शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
2
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
3
डोंगराळ भागाचा प्रत्येक कोपरा होता ठाऊक; पहलगाम हल्ल्यातील खरा सूत्रधार कोण? पाहा
4
क्राईम थ्रिलर! गर्लफ्रेंडला साजरा करायचा होता करवा चौथ; पतीने रचला पत्नीच्या हत्येचा कट
5
"असल्या सर्जिकल स्ट्राईक तर आम्ही गल्लीबोळात करतो’’, संजय राऊतांचा सरकारला टोला 
6
पाकिस्तानी ओसामा...! आधार कार्ड, रेशन कार्ड, मतदानही केले, आता सरकारी नोकरीची तयारी करतोय
7
वडिलांपासून दूर राहिला, किटसाठी दूध विकलं; बर्थडे बॉय रोहित शर्माचा थक्क करणारा प्रवास!
8
IPS देवेन भारती मुंबईचे नवे पोलीस आयुक्त; २६/११ हल्ल्याच्या तपासाचे केले होते नेतृत्व
9
पाकिस्तानने तुमच्यासाठी दहशतवाद पोसला का, यावर अमेरिका चिडीचूप; म्हणे भारताला फोन करणार...
10
२३ वर्षांची शिक्षिका ११ वर्षाच्या विद्यार्थ्याला घेऊन फरार; पोलिसांना मिळाला पळून जातानाच व्हिडीओ
11
घरबसल्या सोनं खरं आहे खोटं चेक करा, मिनिटांत ओळखू शकाल; 'या' आहेत ५ पद्धती
12
"मला वाचवा, हे लोक माझं लग्न लावतील"; किडनॅप झालेल्या बायकोचा मेसेज; नवऱ्याची शोधाशोध
13
अखिलेश यादव यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकरांशी तुलना; फोटो पाहून मायावती संतापल्या
14
२ महिन्यांपूर्वी CRPF जवानासोबत ऑनलाईन निकाह; पाकिस्तानात परतताना 'ती' झाली भावुक
15
"परत दिसला तर मारून टाकेन"; मारहाणीनंतर काश्मिरी दुकानदारांनी सोडले मसुरी, म्हणाले, "कोणीच मदत केली नाही"
16
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोने अचानक स्वस्त का झाले? २४ कॅरेट सोन्याचा १० ग्रॅमचा 'हा' आहे नवीन दर
17
पहलगाम हल्ल्याचा म्होरक्या हाशिम मुसा! कुठे घेतलं ट्रेनिंग, काश्मीरपर्यंत कसा पोहोचला?
18
हायकोर्टाची नाराजी, IAS, IPS अन् धनाढ्य लोकांच्या मुलांना फटका बसणार; काय आहे प्रकरण?
19
कोणाचे काय, तर कोणाचे काय...! भारतीय चाहत्याला आले पाकिस्तानी अभिनेत्रीच्या पाण्याचे टेन्शन; पाठवले बॉक्स
20
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?

आमदार मेहतांविरोधात रहिवाशांचा उद्रेक, निदर्शने करत केली घोषणाबाजी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 23, 2019 23:35 IST

मीरारोड शांती पार्कच्या गोकुळ व्हिलेज मध्ये आरजीच्या जागेवर बेकायदा झालेली धार्मिक स्थळं तोडण्याची रहिवाशांची सततची मागणी

