कुणी दिलंय आरक्षण लक्षात ठेव, कुणाच्या तरी हातचं बाहुलं होऊ नकोस; ट्विटद्वारे नरेश म्हस्के यांचे आवाहन
By अजित मांडके | Updated: February 27, 2024 13:32 IST2024-02-27T13:32:13+5:302024-02-27T13:32:45+5:30
सगळं झालं मनासारखं, तरी कसली खवखव आहे असा सवाल ही उपस्थित करत कुणाच्या तरी हातचं, बाहुलं होऊ नकोस, असे भावनिक आवाहन ही म्हस्के यांनी केले आहे.

कुणी दिलंय आरक्षण लक्षात ठेव, कुणाच्या तरी हातचं बाहुलं होऊ नकोस; ट्विटद्वारे नरेश म्हस्के यांचे आवाहन
ठाणे : मनोज जरांगे पाटील यांनी ट्विट करत शिवसेना शिंदे गटाचे माजी महापौर नरेश म्हस्के यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार आणि माजी मंत्री राजेश टोपे हे तुझे सूत्रधार आहेत असा आरोप करत तू तुतारीच्या तालावर नाचू नकोस. तसेच काय रे मनोज भाऊ, तुला नक्की काय हवं आहे. सगळं झालं मनासारखं, तरी कसली खवखव आहे असा सवाल ही उपस्थित करत कुणाच्या तरी हातचं, बाहुलं होऊ नकोस, असे भावनिक आवाहन ही म्हस्के यांनी केले आहे.
पुढे बोलताना, म्हस्के यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनीच दिलं ना रे, मराठा आरक्षण. तुम्हाला मग आता कसली मळमळ, कसला त्रागा तुला असा प्रश्न उपस्थित केला. याशिवाय म्हस्के यांनी मी पण एक मराठाच आहे. आरक्षणाचं महत्व जाणतो, तू मात्र हल्ली समाज सोडून त्यात राजकारण आणतो. असाही आरोप केला आहे. तर लोक म्हणतात रोहित पवार- राजेश टोपे तुझे सूत्रधार आहेत. पण, लाखो मराठ्यांच्या विश्वासाला तू घातलास लबाडीचा हार असे नमूद करून म्हस्के यांनी आज जो आहेस, ते लोकांच्यामुळे आहेस. हे विसरून नको. तू मराठ्यांच्या आंदोलनाचा सामान्यातला चेहरा तू समाजासाठी उभा राहिलास, त्यांच्यासाठीच लढ तुतारीच्या तालावर नाचलास तर उन्मळेल विश्वासाचा वड राजकारण करून आंदोलनाचा विस्कोट करू नकोस. कुणी दिलंय आरक्षण लक्षात ठेव, कुणाच्या तरी हातचं बाहुलं होऊ नकोस. असे म्हस्के यांनी नमूद केले आहे.
काय रे @manojjarange भाऊ, तुला नक्की काय हवं आहे..
— Naresh Mhaske (@nareshmhaske) February 27, 2024
सगळं झालं मनासारखं, तरी कसली खवखव आहे?@mieknathshinde साहेबांनीच दिलं ना रे #मराठा_आरक्षण तुम्हाला
मग आता कसली मळमळ, कसला त्रागा तुला?
मी पण एक #मराठाच आहे
आरक्षणाचं महत्व जाणतो
तू मात्र हल्ली #समाज सोडून त्यात #राजकारण आणतो… pic.twitter.com/rgGP2W7SZe