शहरं
Join us  
Trending Stories
1
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
2
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
3
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
4
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
5
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
6
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
7
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
8
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
9
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
10
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
11
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
12
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
13
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
14
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
15
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
16
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
17
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
18
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
19
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
20
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

Thane: भाईंदरनंतर आता ठाण्यात बिबट्या घुसला, नागरिकांमध्ये दहशत, नेमका कुठे आणि कधी दिसला?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2025 13:38 IST

Leopard Spotted In Thane: ठाण्यातील वर्दळीचा भाग असलेल्या पोखरण रोड क्रमांक २ परिसरात बिबट्या दिसल्याने नागरिकांमध्ये प्रचंड घबराट पसरली आहे.

महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून बिबट्यांच्या मानवी वस्तीतील वावरामुळे चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. भाईंदरमध्ये बिबट्याने सात जणांना जखमी केल्याची घटना ताजी असतानाच, आता ठाणे शहरात बिबट्याचे दर्शन झाले. ठाण्यातील वर्दळीचा भाग असलेल्या पोखरण रोड क्रमांक २ परिसरात बिबट्या दिसल्याने नागरिकांमध्ये प्रचंड घबराट पसरली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ठाण्यातील पोखरण रोड २ परिसरातील बेथनी हॉस्पिटलजवळील एका बांधकाम साईटवर आज सकाळी बिबट्या वावरताना काही नागरिकांना दिसला. यापूर्वी गुरुवारी रात्रीही या परिसरात बिबट्या असल्याचा संशय आल्याने वनविभागाला पाचारण करण्यात आले. वनविभागाच्या पथकाने तातडीने परिसरात ट्रॅप आणि सीसीटीव्ही कॅमेरेही लावले. मात्र, बिबट्या कॅमेऱ्यात कैद झाला नाही. त्यानंतर आज सकाळी पुन्हा एकदा बांधकाम साईटवर बिबट्या दिसल्याचा दावा स्थानिक नागरिकांनी केला आहे. भरवस्तीत बिबट्या आल्याने या परिसरातील सोसायट्यांमध्ये राहणाऱ्या रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

नागरिकांना सतर्क राहण्याचा सल्ला

वनविभागाचे पथक सध्या घटनास्थळी तैनात असून परिसरातील बिबट्याचा शोध घेत आहेत. खबरदारीचा उपाय म्हणून नागरिकांना रात्रीच्या वेळी एकट्याने घराबाहेर पडू नका, असे आवाहन करण्यात आले आहे. तसेच लहान मुलांना घराबाहेर एकटे सोडू नये आणि बिबट्या दिसल्यास तातडीने वनविभागाला कळवावे, अशाही सूचना देण्यात आल्या आहेत.

वनविभागाची डोकेदुखी वाढली 

काही दिवसांपूर्वीच भाईंदरमध्ये बिबट्याने मानवी वस्तीत शिरून अक्षरशः धुमाकूळ घातला होता. त्यावेळी बिबट्याच्या हल्ल्यात सात जण जखमी झाले होते. भाईंदरमधील त्या बिबट्याला जेरबंद करून पंधरा दिवसही उलटले नाही, तोच आता ठाण्यात बिबट्याचे दर्शन झाल्याने वनविभागाची डोकेदुखी वाढली आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Leopard Spotted in Thane After Bhayandar, Panic Among Residents

Web Summary : After Bhayandar leopard attacks, a leopard was spotted in Thane's Pokhran Road 2, near a construction site, causing panic. Forest officials are searching the area and advising residents to be cautious, especially at night, and to report any sightings immediately.
टॅग्स :leopardबिबट्याthaneठाणेMaharashtraमहाराष्ट्र