शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
5
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
6
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
7
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
8
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
9
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
10
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
11
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
12
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
13
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
14
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
15
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
16
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
17
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
18
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
19
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
20
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

शंभुराज देसाईंचे खासदार संजय राऊतांना चॅलेंज; राजीनामा देऊन पुन्हा निवडून या

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2023 16:11 IST

'आम्ही उद्धव ठाकरे यांचा कुठलाही आदेश मोडला नाही, म्हणूनच संजय राऊत खासदार झाले, ते आम्हाला गद्दार म्हणत आहेत.'

ठाणे (अजित मांडके )- आम्ही उद्धव ठाकरे यांचा कुठलाही आदेश मोडला नाही, म्हणूनच संजय राऊत खासदार झाले, ते आम्हाला गद्दार म्हणत आहेत. ते आमच्या मतावर निवडून आलेत, आता त्यांनी राजीनामा द्यावा आणि परत राज्यसभेत निवडून दाखवावे असं चॅलेज शिंदे गटाचे मंत्री शंभुराज देसाई यांनी शिवसेना नेते संजय राऊत यांना दिले आहे.

'आम्ही नियमाचं घटनेचं निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीचं ह्या सगळ्या गोष्टीचं पालन करून कायद्याच्या नियमाच्या चौकटीत राहून आम्ही ही भूमिका घेतलेली आहे. आमचा न्यायव्यवस्थेवर विश्वास आहे, 'माननीय केंद्रीय निवडणूक आयोगाच्या घटनेमध्ये ज्या तरतूद आहेत, त्याच्यावरती आमचा विश्वास आहे, त्यामुळे आम्हाला न्याय मिळेल असा आम्हाला विश्वास आहे, असंही शंभुराज देसाई म्हणाले. 

Gautam Adani Net Worth : अवघ्या 270 मिनिटांत गौतम अदानींच्या संपत्तीत 40 हजार कोटींची वाढ, टॉप 20 यादीमध्ये परतले...

आमदार, खासदार आमच्याकडे जास्त असल्यामुळे पक्ष बळकवता येत नाही . आम्ही आमचा दावा निवडणूक कायद्यानं निवडणूक आयोगाला अधिकार दिलेले आहेत. त्यांच्या अधिकारात राहून त्यांनी जो निर्णय दिला तो आम्ही स्वीकारलेला आहे .पुढं ते जो निर्णय देणार आहेत तोही आम्ही स्वीकारणार आहे. दोन्ही बाजूंनी पक्षकांनी एकदा न्यायालयात गेल्यानंतर ते न्याय देवतेवर विश्वास ठेवून दोन्ही पक्षकांरानी तो निर्णय स्वीकारायचा असतो तसा आम्ही तयारी दर्शविलेली त्यांनी देखील तयारी दर्शवावी, असंही शंभुराज देसाई म्हणाले. 

निकाल लागेल तो आमच्या बाजूने लागेल

'शिवसेनेमध्ये लोकप्रतिनिधींच बहुमत हे माननीय शिंदे साहेबांचे नेतृत्वाखाली आहे, 55 पैकी 40 आमदार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबरोबर आहेत. 18 पैकी 13 खासदारही मुख्यमंत्री शिंदे यांच्याबरोबर आहेत. निवडून आलेले नगरसेवकही आमच्या बाजून आहेत', असंही शंभुराज देसाई म्हणाले. 

'बहुतांश जिल्हाप्रमुख मुख्यमंत्री शिंदे यांच्या बरोबर आहेत. बहुमत आमच्याबरोबर आहे. आम्ही शिवसेना सोडलेली नाही, ज्या शिवसेनेनं भारतीय जनता पक्षाबरोबर नैसर्गिक युती करून 2019 च्या निवडणुका लढवल्या. निवडणूक लढवताना पंतप्रधान मोदी यांचे स्व.बाळासाहेब ठाकरे यांचे फोटो लावून मागून निवडून आलेले आम्ही इथे बसलेले आमदार आहोत.  त्यामुळे लोकांचे मॅडेड आमच्या बाजूने होतं, त्याच्या उलट जे घडलं मागच्या अडीच वर्षात ते उलट लोकशाहीला धरून नव्हतं. म्हणून ते मूळ पदावर आणायचं काम मुख्यमंत्री शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आम्ही केले, असंही शंभुराज देसाई म्हणाले. 

टॅग्स :Sanjay Rautसंजय राऊतShiv Senaशिवसेना