पायलट क्लस्टरच्या माध्यमातून पुनर्विकास

By Admin | Updated: September 16, 2015 00:02 IST2015-09-16T00:02:02+5:302015-09-16T00:02:02+5:30

संपूर्ण शहरासाठी क्लस्टर योजना राबविणे शक्य व्हावे, म्हणून सुरुवातीला काही पायलट क्लस्टरची निवड करून त्याचे नमुना म्हणून प्रायोगिक तत्त्वावर शहरातील काही भाग

Redevelopment through pilot cluster | पायलट क्लस्टरच्या माध्यमातून पुनर्विकास

पायलट क्लस्टरच्या माध्यमातून पुनर्विकास

ठाणे : संपूर्ण शहरासाठी क्लस्टर योजना राबविणे शक्य व्हावे, म्हणून सुरुवातीला काही पायलट क्लस्टरची निवड करून त्याचे नमुना म्हणून प्रायोगिक तत्त्वावर शहरातील काही भाग निश्चित केल्याची माहिती आयुक्त संजीव जयस्वाल यांनी महासभेत दिली. यामुळे गेल्या काही दिवसांपूर्वी हा अहवाल काल्पनिक असल्याच्या आरोप करणाऱ्या विरोधकांची हवाच आयुक्तांनी काढल्याचे यातून स्पष्ट होत आहे.
ठाणे महानगरपालिकेने काही दिवसांपूर्वी क्लस्टर संदर्भातील इम्पॅक्ट असेसमेंट अहवाल राज्य शासनाला सादर केला आहे. परंतु, तो काल्पनिक असल्याचा दावा विरोधी पक्षाने केला होता. याच मुद्द्यावरून मंगळवारच्या महासभेत विरोधक आक्रमक झाले होते. त्यामुळे आयुक्तांनी त्याचा समाचार घेतला.
हा प्रयोग यशस्वी झाल्यास उर्वरित ठिकाणीही त्या पद्धतीने तयारी करून पुढील दिशा ठरविली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. आता पुढील आठवड्यात, या अहवालावर राज्य शासनाबरोबर चर्चा होणार असून, ते यात काही बदल सुचवू शकणार आहेत. तसेच, काही फेरबदलही यात होऊ शकतात. त्यामुळे सध्या सादर झालेला अहवाल हा अंतिम नसून, राज्य शासन तो अंतिम करेल. त्यानंतरच तो उच्च न्यायालयात सादर केला जाणार असून, तेच यावर निर्णय घेणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, प्रशासनाचा निषेध करण्यासाठी विरोधी पक्षातील प्रतिनिधींनी काळे वस्त्र परिधान केले होते, तर प्रशासनाच्या बाजूने उभे राहण्यासाठी शिवसेनेच्या नगरसेवकांनी गळ्यात भगवे पट्टे परिधान केले होते. (प्रतिनिधी)

क्लस्टर ही संपूर्ण शहरासाठीची योजना असून, सुरुवातीला शहरातील काही भाग निश्चित करून त्या ठिकाणी सध्या कशा प्रकारच्या सोयीसुविधा आहेत आणि भविष्यात क्लस्टर राबविल्यानंतर त्या सुविधांवर किती ताण येऊ शकतो, याची माहिती या अहवालातून मिळणार आहे. तसेच, सध्या तेथे वास्तव्य करीत असलेल्या ६० टक्के रहिवाशांचा यात समावेश होणार असून, उर्वरित हे कदाचित बाहेरचेही असू शकतात, त्यामुळे हा ताण वाढण्याची शक्यता आहे.

Web Title: Redevelopment through pilot cluster

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.