प्राणवायूसाठीही आरक्षणाची गरज

By Admin | Updated: December 22, 2016 06:06 IST2016-12-22T06:06:21+5:302016-12-22T06:06:21+5:30

मुंबई महानगर विकास प्राधिकरण (एमएमआरडीए रिजन) हद्दीसाठी जाहीर केलेला विकास आराखडा हा राक्षसी असून

Requirement for the Oxygen also | प्राणवायूसाठीही आरक्षणाची गरज

प्राणवायूसाठीही आरक्षणाची गरज

मीरा रोड : मुंबई महानगर विकास प्राधिकरण (एमएमआरडीए रिजन) हद्दीसाठी जाहीर केलेला विकास आराखडा हा राक्षसी असून सर्वसामान्य माणूस आणि पर्यावरणास उद्ध्वस्त करणारा असल्याची टीका फादर फ्रान्सिस दिब्रेटो यांनी केली. आता प्राणवायू, पर्यावरण तसेच वृक्षांसाठी आरक्षण मागण्याची गरज निर्माण झाल्याचे ते म्हणाले. या विरोधात लोकशक्तीचे व्यापक आंदोलन उभारण्याचे आवाहन करत उत्तनच्या दर्यामाता चर्चमध्ये झालेल्या जनआक्र ोश सभेत एकमताने एमएमआरडीएच्या पर्यटनावर आधारित विकास आराखड्यासह आता नव्याने घाट घातलेल्या एमएमआर रिजनल आराखड्याविरु द्ध अखेरच्याश्वासापर्यंत लढू, असा निर्धार स्थानिकांनी केला.
मुंबईच्या गोराई-मानोरी,भार्इंदरच्या उत्तन-चौक आदी ९ गावांत पर्यटनावर आधारित विकास आरखडा एमएमआरडीएने मंजूर केला आहे. त्याला ग्रामस्थांनी मोठा विरोध चालवला असतानाच आता राज्य शासनाने संपूर्ण एमएमआर रिजनसाठी नवीन आराखडा आणला आहे. यामध्ये गावेच्या गावेतसेच सुरक्षित असलेला हिरवळीचा पट्टादेखील उद्ध्वस्त होणार असल्याची माहिती चंद्रशेखर प्रभू यांनी यावेळी दिली. हरित पट्ट्यात थेट अतिघातक केमिकल आदी प्रदूषण करणाऱ्या कंपन्यांना मोकळीक दिली आहे. यामुळे भविष्यात भोपाळ वायुगळतीसारखी भीषण दुर्घटना होण्याची भीती आहे. मोठ्या गगनचुंबी इमारती बांधण्यास मोकळीक असून कॉरिडॉर, मेट्रो व कोस्टल वे च्या नावाखाली बिल्डरांनी मोठी शहरे निर्माण करून अब्जावधी रु पयांचा फायदा पोहोचवण्याचा घाट यात आहे. तर, बिल्डरांना मोठ्या प्रमाणात चटईक्षेत्र उपलब्ध करून देणार आहेत, असे प्रभू म्हणाले.
गावागावांत जनजागृती करून १५ जानेवारी ही हरकती नोंदवण्याची अंतिम मुदत असल्याने लाखोंच्या संख्येने हरकती नोंदवण्याचे आवाहन फादर दिब्रेटो यांनी केले. पुढारी मोठमोठी भाषणे ठोकत असून जनतेला ते गृहीत धरत आहेत. बिल्डर नावाची भयानक जमात राजकीय पुढाऱ्यांच्या संगनमताने देश चालवत असून आता मच्छीमार, शेतकरी, कष्टकरी यांना हद्दपार करण्याचा डाव असल्याचेही ते म्हणाले. लोकांना आपल्या अस्तित्वासाठी एकत्र येण्याचे आवाहन करत तरु णांनी पुढाकार घ्यावा, असे ते म्हणाले. यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित मच्छीमार, शेतकरी व स्थानिकांनी एमएमआर व एएमआरडीएच्या आराखड्यांचा जोरदार निषेध करत तीव्र आंदोलन उभारण्याचा निर्धार व्यक्त केला.
या वेळी समीर वर्तक, मनवेल तुस्कानो, मिलन म्हात्रे, जोजफ घोन्साल्विस, लुड्स डिसोझा आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)

Web Title: Requirement for the Oxygen also

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.