अंबरनाथच्या काकोळे धरणाची तब्बल २०० वर्षांनंतर दुरुस्ती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2021 04:41 IST2021-04-04T04:41:48+5:302021-04-04T04:41:48+5:30
अंबरनाथ : अंबरनाथच्या काकोळे धरणाची तब्बल २०० वर्षांनंतर दुरुस्ती सुरू करण्यात आली आहे. या धरणाची भिंत फुटून दोन वर्षांपूर्वी ...

अंबरनाथच्या काकोळे धरणाची तब्बल २०० वर्षांनंतर दुरुस्ती
अंबरनाथ : अंबरनाथच्या काकोळे धरणाची तब्बल २०० वर्षांनंतर दुरुस्ती सुरू करण्यात आली आहे. या धरणाची भिंत फुटून दोन वर्षांपूर्वी शेतीचे प्रचंड नुकसान झाले होते.
काकोळे धरण हे जीआयपी म्हणजेच `द ग्रेट इंडियन पेनिन्सुलर` धरण म्हणून ओळखले जाते. तब्बल २०० वर्षांपूर्वी ब्रिटिशांनी या धरणाची निर्मिती केली. त्याकाळी ग्रेट इंडियन पेनिन्सुलर रेल्वेच्या कोळशाच्या इंजिनांना लागणारे पाणी या धरणातून पुरवले जात होते. या धरणाची मालकी ब्रिटिशांनंतर रेल्वेकडे आली असली तरी अनेक दशके या धरणाकडे कुणाचेही लक्ष नव्हते. लालूप्रसाद यादव हे रेल्वेमंत्री झाल्यानंतर त्यांनी याच धरणाशेजारी रेल नीरचा प्लॅंट उभारला आणि हे धरण पुन्हा एकदा वापरात आले. मात्र या धरणाच्या भिंतीची २०० वर्षात एकदाही दुरुस्ती करण्यात आली नसल्याने भिंत कमकुवत होऊन त्यातून बाजूच्या भातशेतीत अनेक वर्षांपासून पाणी येत होते. दोन वर्षांपूर्वी पाण्याच्या दाबाने अचानक ही भिंत फुटली आणि शेतीचे प्रचंड नुकसान झाले. अंबरनाथचे प्राचीन शिवमंदिर, अंबरनाथ, उल्हासनगर ही शहरे यांनाही धोका निर्माण झाला. त्यावेळी या भिंतीचे बांधकाम भारतीय सैन्याकडून युद्धपातळीवर करून घ्यावे, अशी मागणी काकोळे गावातले उपसरपंच नरेश गायकर यांनी केली होती. मात्र त्यावेळी तात्पुरती डागडुजी करण्यात आली. मात्र या धरणाच्या भिंतीचे बांधकाम नव्याने सुरू करण्यात आले आहे. यामुळे भातशेतीचा धोका टळणार आहे.
--------
फोटो
.........
वाचली