शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
3
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
4
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
5
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
6
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
7
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
8
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
9
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
10
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
11
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
12
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
13
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
14
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
15
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
16
आमचे ९०० कोटी रुपये परत द्या! इंडिगोची कोर्टात धाव; कस्टम्स विभागाकडून मागितले हायकोर्टाने उत्तर
17
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
18
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
19
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
20
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
Daily Top 2Weekly Top 5

मंदीच्या खाईतील उद्योगांना पायघड्या, परवानाशुल्कासह साठापरवाना शुल्कात कपात

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 15, 2019 01:24 IST

राज्यातील अनेक उद्योगधंद्यांना आर्थिक मंदीचा सामना करावा लागत असून ठाण्यातील लघुउद्योजकही या संकटाशी झुंजत आहेत.

ठाणे : राज्यातील अनेक उद्योगधंद्यांना आर्थिक मंदीचा सामना करावा लागत असून ठाण्यातील लघुउद्योजकही या संकटाशी झुंजत आहेत. त्यामुळे आता अशा उद्योगांना सावरण्यासाठी ठाणे महापालिकेने पावले उचलली आहेत. यानुसार उद्योगधंदे व्यवसाय परवान्यात ५० टक्के आणि साठापरवाना फीमध्ये ४० टक्के शुल्क कमी करण्याचा आणि परवाना अनुषंगिक बाबींमध्ये सुधारणा करण्याचा निर्णय ठाणे महापालिकेने घेतला आहे. यासंदर्भातील प्रस्ताव १९ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या महासभेत मंजुरीसाठी पटलावर ठेवला आहे.ठाणे महापालिकेच्या परवाना विभागाने २०१४ मध्ये परवाना शुल्क आणि साठापरवान्यात वाढ केली होती. त्यात आर्थिक मंदीचा फटकाही अनेक उद्योगांना सहन करावा लागत होता. शहरातील वागळे इस्टेट आणि पोखरण परिसरात औद्योगिक वसाहती असून येथील उद्योजकांना खड्डे, अनियमित पाणीपुरवठा, स्वच्छतागृह अशा समस्यांचाही सामना करावा लागत आहे. दरम्यान, पालिकेने वाढ केलेल्या शुल्काच्या विरोधात त्यास कोपरी फायर वर्क्स असोसिएशन, कोपरी फटाका मार्केट, औद्योगिक संघटना, ठाणे लघुउद्योग संघटना (टिसा) आणि पोखरण लोक स्मॉल स्केल औद्योगिक संघटना (प्लेसा) या संघटनांनी विरोध केला होता. यासंदर्भात वारंवार पत्रव्यवहारही केला होता. तसेच या शुल्कवाढीविरोधात जिल्हाधिकारी आणि कोकण आयुक्त, विभागीय समन्वय समिती या सर्वांकडे तक्रार करण्यात आली होती. त्यानुसार जिल्हाधिकारी आणि कोकण आयुक्त, विभागीय समन्वय समिती यांनी महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांना वैयक्तिक लक्ष घालून योग्य ती कार्यवाही करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार, जयस्वाल यांनी या प्रकरणात लक्ष घालून उद्योगधंदा व्यवसाय परवाना शुल्कात ५० टक्के तर साठापरवाना शुल्कात ४० टक्के कपात करण्याचा निर्णय घेतला. याशिवाय, परवानांतर्गत येणाºया काही बाबींमध्ये काही बदल करण्याचाही निर्णय घेतला आहे. यासंबंधीचा सविस्तर प्रस्ताव येत्या मंगळवारी होणाºया महासभेत अंतिम मंजुरीसाठी ठेवला आहे. तो मंजूर झाल्यास त्याचा फायदा आर्थिक गर्तेत अडकलेल्या उद्योगांना निश्चित होईल, असे बोलले जात आहे.>हे आहेत प्रस्तावातील मुद्दे : उद्योगधंदा आणि साठापरवानामध्ये व्यवसायाचे नाव बदल करणे किंवा कमी करणे. मालकाचे नाव बदल करणे, भागीदाराच्या नावात बदल करणे किंवा वाढ करणे, परवाना व्यवसायाच्या स्वरूपात बदल करणे, साठापरवाना क्षेत्रफळ बदल करणे, साठापरवाना कर्मचारी संख्येत बदल करणे, साठापरवाना दुय्यम प्रत अदा करणे किंवा इतर बाबी अशा सर्व बाबी परवाना अंतर्गत येतात. या अंतर्गत बाबींच्या दुरु स्तीसाठी परवाना मुदत संपण्यापूर्वी मागणी केली तर त्यासाठी परवाना वार्षिक शुल्काची २० टक्के रक्कम भरावी लागत होती. मात्र, या दुरु स्तीसाठी २० टक्के रक्कम किंवा जास्तीतजास्त पाच हजार रु पये आकारण्याची शिफारस प्रस्तावात केली आहे. परवानाशुल्काची मुदत १ जानेवारी ते ३१ डिसेंबर अशी आहे. मात्र, आता परवानाशुल्क भरण्यात आल्याच्या तारखेपासून संपूर्ण वर्ष करण्यास मान्यता मिळावी, असेही या प्रस्तावात नमूद केले आहे.>महापालिकेने सादर केलेले सुधारित दरक्षेत्रफळ (चौ. फु.) जुने दर प्रचलित दर नवे प्रस्तावित दर१ ते १०० - - १००० ५००१०१ ते २५० २५० २००० १०००२५१ ते ५०० ५०० ४००० २०००५०१ ते १००० १००० ६००० ३०००१००१ ते २५०० २००० ८००० ४०००२५०१ ते ३५०० - - १०००० ५०००३५०१ ते ५००० ४००० १२००० ६०००५००१ ते ६५०० - - १६००० ८०००६५०१ ते ८००० - - २०००० १००००८००१ ते १०००० ८००० ३०००० १५०००१०००० च्या पुढे १०००० ४०००० २००००