तर सर्रास धाब्यावर बसवल्याचे ठिकठिकाणी दिसत होते. मीरा-भाईंदरमध्ये शासनाने कोरोना रोखण्यासाठी अमलात आणलेल्या निर्बंधांची अंमलबजावणी बुधवार रात्री ८ नंतर सुरू झाली. गुरुवारी सकाळपासून शहरात वर्दळ सुरू होती.  महापालिकेने भाजीपाला-फळे यासाठी मैदानात सकाळची ७ ते ११ वेळ जाहीर केली असताना त्याला न जुमानता शहरातील मुख्य रस्ते, पदपथ आणि गल्ल्यांमध्ये त्यांची विक्री सुरू हाेती. बहुतांश फेरीवाल्यांनी मास्क हे नका-तोंडाच्या खाली घातले होते तर काहींनी घातले नव्हते. त्याठिकाणी लोकांची खरेदीसाठी गर्दी उसळली होती. गर्दीतील अनेक बेजबाबदार नागरिकांनीही मास्क नाकातोंडाच्या खाली घातले होते.  शहरात संचारबंदी लागू असूनही नागरिकांना शहाणपण सुचलेले नसल्याचेच चित्र हाेते. त्यामुळे काेराेनाला कसे राेखायचे हा प्रश्नच आहे.

खाद्यपदार्थांच्या गाड्या, हाॅटेलमध्ये गर्दीरस्त्यावरील खाद्यपदार्थांच्या गाड्या, हाॅटेल, दुकानांतही नागरिकांनी गर्दी केली हाेती. मात्र, बहुतांश दुकाने बंद हाेती. गल्लीबाेळातील काही दुकाने अर्धे शटर उघडे ठेवून सुरू हाेती. रिक्षांचे प्रमाण जास्त नसले तरी वाहनांची वर्दळ फारशी कमी झालेली नव्हती. त्यामुळे एकूण संमिश्र प्रतिसाद पाहायला मिळत हाेता.

टॅग्स :Mira Bhayanderमीरा-भाईंदरCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस