टोरंटच्या विरोधात कळवा-मुंब्रातील आगरी युवकांचे ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर धरणे आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 6, 2020 06:31 PM2020-01-06T18:31:17+5:302020-01-06T18:34:59+5:30

येथील शासकीय विश्रामगृहा समोर कळवा, मुंब्रा परिसरातील नागरिकांसह महिलानी देखील या धरणे आंदोलन सहभाग घेऊन टोरंटच्या वीज पुरवठ्याच्या सेवेस विरोध दर्शविला. आगरी युवक संघटना प्रमुख गोविंद भगत यांच्या नेतृत्वाखाली आज हे धरणे आंदोलन छेडले. यावेळी या आंदोलनकर्त्यांच्या शिष्टमंडळाने निवासी उपजिल्हाधिकारी शिवाजी पाटील यांचे भेट घेऊन त्यांना टोरंटच्या विरोधातील निवेदनाव्दारे मागण्या केल्या

Report against Torrent - Agri to hold outside Thane Collector office of Agrai youth in Mumbra | टोरंटच्या विरोधात कळवा-मुंब्रातील आगरी युवकांचे ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर धरणे आंदोलन

आगरी युवक संघटना प्रमुख गोविंद भगत यांच्या नेतृत्वाखाली आज हे धरणे आंदोलन छेडले

Next
ठळक मुद्दे कंपनीच्या कामगारांनी जातीवाचक शिविगाळ केल्याच्या निषेधार्थ आगरी युवक संघटना प्रमुख गोविंद भगत यांच्या नेतृत्वाखाली आज हे धरणे आंदोलन भिवंडीतूनही या कंपनीची हकालपट्टी करण्याची मागणी

ठाणे : येथील कळवा, मुंब्रा, कौसा, शीळ परिसरातील नागरिकाना वीज पुरवठा व त्याचे बील वसुलीचा ठेका टोरंट या खाजगी कंपनीला देऊ नका, या मागणीसह या कंपनीच्या कामगारांनी जातीवाचक शिविगाळ केल्याच्या निषेधार्थ आगरी युवक संघटनेच्या नेतृत्वाखाली या परिसरातील नागरिकांनी जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर सोमवारी धरणे आंदोलन करून टोरंटला कडाडून विरोध केला.
       येथील शासकीय विश्रामगृहा समोर कळवा, मुंब्रा परिसरातील नागरिकांसह महिलानी देखील या धरणे आंदोलन सहभाग घेऊन टोरंटच्या वीज पुरवठ्याच्या सेवेस विरोध दर्शविला. आगरी युवक संघटना प्रमुख गोविंद भगत यांच्या नेतृत्वाखाली आज हे धरणे आंदोलन छेडले. यावेळी या आंदोलनकर्त्यांच्या शिष्टमंडळाने निवासी उपजिल्हाधिकारी शिवाजी पाटील यांचे भेट घेऊन त्यांना टोरंटच्या विरोधातील निवेदनाव्दारे मागण्या केल्या आहेत. मात्र सुरक्षेच्या कारणास्तव पोलिसांनी या धरणे आंदोलनास शुक्रवारी परवानगी नाकारली होती. मात्र आज दिलेल्या परवानगीस अनुसरून कार्यकर्त्यांनी शांततेच्या मार्गाने आंदोलन करून टोरंटला विरोध केला.
       कळवा, मुंब्रा, शीळ या उपविभागात टोरंटला वीज वितरण व त्याच्या बील वसुलीचा ठेका युतीच्या सरकारने दिला होता. मात्र आता त्यास स्थगिती दिलेली आहे. या कंपनीला कार्यादेशही दिलेले नाही. ते कार्यादेश कायम ठेवून या कंपनीला ठेका देऊ नये या प्रमुख मागणीसह या परिसरातील वीज बील वसुली ९० टक्के वाढलेली असल्यामुळे आता या परिसरात खाजगी कंपनीला ठेका देऊ नका असेही या आंदोलन कर्त्यांनी निवेदनात स्पष्ट केले. भिवंडीत तीन हजार ५८६ गुन्हे कंपनीने नोंदवले आहेत. ते निर्दोष असल्याचे सिध्द करण्यास कंपनीला सांगितले होते, मात्र ते कंपनीला करता आलेले नाही. यामुळे भिवंडीतूनही या कंपनीची हकालपट्टी करण्याची मागणी यावेळी लावून धरली. राज्य शासनास चुकीची माहिती देऊन टोरंट प्रशासनाची दिशाभूल करीत असलयामुळे या कंपनीला या सेवेतून बडतर्फ करावे आदी मागण्या या वेळी आंदोलन कर्त्यांनी लावून धरत टोरंट विरोधात घोषणा यावेळी दिल्या.
............
फोटो - ०६ठाणे धरणे आंदोलन
कॅप्शन - येथील जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर आगरी युवक संघटना प्रमुख गोविंद भगत यांच्या नेतृत्वाखाली धरणे आदोलनास बसलेले कार्यकर्ते

Web Title: Report against Torrent - Agri to hold outside Thane Collector office of Agrai youth in Mumbra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.