थकबाकीदारांची यादी प्रसिद्ध करणार
By Admin | Updated: November 22, 2015 01:11 IST2015-11-22T01:11:26+5:302015-11-22T01:11:26+5:30
मालमत्ता आणि पाणीकराची वसुली प्रभावीपणे व्हावी, यासाठी जास्त रकमेची थकबाकी असणाऱ्या व्यक्तींची यादी जाहीर करण्याचे आदेश महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल
थकबाकीदारांची यादी प्रसिद्ध करणार
ठाणे : मालमत्ता आणि पाणीकराची वसुली प्रभावीपणे व्हावी, यासाठी जास्त रकमेची थकबाकी असणाऱ्या व्यक्तींची यादी जाहीर करण्याचे आदेश महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी दिले आहेत.
मालमत्ता आणि पाणीकराची वसुली प्रभावीपणे व्हावी, यासाठी सातत्याने पाठपुरावा करण्याच्या सूचना देतानाच परिमंडळ उपायुक्त, सहायक आयुक्त यांनी वसुलीसाठी कठोरपणे प्रयत्न करावेत, असे सक्त आदेश त्यांनी सर्व अधिकाऱ्यांना दिले. यासंदर्भात स्पष्ट करताना ज्या मालमत्ताधारकांकडे मोठ्या प्रमाणात थकबाकी आहे, त्यांची यादी वर्तमानपत्रांतून जाहीर करावी. त्याचप्रमाणे पाणीकराची वसुली होण्यासाठी नळजोडण्या खंडित करण्याची मोहीम सातत्याने करावी, असे सांगितले. मालमत्ता आणि पाणीकराची वसुली प्रभावीपणे नाही झाली तर संबंधितांविरु द्ध कठोर कारवाई करण्याचे संकेतही त्यांनी या बैठकीत दिले.