-धीरज परब मीरारोड- मीरा भाईंदर मध्ये देशाची राजमुद्रा, महापालिकेचे बोधचिन्ह व नगरसेवक पासून आमदार, खासदार, विधिमंडळाचे स्टिकर गाड्यांवर लावून सर्रास तोतया कॉलर टाईट करून फिरत असून अश्या गाड्यां मध्ये फिरणाऱ्या अनेकांवर फौजदारी गुन्हे दाखल आहेत. मात्र असे स्टिकर लावून फिरणाऱ्या वाहनांवर गुन्हे दाखल करण्यास टाळाटाळ केली जात आहे.
मीरा भाईंदर महापालिकेचे नोंदणीकृत बोधचिन्ह सर्रास खाजगी वाहनांवर लावली जातात. पालिकेच्या बोधचिन्ह सह अनेक गाड्यांवर नगरसेवक म्हणून लिहले जाते. अनेक महाभाग तर खाजगी गाड्यांवर महापालिकेच्या बोधचिन्हाची पाटी तयार करून पालिकेचा बोधचिन्ह असलेला झेंडा देखील लावतात. वास्तविक पालिकेचे बोधचिन्ह नोंदणीकृत असल्याने त्याचा गैरवापर कायद्याने गुन्हा आहे. परंतु महापालिका प्रशासन मात्र ह्या कडे सातत्याने डोळेझाक करत गुन्हे दाखल करण्यास टाळाटाळ करत आली आहे.
महापालिकेच्या बोधचिन्ह प्रमाणेच शहरात अनेक खाजगी वाहनांवर सर्रास देशाची राजमुद्रा असेलेले खासदार, आमदारचे स्टिकर लावले जातात. अनेक वाहनांवर विधिमंडळाचे छायाचित्र असलेले स्टिकर लावून मिरवतात. काहीजण तर वेगवेगळ्या समिती वा अँटीकरप्शन, मानविधाकर, प्रेस, पोलीस, वकील आदी नावांचे स्टिकर गाड्यांवर लावतात.
अश्या प्रकारे खासदार, आमदार, महापालिका, शासकीय समिती आदींचे खाजगी वाहनांवर स्टिकर लावून लोकां मध्ये आपला रुबाब आणि दरारा निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातो. कायद्याने असे स्टिकर खाजगी वाहनांवर लावता येत नाहीत. मात्र असे स्टिकर लावून वाहतूक पोलीस, पोलीस व नागरिकांवर आपला प्रभाव पाडण्याचे काम असे तोतया करत असतात. असे स्टिकर लावून फिरणाऱ्या अनेक गाडी मालकांवर विविध प्रकरणाचे फौजदारी गुन्हे दाखल आहेत. असे स्टिकर लावणारे बहुतांश राजकारणी तसेच ठेकेदार सुद्धा आहेत.
सागर इंगोले ( पोलीस निरीक्षक, वाहतूक शाखा) - फक्त सरकारी गाडयांनाच स्टिकरला परवानगी आहे. खाजगी गाड्यांवर स्टिकर लावून फिरणाऱ्यांवर कायद्यातील तरतूद नुसार कारवाई करणार आहोत. त्यासाठी विशेष मोहीम वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली घेणार आहोत.
ऍड. कृष्णा गुप्ता ( अध्यक्ष - सत्यकाम फाऊंडेशन ) - उजळ माथ्याने तोतया आणि गुन्हे दाखल असलेले लोक देशाच्या राजमुद्रे सह विधिमंडळ, महापालिका आदींच्या बोधचिन्हाचा गैरवापर करत फिरतात हे गंभीर आहे. त्यांच्यावर फौजजदारी गुन्हा दाखल झाला पाहिजे. स्टिकर काढून टाकून वाहतूक नियम नुसार देखील कारवाई झाली पाहिजे. परंतु या बाबत शासन, पालिका व पोलीस गंभीर नाही कारण त्यांचे लागेबांधे असलेले राजकारणी, ठेकेदार हेच असे प्रकार करत असतात.
Web Summary : Mira Bhayandar sees widespread misuse of national emblems and official stickers on private vehicles. Despite the illegality and criminal backgrounds of many offenders, police are hesitant to take action, raising concerns about potential collusion with influential figures.
Web Summary : मीरा भायंदर में निजी वाहनों पर राष्ट्रीय प्रतीकों और आधिकारिक स्टिकर का व्यापक दुरुपयोग देखा जा रहा है। कई अपराधियों की पृष्ठभूमि आपराधिक होने के बावजूद, पुलिस कार्रवाई करने में हिचकिचा रही है, जिससे प्रभावशाली हस्तियों के साथ संभावित मिलीभगत के बारे में चिंताएं बढ़ रही हैं।