शहरं
Join us  
Trending Stories
1
SRH vs GT सामन्यात पाऊस आला धावून, २ संघ गेले वाहून! आता प्ले ऑफचे एकच स्थान शिल्लक
2
खासदारांच्या दिलदार शुत्रूनेच चंद्रहार पाटील यांचा घात केला - विशाल पाटील
3
स्वाती मालीवाल यांनी दिली लेखी तक्रार, गैरवर्तनप्रकरणी दिल्ली पोलीस करणार चौकशी 
4
पंतप्रधान मोदी किती जागा जिंकणार? चीननंतर आता पाकिस्तानातूनही आला आकडा! तुम्हीही जाणून घ्या
5
लोणारच्या दैत्यसुदन मंदिरामध्ये सूर्यकिरणांचा अभिषेक!
6
घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील आरोपी भावेश भिंडे याला अटक; दोन दिवसांपासून सुरु होता शोध
7
मी फडणवीसांवर काहीच बोलणार नाही, कारण...; उद्धव ठाकरेंनी केली घणाघाती टीका
8
अमेठीतून गेले आता रायबरेलीतूनही जाणार खटा-खट-खटा-खट, पंतप्रधान मोदींचा राहुल गांधींवर हल्लाबोल
9
धक्कादायक! प्रॉपर्टीच्या वादातून नायजेरियात मशिदीत बॉम्बस्फोट; आठ जणांचा मृत्यू, १६ जखमी
10
'संपूर्ण जगाला विश्वास, भारतात BJP चे सरकार स्थापन होणार', PM मोदींचा विरोधकांवर निशाणा
11
Mahindra XUV 3XO चा रेकॉर्ड, अवघ्या एका तासात 50000 बुकिंग!
12
तू काय नवीन नाहीस! गौतम गंभीरचा ट्वेंटी-२० वर्ल्ड कपपूर्वी संजू सॅमसनला सज्जड दम 
13
T20 World Cup आधी पाकिस्तानची इंग्लंडविरूद्ध तयारी; शोएब मलिकने सांगितला प्लॅन
14
"इंडिया आघाडी फुटणार अन् शहजादे...", पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
15
रायबरेलीत सोनिया गांधी सक्रिय; अखिलेश यादव, राहुल गांधी पोहोचण्यापूर्वीच कार्यकर्त्यांसोबत बैठक!
16
"मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करा, गोहत्या करणाऱ्यांना उलटे लटकवून सरळ करू", अमित शाहांचा इशारा
17
केजरीवाल बाहेर आल्याने सर्वाधिक नुकसान कुणाचं, भाजप की काँग्रेस?; प्रशांत किशोर यांनी 'गणित'च सांगितलं
18
‘CAA ही मोदींची गॅरंटी, कुणीही हटवू शकणार नाही’, आझमगड येथून मोदींनी दिलं आव्हान
19
"यासारखी अमानुष गोष्ट नाही..."; पंतप्रधान मोदींच्या घाटकोपरमधील रोड शो वरून संजय राऊतांचा हल्लाबोल
20
‘मी त्यांच्यासोबत, जर स्वाती मालिवाल यांना वाटलं तर…’ गैरवर्तन प्रकरणी प्रियंका गांधी यांचं मोठं विधान 

२० लाख १३ हजार वीजग्राहकांनी केली महावितरणकडे मोबाइल नंबरची नोंदणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 02, 2020 11:50 PM

कल्याण परिमंडळ : चार लाख ६८ हजार ग्राहकांची नोंदणी बाकी

डोंबिवली : कल्याण परिमंडळातील २० लाख १३ हजार ग्राहकांनी त्यांच्या मोबाइल क्रमांकांची नोंदणी महावितरणकडे केली असून, या ग्राहकांना रीडिंग, वीजबिलाचा तपशील तसेच वीजपुरवठा बंद असण्याचा कालावधी यासह विविध माहिती ह्यएसएमएसह्णद्वारे पाठविण्यात येत आहे. परिमंडळातील उर्वरित चार लाख ६८ हजार वीजग्राहकांनीही आपल्या मोबाइल क्रमांकांची नोंदणी करून उपलब्ध सुविधांचा लाभ घ्यावा, असे आवाहन मुख्य अभियंता दिनेश अग्रवाल यांनी गुरुवारी केले.महावितरणच्या कल्याण परिमंडळात कृषीपंप ग्राहकवगळता घरगुती, वाणिज्यिक, औद्योगिक व इतर असे एकूण २४ लाख ८२ हजार वीजग्राहक आहेत. यातील जवळपास ८१ टक्के ग्राहक मोबाइलनोंदणीच्या माध्यमातून महावितरणशी जोडले आहेत. या ग्राहकांना मीटर रीडिंग घेतल्यानंतर काही तासांत रीडिंग घेतल्याची तारीख, वेळ, सध्याचे एकूण युनिट व वापरलेले विजेचे युनिट याचा तपशील असणारा संदेश महावितरणकडून पाठविण्यात येतो. यात विसंगती आढळल्यास तक्रार करण्यासाठीचा टोल फ्री क्रमांक १९१२ हा शेवटी नमूद करण्यात आलेला असतो.या तपशिलाची पडताळणी करून चुकीच्या नोंदीबाबत वेळीच तक्रार करण्याची सुविधा याद्वारे ग्राहकांना मिळते. याशिवाय, नियोजित देखभाल व दुरुस्तीसाठी बंद ठेवण्यात येणारा वीजपुरवठा व वीजपुरवठा खंडित राहण्याचा कालावधी, याबाबत आगाऊ माहिती देणारा संदेश ग्राहकांना पाठविण्यात येत असल्याचा दावा महावितरणने गुरुवारी एका प्रसिद्धिपत्रकाद्वारे केला.तांत्रिक किंवा इतर कारणांमुळे वीजपुरवठा बंद झाल्याची व हा पुरवठा केव्हा पूर्ववत होऊ शकेल, याची माहितीही संदेशाद्वारे ग्राहकांना पाठविण्यात येते. त्यासाठी ग्राहकांनी नोंदणीकृत मोबाइल बंद असेल, चुकीचा असेल किंवा क्रमांक बदलला असल्यास नवीन क्रमांक प्राधान्याने अद्ययावत करावेत, असे आवाहन अग्रवाल यांनी केले आहे. अनेकांना मोबाइल क्रमांक देऊनही संदेश जात नाहीत, अशा तक्रारी आल्या असून त्याचे निराकरण करण्यात येणार असल्याचेही महावितरणने स्पष्ट केले आहे.असा नोंदवा मोबाइल क्रमांकनोंदणी करावयाच्या मोबाइल क्रमांकावरून एमआरईजीनंतर स्पेस द्यावा व त्यानंतर आपला १२ अंकी ग्राहक क्रमांक टाइप करून ९२२५५९२२५५ या क्रमांकावर एसएमएस पाठवावा. या एका ‘एसएमएस वरून ग्राहकाच्या मोबाइलची नोंदणी होते. याशिवाय, महावितरणच्या संकेतस्थळ, मोबाइल अ‍ॅपवरूनही मोबाइलची नोंदणी करता येते.

टॅग्स :mahavitaranमहावितरण