शहरं
Join us  
Trending Stories
1
“भावाला न्याय मिळत नाही तोपर्यंत चप्पल घालणार नाही”; संतोष देशमुख यांच्या बहिणीचा निर्धार
2
वादग्रस्त आयएएस प्रशिक्षणार्थी पूजा खेडकर पुणे पोलिसांत हजर; मनाने आलेली नाही, सामाजिक कार्यकर्त्यांचा आरोप 
3
केवळ १००० रुपयांनी गुंतवणूक करून तुमच्या मुलांना बनवू शकता कोट्यधीश; कोणती आहे ही स्कीम?
4
पाकिस्तानने भारताची भीती घेतली! पीओकेमधील हॉटेल्स अन् गेस्ट हाऊसमध्ये सैन्य; मदरसे बंद
5
पाकिस्तानने अटारी, वाघा बॉर्डरचे गेट उघडले; धास्ती एवढी की पाकिस्तानींनाही घेत नव्हते...
6
प्रेक्षकांचा सूरज चव्हाणला 'गोलीगत धोका', 'झापुक झुपूक'ने पहिल्या आठवड्यात केली फक्त इतकी कमाई
7
श्रीराम दर्शनाची ओढ लागली, ३०० वर्षे जुनी परंपरा मोडली; हनुमानगढीचे महंत मंदिराबाहेर पडले!
8
हवाई दलाचं जबरदस्त शक्तिप्रदर्शन, हायवेवर उतरवली मिराज, राफेलसह ही लढाऊ विमानं
9
सिद्धार्थ-मितालीच्या घरी आला छोटा पाहुणा, फोटो शेअर करत दिली गुड न्यूज
10
WhatsApp वेबवर व्हॉइस आणि व्हिडीओ कॉलिंग फीचर लाँच; आता तुम्ही थेट करू शकता कॉल
11
बजाज चेतकला एप्रिल फूल बनविले; टीव्हीएस पहिल्यांदाच नंबर १, विक्रीत ओला कुठे...
12
पाकिस्तानी हवाई क्षेत्र बंद; एअर इंडियाला 5000 कोटी रुपयांचा फटका बसण्याचा अंदाज...
13
दारूच्या व्यसनाने आई आणि चुलतीचा खून; बीड जिल्हा दोन हत्येच्या घटनांनी हादरला
14
पंकजा मुंडेंना कॉल अन् पाठवला अश्लील मेसेज, पुण्यातील तरुणाला पोलिसांनी केली अटक
15
CEOs चा १ तासाचा पगार सामान्य कर्मचाऱ्याच्या वर्षाच्या पगाराइतका, एका रिपोर्टमध्ये झाले अनेक आश्चर्यकारक खुलासे
16
अन्न पुन्हा गरम करणं आरोग्यासाठी ठरतंय घातक; 'या' ५ गोष्टी टाळाल तरच ठणठणीत राहाल
17
 संतापजनक! मासिक पाळीत स्वयंपाक करणं महिलेच्या जीवावर बेतलं,नणंद आणि सासूने खून केल्याचा आरोप, दोन मुलं अनाथ
18
नवी मुंबईत ठाकरे गटाला खिंडार! माजी नगरसेवकांचे उद्धवसेनेला जय महाराष्ट्र, शिंदेसेनेत प्रवेश
19
"मॅडम येत आहेत, त्यांना..."; पोलीस असल्याचं सांगून दुकानात घुसले अन् २ लाखांचे दागिने चोरले
20
ISI कडून मिळाले आदेश, बेताब खोऱ्यात लपवली शस्त्रे; NIA च्या अहवालात धक्कादायक खुलासा

चेहऱ्यावरच्या मास्कने घालवली लिपस्टिकची लाली

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 3, 2021 00:15 IST

घराबाहेर पडतच नाही : कॉस्मेटिक विक्रेत्यांच्या वस्तू झाल्या खराब

सुनील घरत 

पारोळ : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मास्क बंधनकारक असताना आता या मास्कमुळे महिलांच्या मेकअपवर गदा आली आहे. घराबाहेर पडताना मास्क लावावा लागत असल्याने या मास्कने लिपस्टिकची लाली घालवली आहे.

मेकअप हा महिलावर्गाचा आवडता विषय असून, कोणताही कार्यक्रम असो वा खरेदीसाठी बाहेर पडायचे असो, मेकअप हा हवाच. याशिवाय उंबरा ओलांडला जातच नाही, अशी अनेक महिलांची स्थिती असते. या मेकअपमध्ये ओठांना लावण्यात येणाऱ्या लिपस्टिकचे खूपच महत्त्व आहे. वेगवेगळ्या रंगाचा लिपस्टिक आज बाजारात उपलब्ध आहेत. खरेदी करताना महिला याबाबत चर्चाही करतात, पण गेल्या वर्षभरात कोरोनाने या लिपस्टिकची लाली घालवली आहे. कोरोना प्रादुर्भावात बाहेर पडता येत नाही. पडले तर मास्क लावावा लावतो. त्यामुळे लिपस्टिक लावून उपयोग नाही, अशी स्थिती आज महिलावर्गाची झाली आहे. दुसरीकडे लग्नसराई, समारंभ, कार्यक्रम यावेळी विशेष प्रकारचा मेकअप महिला करतात, पण वर्षभरापासून तेही बंद आहेत. लॉकडाऊनमध्ये सण-उत्सवही घरच्या घरीच साधेपणाने साजरे करावे लागत आहेत. यामुळे मेकअपचा विषय आता संपुष्टात आला आहे.  

२४ तास घरातच, ब्युटीपार्लर हवे कशाला?कोरोना काळात अनेकांचे कामधंदे गेले आहेत तसेच काहींच्या नोकऱ्याही गेल्या आहेत, तर काही जण नोकरीत महिन्याचे काही दिवसच काम कमी असल्याने पगारही कमी झाले आहेत. अशातच महागाई वाढल्याने घर चालवणे कठीण झाले आहे. तसेच कोरोना काळात औषधांचेही खर्च वाढले आहेत. अशात आपण घरीच असल्याने पार्लरचा खर्च कश्याला, असे मत महिलांचे आहे.

वस्तू फेकाव्या लागणारकोरोना सुरू झाल्यापासून सौंदर्य प्रसाधनाकडे महिलांनी पाठ फिरवली आहे. तसेच लॉकडाऊनमध्ये दुकान बंद राहिल्याने आम्हाला भाडे, वीजबिल भरावे कसे हा प्रश्न असतानाच आता दुकानातील वस्तूंची मुदत संपत आल्याने तो माल फेकून द्यावा लागणार आहे.- मयूर पारीख, सौंदर्य प्रसाधन विक्रेता

कोरोनामुळे घराबाहेर पडणे बंद आहे. घरगुती वस्तू खरेदीसाठी जावे लागते तेही मास्क लावून. मग उगाचच लिपस्टिक व इतर वस्तू वापरायच्या कशाला? उगीच खर्च कशाला?     -अर्चना पाटील, वसई 

मागील वर्षांपासून बाहेर जाताना मास्कचा वापर आम्ही करत आहे. आमच्या घरात बाहेर जाताना मास्क वापरणे बंधनकारक आहे. त्यामुळे उगाचच या सौंदर्यप्रसाधने वापरायची कशाला, वर्षभरात आम्ही ती खरेदीही केली नाहीत.    - सपना जाधव, वसई

टॅग्स :thaneठाणेcorona virusकोरोना वायरस बातम्या