कळवा प्रभाग समितीच्या सहाय्यक आयुक्तांची बदली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2021 04:43 IST2021-08-26T04:43:00+5:302021-08-26T04:43:00+5:30

ठाणे : अनधिकृत बांधकामांवरून तडकाफडकी काही दिवसांपूर्वी सहाय्यक आयुक्तांच्या आयुक्तांनी बदल्या केल्या होत्या. असे असतानाच कळवा प्रभाग ...

Replacement of Assistant Commissioner of Kalwa Ward Committee | कळवा प्रभाग समितीच्या सहाय्यक आयुक्तांची बदली

कळवा प्रभाग समितीच्या सहाय्यक आयुक्तांची बदली

ठाणे : अनधिकृत बांधकामांवरून तडकाफडकी काही दिवसांपूर्वी सहाय्यक आयुक्तांच्या आयुक्तांनी बदल्या केल्या होत्या. असे असतानाच कळवा प्रभाग समितीच्या सहाय्यक आयुक्त प्रणाली घोंगे यांची मंगळवारी रात्री अचानक बदली केली आहे. अनधिकृत बांधकामांवर कारवाई केल्यानेच त्यांची बदली झाल्याच्या चर्चांना उधाण आले आहे.

अनधिकृत बांधकामांवरून प्रशासनाला टीकेचे धनी व्हावे लागले होते. त्यानंतर पालिका आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांनी सर्व सहाय्यक आयुक्तांच्या बदल्या केल्या होत्या. यामध्ये यापूर्वी नौपाडा प्रभाग समितीचा कार्यभार असलेल्या प्रणाली घोंगेंवर कळवा प्रभाग समितीचा कार्यभार सोपवला होता. तर सचिन बोरसे यांना वर्तकनगर प्रभाग समितीत धाडले होते. मात्र, कळव्यातही घोंगे यांनी अनधिकृत बांधकामावर कारवाई सुरू केली होती. तीच त्यांना भोवली असल्याची आता जोरदार चर्चा सध्या पालिका वर्तुळात सुरू आहे.

Web Title: Replacement of Assistant Commissioner of Kalwa Ward Committee