शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

‘टोरंट’विरोधात रहिवासी आज उतरणार रस्त्यावर; साखळी उपोषणाच्या तयारीत

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 31, 2019 06:19 IST

कळवा, मुंब्रा, दिवा परिसरात तीव्र असंतोष

ठाणे : कळवा-मुंब्रा-शीळ-देसाई-दिवा विभागातील वीजवितरण आणि वीजबिल वसुलीचे खाजगीकरण करण्यात आले असून त्याचे कंत्राट टोरंट या कंपनीला दिले आहे. यामुळे महावितरणला सक्षम करून टोरंट कंपनीला हद्दपार करा या मागणीसाठी अनेक दिवसांपासून या भागात आंदोलन सुरू असून आता त्याची धार अधिक तीव्र करण्यात आली आहे. त्यानुसार गुरुवारी टोरेन्ट हटाव, वीज ग्राहक बचाव अशी मागणी करून जिल्हाधिकारी कार्यालयावर जनमोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती टोरंट हटाव कृती समितीने दिली.

टोरंट हटाव कृती समितीचे अध्यक्ष दशरथ पाटील यांनी ही माहिती पत्रकार परिषदेत दिली. यावेळी शिवसेनेचे नगरसेवक उमेश पाटील, माजी नगरसेवक हिरा पाटील आदींसह इतर पदाधिकारी उपस्थित होते. टोरेन्ट संदर्भात यापूर्वी वारंवार बैठकीचे आश्वासन देण्यात आले होते. त्यानुसार तीन वेळा बैठका लावण्यात आल्या. मात्र, त्या रद्द करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले. मध्यतंरी खासदार श्रीकांत शिंदे यांनी यावर तोडगा काढण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, अद्यापही त्यावर योग्य तो तोडगा निघालेला नाही. भिवंडीतील रहिवासी या खाजगीकरणाच्या विरोधात आहेत, त्यामुळे उद्या या भागात खाजगीकरण झाले तर येथील समस्यांमध्ये आणखी भर पडणार आहे.या उलट महावितरणचे सक्षमीकरण करण्यात यावे, नवीन भरती प्रक्रिया राबवावी, प्रिपेड मीटर लावावेत अशी मागणीही यावेळी त्यांनी केली आहे.तर नोव्हेंबरपासून उपोषणआता विविध आंदोलने, मोर्चे काढूनही कळवा आणि मुंब्रा भागात या कंपनीच्या माध्यमातून कामे सुरू झाली आहेत. तसेच येत्या ३१ आॅक्टोबरच्या रात्रीपासून ते खऱ्या अर्थाने वेगाने काम सुरूअसल्याची शक्यताही वर्तविली जात आहे. त्यामुळेच आम्ही हा मोर्चा काढत असल्याचे सांगितले. यानंतरही शासनाला जाग आली नाही तर मात्र नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यापासून जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ साखळी उपोषण केले जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. तर या मोर्चात आमदार जितेंद्र आव्हाड, राजू पाटील हेदेखील सहभागी होणार असल्याचा दावाही त्यांनी केला.

टॅग्स :Jitendra Awhadजितेंद्र आव्हाडmumbraमुंब्रा