मीरारोड - मीरारोड शांती पार्कच्या गोकुळ व्हिलेज मध्ये आरजीच्या जागेवर बेकायदा झालेली धार्मिक स्थळं तोडण्याची रहिवाशांची सततची मागणी असताना त्या जागेत आमदार निधीतील उद्यानाचे भूमिपुजन करण्यास आलेल्या भाजपा आमदार नरेंद्र मेहता यांना रहिवाशांच्या रोषाला सामोरे जावे लागले. रहिवाशांनी काळ्या फिती लाऊन निदर्शने करत मुर्दाबादच्या घोषणा दिल्या. या मुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.शांती पार्क वसाहती मधील रहिवाशांच्या हक्काच्या असणाऱ्या काही आरजीवर बेकायदा अतिक्रमण करून धार्मिक स्थळं आदी बांधकामे महापालिका आणि लोकप्रतिनिधींच्या आशीर्वादाने झाली आहेत. रहिवाशांच्या संघटनेने आरजी जागेत झालेल्या गोवर्धन आणि गोपाल हवेली विरोधात तक्रारी चालवल्या असून महापालिकेने २०१२ सालीच सदर धार्मिक स्थळे अनधिकृत घोषित केली आहेत. त्याआधी देखील पालिकेने सदर बांधकामांना नोटीसा बजावल्या होत्या.रहिवाशांच्या तक्रारी तसेच बेकायदा बांधकामे असताना पालिकेने आरजीच्या जागा विकासकाशी करार करुन पालिके कडे देखभालीसाठी हस्तांतरीत केलेल्या आहेत. तर रहिवाशांनी मात्र सदर जागा आमच्या हक्काच्या आहेत. इमारतींच्या पुर्नविकास वेळी कोट्यावधी रुपयांच्या या आरजीच्या जागा रहिवाशांना फायद्याच्या ठरणार आहेत, असे म्हटले आहे. परंतु पालिकेतील सत्ताधारी भाजपाने सदर आरजी बेकायदा बांधकाम धारकांनाच देखभालीसाठी देण्याचा ठराव केला होता.पालिकेने बांधकामांना नोटीस बजावली असता स्थानिक भाजपाच्या नगरसेवकांसह अन्य नगरसेवकांनी पालिकेत गोंधळ घालत सदर बेकायदा बांधकामांवर कारवाई करण्यास विरोध केला होता. नुकत्याच झालेल्या महासभेत भाजपाने सदर आरजी जागेचे नामकरण केले. तर आमदार नरेंद्र मेहतांनी आमदार निधीतुन या ठिकाणी उद्यान बनवण्याच्या कामासाठी २० लाखांचा आमदार निधी दिला. सदर जागा रहिवाशांची असल्याने त्यास विरोध करत निधी वापरण्यासह नामकरणा विरोधात तक्रारी केल्या आहेत.आज रवीवारी सायंकाळी आ. मेहतांनी उद्यानाचे भूमिपुजन ठेवले होते. त्यावेळी मेहतां सोबत स्थानिक नगरसेवक दीपिका अरोरा, प्रशांत दळवी, आनंद मांजरेकर, हेमा बेलानी सह सजी आयपी आदी भुमिपुजनासाठी जमले होते. या विरोधात स्थानिक लहान मुलं, वृध्द, महिला व अन्य रहिवाशांनी हातात फलक घेऊन निदर्शने केली. मेहता मुर्दाबादच्या घोषणा रहिवाशांनी दिल्या. लोकांनी काळ्या फिती बांधल्या होत्या.रहिवाशी संतप्त होऊन निदर्शनं करु लागल्याने भाजपाच्या नगरसेवकांसह मेहता समर्थक देखील रहिवाशांवर आवाज चढवु लागले. आ. मेहतांनी या वेळी सर्वाच्या मागणी नुसार आपल्या आमदार निधीतुन २० लाखांचे उद्यान बनवणार असल्याचे सांगीतले. सदर उद्यानाची देखभाल पालिका ठेवणार असुन ते शहरातील सर्व नागरीकांसाठी खुले असेल असे मेहता म्हणाले.या वेळी रहिवाशांनी आरजी जागेवर झालेल्या बेकायदा बांधकामांवर कधी कारवाई होणार त्या बद्दल बोला . त्याचे पण उत्तर आम्हाला द्या असा जाब विचारला. उद्घाटन झाल्यावर बोलतो असं सांगुन बेकायदा बांधकामा बद्दल बोलणे मेहतांनी टाळले.आम्हाला न्यायालयाचे कारण सांगीतले जाते मग भुमिपुजन आणि कामं कशी होतात ? मतांची भिक मागायला बरोबर येता. ही जागा आम्हा रहिवाशांची आहे. कायद्याने चला, कायद्याला विकत घेऊ नका असे कान रहिवाशांनी टोचले. या वेळी घोषणा देणाराया रहिवाशां पैकी एकास पोलीसांनी पकडुन गाडीत बसवले.सदरचे काम राजकिय दबावापोटी महापालिका आणि जिल्हाधिकारी यांनी चालवले आहे. आमचा आरजीचा हक्क बळकावुन अतिक्रमणास आमदार व नगरसेवक संरक्षण देत असल्याचा आरोप रहिवाशांनी केला.

टॅग्स :mira roadमीरा रोड